चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥२॥करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥३॥तुका ह्मणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥४॥
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥३॥जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥४॥तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥५॥
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥सांगावे ते किती तुह्मांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥३॥ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥४॥तुका ह्मणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होइप देवा ॥५॥
शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥२॥भागलियाचा होइप रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥तुका ह्मणे आह्मां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥
कोण आह्मां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥३॥कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥४॥तुका ह्मणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥५॥
तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आह्मां मुक्तिपांग काई ॥१॥धांवा केला आतां होईल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥गायनाचा आतां कोठें उरला काळ। आनंदें सकळ भरी आलें ॥२॥देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥३॥तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात। प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥४॥तुका ह्मणे आह्मीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥५॥
तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिक्तहीन ॥१॥कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥तरि च ह्मणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥२॥चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा ह्मणऊनि ॥३॥तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥४॥तुका ह्मणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥५॥
अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥३॥निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥४॥तुका ह्मणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥५॥
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥तुका ह्मणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तो चि देव देव भक्त ॥४॥
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥गोपाळांची पूजा उिच्छष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥२॥निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥तुका ह्मणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥५॥
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥१॥आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥न ह्मणे सोइरा सुहुर्द आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥३॥भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥३॥कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥तुका ह्मणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥५॥
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥तुका ह्मणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥माझी अल्प हे वासना। तूं तो उदाराचा राणा ॥२॥तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥राहे लोकाचार पडे अवघा विसर ॥२॥तुका ह्मणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥३॥
टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥१॥जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥तुका ह्मणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥करावें तें काय। न कळें अवलोकितों पाय ॥२॥तुका ह्मणे दान । दिलें पदरीं घेईन ॥३॥
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुह्मां आह्मां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये ह्मणतां मी माझें ॥२॥भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥३॥नका बोलों सये । मज वचन न साहे। बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥तुह्मां आह्मां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका ह्मणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥५॥
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥आह्मां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥२॥तुका ह्मणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥३॥
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥तुका ह्मणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥
आतां आह्मां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥१॥अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥तुका ह्मणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥२॥तुका ह्मणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥३॥
मुनि मुक्त जाले भेणें गर्भवासा । आह्मां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥अवघा चि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप ह्मणोनियां ॥ध्रु.॥पुराणीं उपदेश साधन उद्भट । आह्मां सोपी वाट वैकुंठींची ॥२॥तुका ह्मणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥२॥
न करावी स्तुति माझी संतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥१॥भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥तुका ह्मणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥१॥नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥तुका ह्मणे तुमच्या पायांच्या आधारें। उत्तरेन खरें भवनदी ॥३॥
चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥बुद्धिहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥२॥तुका ह्मणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥३॥
समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥तुका ह्मणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥१॥सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥२॥तुका ह्मणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥३॥
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥३॥
जन मानविलें वरी बाहएात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥ह्मणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥तुका ह्मणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥३॥
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥२॥तुका ह्मणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥तुका ह्मणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥बहु काकुलती । आलों मागें किती ॥२॥तुका ह्मणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥३॥पाईक - अभंग ११
पाईकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥तरि व्हावें पाईक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥३॥तुका ह्मणे एका क्षणांचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥४॥
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । ह्मणोनियां जीवें केली साटीं ॥१॥येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टि वरी ॥ध्रु.॥स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥तुका ह्मणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥
पाईक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥२॥ऐसें जन केलें पाइकें पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥तुका ह्मणे ऐसे जयाचे पाईक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥४॥
पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥२॥सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥३॥तुका ह्मणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥४॥
पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥तो एक पाईक पाइकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥२॥विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥तुका ह्मणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥४॥
धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥ध्रु.॥आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥२॥कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥३॥तुका ह्मणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥४॥
पाइकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥१॥पाईक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईक तो पणें निवडला ॥२॥करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥३॥तुका ह्मणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥४॥
उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥२॥गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥३॥तुका ह्मणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥४॥
एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढएा ठाव ॥३॥तुका ह्मणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥४॥
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥१॥आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥पाठीवरी घाय ह्मणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥२॥घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥तुका ह्मणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥४॥
जातीचा पाईक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥२॥तुका ह्मणे नमूं देव ह्मुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥३॥॥११॥
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥१॥आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥तुका ह्मणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुह्मां लागे कोडें उगवणें ॥१॥आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुह्मां हातीं ॥ध्रु.॥न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥दयासिंधु नाम पतितपावन । हें आह्मां वचन सांपडलें ॥३॥तुका ह्मणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥४॥
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥ध्रु.॥थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥२॥तुका ह्मणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥३॥
अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥१॥पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥२॥तुका ह्मणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥३॥
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥तुका ह्मणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥२॥तुका ह्मणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं।ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका ।संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥३॥शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता।क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तिमंत ॥४॥दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी ।वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥५॥अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभिक्त।ब्रह्म ऐक्यभावें भिक्त विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥६॥देहबुद्धि जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे।न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥तुका ह्मणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥३॥॥घोंगडएाचे अभंग-॥१२॥
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥२ ॥तुका ह्मणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥२॥तुका ह्मणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥३॥
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥कान्होबाचे पडिलों गळां । घेइप गोपाळा देइप झाडा ॥ध्रु.॥मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥२॥तुका ह्मणे बुद्धि काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥३॥
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥२॥तुका ह्मणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥३॥
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥१॥चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥तुह्मां आह्मां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥२॥तुका ह्मणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥
तुह्मां आह्मां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥माझें घोंगडें टाकुन देइप । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥२॥तुका ह्मणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥३॥
मुळींचा तुह्मां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥तुका ह्मणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥३॥
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥नोळखवे म्यां धरिला हातीं । देहएादिप माय लाविली वाती ॥२॥न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥३॥
आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥२॥तुका ह्मणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥३॥
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥१॥मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥२॥तुका ह्मणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥३॥
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥३॥
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥२॥आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥३॥आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥४॥तुका ह्मणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥५॥ ॥१२॥
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे।हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां ।माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां ।काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥२॥पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥३॥गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक ।तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥२॥तुका ह्मणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥२॥आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥४॥तुका ह्मणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥५॥रामचरित्र - अभंग ॥१४॥
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥२॥तुका ह्मणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥३॥
राम ह्मणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥१॥धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥राम ह्मणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥राम ह्मणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥३॥राम ह्मणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥४॥ऐसा राम जपे नित्य । तुका ह्मणे जीवन्मुक्त ॥५॥
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥तो हा न करी तें काई । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥सीळा मनुष्य जाली। ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥वानरां हातीं लंका । घेवविली ह्मणे तुका ॥३॥
राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१॥ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥२॥तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥जुन्हाट नागर नीच नवें । तुका ह्मणें म्यां धरिलें जीवें भावें ॥३॥
राम ह्मणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत ह्मणतां राम ॥२॥राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥३॥तुका ह्मणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥४॥
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेई आतां संवंघेसी तुटी ॥३॥
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥२॥तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥उदार्याची सीमा । काय वणूप रघुरामा ॥२॥तुका ह्मणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥३॥
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ।राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥२॥स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥३॥रावणेसी लंका। राम आपण जाला देखा ॥४॥ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥१॥आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जेजेकार आळंगिला भरत ॥ध्रु.॥करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥जालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका ह्मणे गाईवत्सें नरनारीबाळें ॥३॥
जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये। दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥२॥तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥३॥
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥२॥तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥३॥नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥४॥नामजप जीवन मुनिजना ॥ तुकयास्वामी रघुनंदना ॥५॥
मी तों अल्प मतिहीन । काय वणूप तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥२॥शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥३॥राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥ ॥१४॥श्लोकरूपी अभंग - ॥६॥
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना ।जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका ।मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥२॥हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी ।करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ।असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काइप ॥४॥दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ।तुका राहिला पायिं तो राख देव। असें मागतसे तुझी चरणसेवा ॥५॥
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे ।महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख ।लागलें मुनिवरां गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार ।जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाई ॥३॥असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनि भिक्तलोभा ।पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धसाधकांची ॥४॥करा वेगु हा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं ।म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥५॥
धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं ।मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥१॥न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंिद्रयां थोर घातीं ।जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥२॥असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता ।क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥३॥निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ यी भीत आहे ।तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भिक्त दूरी ।नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बिलीं साजिरीं मोरवीसें ।हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥२॥असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ।महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥३॥कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं। कसी वीट हे लाधली दैवांची।जया चिंतितां अिग्न हा शांति नीवे। धरा मानसीं आपला देहभाव ॥४॥मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय।तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥५॥
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अिग्न हा काष्ठ तेवीं ।घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं ।तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये ।धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें ।कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥४॥करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां ।तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥५॥
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ।असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों ।भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥२॥जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये ।करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥३॥ ॥६॥
सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धि बळ माझें ॥ध्रु.॥प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥३॥सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥तुका ह्मणे आतां करीं सोडवण । सर्वशिक्तहीन जालों देवा ॥५॥
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा ह्मणउनी ॥ध्रु.॥विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥तुका ह्मणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥तुका ह्मणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥४॥
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥१॥कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ कोंवळी ॥२॥तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥३॥
आह्मी उतराई । भाव निरोपूनि पायीं ॥१॥तुह्मी पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥आमचा हा नेम । तुह्मां उचित हा धर्म ॥२॥तुका ह्मणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥१॥विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥२॥तुका ह्मणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥३॥
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥२॥भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥तुका ह्मणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥
दास जालों हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ॥१॥तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ ।नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ऐकतां हरिकथा । भिक्त लागे त्या अभक्तां ॥२॥देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥हें सुख ब्रह्मादिकां । ह्मणे नाहीं नाहीं तुका ॥४॥
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥२॥तुका ह्मणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौयाशीचा ॥३॥
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥तुका ह्मणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥
द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥३॥तुका ह्मणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥
सुरवर येती तीथॉ नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥३॥तुका ह्मणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेइप कोटि ॥४॥
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका ह्मणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥
देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥तुका ह्मणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.