मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ११२४–१२२६

Tukaram Gatha, part 12

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग १२ — अभंग ११२४ ते १२२६.

कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥देव ह्मणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥तुका ह्मणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥२॥ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां ते गुण न सरती ॥३॥तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥२॥नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥तुका ह्मणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥१॥सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥२॥चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥३॥तुका ह्मणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥४॥
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥तुका ह्मणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥४॥
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥२॥नव्हे साच कांहीं कळों आलें मना । ह्मणोनि वासना आवरिली ॥३॥तुका ह्मणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥४॥
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका ह्मणे ॥४॥
जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आह्मां ॥१॥जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥२॥आह्मां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥३॥तुका ह्मणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥४॥
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥चोरा धरितां सांगे कुठो†याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥
धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥१॥सुखें करावें कीर्तन हषॉ गावे हरिचे गुण। वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥२॥हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका ह्मणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥३॥
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥तुका ह्मणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥
दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥हें चि वर्म आह्मां भाविकांचे हातीं । ह्मणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । ये†हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥तुका ह्मणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥३॥
वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥१॥करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥तुका ह्मणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥
ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण। भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धी ह्मणियारीं ॥२॥सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥३॥ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥४॥तुका ह्मणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥५॥
न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौ†याशीच्या ॥ध्रु.॥आणिकिया जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥३॥तुका ह्मणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥आणीक ही भोग आणिकां इंिद्रयांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥२॥रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां। न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥तुका ह्मणे कां रे नाशिवंतासाटीं। देवासवें तुटी करितोसी ॥४॥
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥काय आह्मां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥तुका ह्मणे लेइप अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥४॥
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥काय करावें प्रमाण । तुह्मी सांगा संतजन ॥ध्रु.॥मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥२॥तुका ह्मणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥सेतावर - अभंग ३
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ह्मणियारा ।सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥४॥बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागो†याच्या नेटें ॥६॥पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥९॥ऐसीये जोडी जो चुकला । तुका ह्मणे धिग त्याला ॥१०॥
वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥चोरासवें वाट ॥ चालोनि केलें तळपट ॥२॥ डोळे झांकुनि राती ॥कूर्पी पडे दिवसा जोती ॥३॥पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥फुटकी सांगडी । तुका ह्मणे न पवे थडी ॥५॥
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥गोफणेसी गुंडा घालीं पागो†याच्या नेटें। पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुद्धि व्हावीं दोनी ॥३॥खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देइप त्यासी ॥४॥तुका ह्मणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥ ॥३॥
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥तुका ह्मणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥उतराधिपदें - २२
क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥१॥खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥२॥गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥३॥
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥तुलसीमाला बभूत च†हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥कहे तुका जो साइप हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥३॥
मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥२॥कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥
चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥१॥काहे बडाई दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥२॥फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥३॥
हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥१॥मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥२॥देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥३॥
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥२॥कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥३॥
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥२॥तुका प्रभु दीनदयाला। वारि रे तुज पर हुं गोपाला ॥३॥
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥१॥अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥३॥
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥२॥ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥
आपे तरे त्याकी कोण बराई । औरनकुं भलो नाम घराई ॥ध्रु.॥काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥१॥बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥२॥काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥३॥काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥४॥कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥५॥
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥२॥देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥३॥
भले रे भाई जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥१॥तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥२॥कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥३॥
लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥१॥नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥२॥और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥३॥
काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥१॥माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥राना रंग डोंगरकी राई । कहे तुका करे इलाहि ॥३॥
काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥१॥बाप भाई लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥२॥काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥३॥
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥२॥कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोडहि हात ॥३॥
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥१॥कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥२॥कहे तुका वो संन्यास। छोडे आस तनकी हि ॥३॥
रामभजन सब सार मिठाई । हरि संताप जनमदुख राई ॥ध्रु.॥दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥
हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ध्रु.॥गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥२॥स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाई तुकयाका ॥३॥ ॥२२॥॥ साख्या ॥ ३० ॥
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय।भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज ।बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥
लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम ।माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥१॥
तुका पंखिबहिरन मानुं । बोई जनावर बाग ।असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥१॥
तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर ।तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥१॥
संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार ।चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥१॥
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम ।बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥१॥
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड ।हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥१॥
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख ।आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥१॥
कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार ।मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥१॥
तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥१॥
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख ।पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥१॥
कहे तुका जग भुला रे । कहएा न मानत कोय ।हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥१॥
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ।चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥१॥
तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये ।एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥१॥
तुका मा†या पेटका । और न जाने कोये ।जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥१॥
काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर ।कहे तुका तुम्हें सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका कठोर ॥१॥
भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये ।निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥१॥
फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद ।बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥१॥
तुका दास रामका । मनमे एक हि भाव ।तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥१॥
तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात ।धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥१॥
चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये ।तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥१॥
चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग ।पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥१॥
तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये ।दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥१॥
तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय ।उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराई ॥१॥
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय ।जबथे इच्छा नहिं मुई । तब तूं किया काय ॥१॥
तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक ।मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥१॥
ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास ।सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥१॥
कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास ।क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥१॥
तुका और मिठाई क्या करूं रे । पाले विकारपिंड ।राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥१॥ ॥३०॥
ह्मणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥लाहो घेइप हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि ह्मणसी ॥२॥पुरलासाटीं देहाडा। ऐसें न ह्मणें न ह्मणें मूढा ॥३॥नरदेह दुबळा । ऐसें न ह्मणें रे चांडाळा ॥४॥तुका ह्मणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥५॥
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥बहु धड जरी जाली ह्मैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥तुका ह्मणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येईल कळों ॥३॥
नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥३॥
नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह कांहीं मनीं ॥१॥ऐसें मी हें नाहीं बोलत नेणता । आनुनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥नाम ह्मणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलो नये ॥२॥तुका ह्मणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥
सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥काय करूं बहु गुंतलों आतां । नये सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥होते गांठी तें सरलें येतां । आणीक माथां रीण जालें ॥२॥सोंकरिलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥तुका ह्मणे काही न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥५॥
न मनावे तैसे गुरूचे वचन । जेणें नारायण अंतरे ते।आड आला ह्मुन फोडियेला डोळा । बिळनें आंधळा शुक्र केला ॥१॥करी देव तरी काय नव्हे एक । कां तुह्मी पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या ।अवघे चि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला ।बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥३॥गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती ।तया दिले ते कोणासी नाही । अवघा अंतर्बाही तोचि जाला ॥४॥देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें ।तुका ह्मणे हा जाणतो कळवळा । ह्मणोनि अजामेळा उद्धरिलें॥५॥
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥ध्रु.॥केलें ते क्रियमाण । जालें तें संचित ह्मण । प्रारब्ध जाण । उरवरित उरले तें ॥२॥चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं। रसने अनावरी । तुका ह्मणे ढुंग वाहे ॥३॥
अग्न तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें ।न चुके संसारिस्थति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाती एके रितीं ।साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥१॥नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें ।जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें ॥ध्रु.॥शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ दान व्रत आचरण।यज्ञ नाना मन बुद्धी । भोगाभोग तेथें न चुकती प्रकार जन्मजरादुःखव्याधि।साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥२॥घोकितां अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष होय वज्रलेपो भविष्यति ।दूषणाचें मूळ भूषण तुका ह्मणे । सांडीं मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया िस्थती ॥३॥
नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥ह्मणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका ह्मणे। विठ्ठलनामें आटलें ॥३॥
नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥देहाचा निग्रही त्याचें तो सांभाळी । मग नये किळ अंगावरी ॥ध्रु.॥आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥तुका ह्मणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥३॥
सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागत चि बळ ॥१॥ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥करावी च चिंता। नाहीं लागती तत्वता ॥२॥तुका ह्मणे भावें । शरण ह्मणवितां बरवें ॥३॥
साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भंगपाळ ॥३॥सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥
मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आह्मां ॥२॥जीव शिव कां ठेवियेलीं नांवें । सत्य तुह्मां ठावें असोनियां ॥३॥सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आह्मां दारोदार हिंडविलें ॥४॥आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥तुका ह्मणे काय छायेचा अभिलाष। हंस पावे नाश तारागणीं ॥६॥
पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥२॥इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका ह्मणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥
पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥अवघियांचा विसर जाला। हा राहिला उदेग ॥२॥तुका ह्मणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें॥३॥
जाळा तुह्मी माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥२॥तुका ह्मणे मज तारीं गा विठ्ठला । नेणतां चि भला दास तुझा ॥३॥
याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥तुका ह्मणे यासी नांवाचा अभिमान। ह्मणोनि शरण तारी बळें ॥४॥
बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । ह्मणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥तुका ह्मणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥
देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥४॥
आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥नामें चि सिद्धि नामें चि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥ध्रु.॥चालिला पंथ तो पावईल ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥तुका ह्मणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥
निरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥ह्मणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥तुका ह्मणे देव अंतरे ज्यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥
तुजशीं संबंध चि खोटा । परता परता रे थोंटा ॥१॥देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥जेथें मुदल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥तुका ह्मणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥
या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों रिणकरी ॥१॥सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥एकें एक बुझाविसी । तुका ह्मणे ठक होसी ॥३॥
आह्मी जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥तुका ह्मणे आतां । नेघें सर्वस्व ही देतां ॥३॥
रिण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥हें कां नेणां पांडुरंगा । तुह्मी सांगतसां जगा ॥ध्रु.॥माझा संबंध तो किती। चुकवा लोकाची फजिती ॥२॥तुका ह्मणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥
नाहीं मागितला । तुह्मां मान म्यां विठ्ठला ॥१॥जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥तुका ह्मणे धरूनि हात । नाहीं नेले दिवानांत ॥३॥
तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥ह्मणोनि तुझ्या दारा । न येत ठकती दातारा ॥ध्रु.॥तुझी ठावी नांदनूक । अवघा बुडविला लोक ॥२॥तुका ह्मणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥३॥
बोलतों निकुरें । नव्हेत सलगीचीं उत्तरें ॥१॥माझे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥२॥तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
घडे
— घडते, शक्य होते
तुज
— तुला
माया
— भासमान करणारी शक्ती
देखे
— पाहतो
तैसें
— तसे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
वैराग्य
— आसक्ती सुटणे
ठायीं
— ठिकाणी
केवीं
— कसे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा