न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे मायां ॥ध्रु.॥गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥त्याच्या दुःखेंपणें आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥तुका ह्मणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥
ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥जयासी नावडे हरिनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥तुका ह्मणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥
ब्राह्मण तो याती अंतेज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥तुका ह्मणे गेल्या शडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्रह्मं चि तो ॥३॥
एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥परस्त्री मद्यपान। पेंडखान माजविलें ॥२॥तुका ह्मणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥२॥असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥३॥सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥४॥तुका ह्मणे दोन्ही । जवळी च लाभहानी ॥५॥
जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥नेदी कर्म घडों । कोठें आडराणें पडों ॥२॥तुका ह्मणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरि दंड तेणें ॥ध्रु.॥समय नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥तुका ह्मणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥३॥
घेसी तरी घेइप संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥करिसील तो करीं संतांचा सांगत । आणीक ते मात नको मना ॥२॥बैससी तरी बैस संतां च मधीं । आणीक ते बुद्धि नको मना ॥३॥जासी तरि जाइप संतांचिया गांवां । होईल विसावा तेथें मना ॥४॥तुका ह्मणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेइप ॥५॥
संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥४॥तुका ह्मणे तेथें आणिक नाहीं परी । ह्मणोनि भिकारी जालों त्यांचा ॥५॥
संतांचें सुख जालें या देवा । ह्मणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥तीथॉ त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥तुका ह्मणे ते बिळया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥
जो मानी तो देईल काई । न मनी तो नेईल काई ॥१॥आह्मां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥आध्येन तें जना काई । जल्पें वांयांविण ठायीं ॥२॥वंदी निंदी तुज तो गा। तुका ह्मणे पांडुरंगा ॥३॥
भावबळें कैसा जालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळंगुनि मिठी देइन पांयीं ॥२॥चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥तुका ह्मणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥
कृपाळु ह्मणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥तुका ह्मणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल या भूक डोळियांची ॥४॥
सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥१॥आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥३॥तुझे आह्मी दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥तुका ह्मणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देइप ॥४॥१२४२. कइप मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥ह्मणऊनि मुख अवलोकितों पाय । हे चि मज आहे थोरी आशा ॥२॥माझिया मनाचा हा चि विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥३॥तुका ह्मणे मज होईल भरवसा । तरलों मी ऐसा साच भाव ॥४॥
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । भिक्तकाजें विठ्ठला ॥१॥भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । ह्मणोनियां घरीं। गौळियांचे अवतार ॥२॥केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा। तुका ह्मणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥३॥
गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । ह्मणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाटीं आपुलिया ॥ध्रु.॥चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । ह्मणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥२॥हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका ह्मणे दावी । रूप तें चि अरूपा ॥३॥
आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥१॥हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥तुका ह्मणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥३॥
हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥तुका ह्मणे निवांत राहीं। पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥॥ भुपाळ्या ॥ अभंग ॥ ८ ॥
बोलोनि दाऊं कां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । ह्मणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥तुका ह्मणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥
ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कंा हे कळवळ तुज उमटे चि ना ॥१॥आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आस चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी। ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥तुका ह्मणे खरा न पवे चि विभाग । धिकारितें जग हें चि लाहों हिशोबें ॥३॥
कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शिक्त जालीसी दिसे ॥१॥लाज येते मना तुझा ह्मणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥तुका ह्मणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥
जळो माझें कर्म वायां केली कटकट । जालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥आता पुढें धीर काय देऊं या मना। ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥गुणवंत केलों दोष जाणायासाठीं। माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥तुका ह्मणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥
कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका ह्मणे नास दिसे जाल्या वेचाचा ॥३॥
जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥आतां मज साहे येथें करावें देवा । तुझी घेइप सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥२॥तुका ह्मणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥३॥
न संगतां तुह्मां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तइपपासूनिया समर्थ ॥२॥तुका ह्मणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥
तुजसवें आह्मीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहऴिवशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥न कळतां संग जाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥तुका ह्मणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचुनियां विनटलों ।३॥ ॥८॥
रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचे नी ॥१॥त्यांचा महिमा काय वणूप मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥तुका ह्मणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥
हरि हरि तुह्मीं ह्मणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । ह्मणावा पतित वेळोवेळां ॥२॥तुका ह्मणे ही तंव कृपेचा सागर । नामासाटीं पार पाववील ॥३॥
ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥तुका ह्मणे ग्रामपशु । केला नाशु अयुषा ॥३॥
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥नाठेळाची भिक्त कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥तुका ह्मणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धंदधंद सिंदळीचे ॥३॥
कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥१॥आतां जागें रे भाई जागें रे । चोर निजल्या नाडूनि भागे रे ॥ध्रु.॥आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥२॥तुका ह्मणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥३॥
मुदल जतन जालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥२॥तुका ह्मणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥
मज अंगाच्या अनुभवें । काई वाईट बरें ठावें ॥१॥जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥तुका ह्मणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥
पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥भावा ऐसी क्रिया राखे । खोटएा खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥तुका ह्मणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥
मोल देऊनियां सांटवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यें पुण्य विशेषता ॥ध्रु.॥हरितील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥तुका ह्मणे पाहा ऐसें जालें जन । सेवाभिक्तहीन रसीं गोडी ॥३॥
बहुक्षीदक्षीण । आलों सोसुनियां वन ॥१॥विठोबा विसांवया विसांवया । पडों देइप पायां ॥ध्रु.॥बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥२॥केली तुजसाटीं । तुका ह्मणे येवढी आटी ॥३॥
कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥तुका ह्मणे इच्छा । तैसा करीन सरिसा ॥३॥
तुमची तों भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रह्मज्ञान ॥१॥आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥तुह्मां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥तुका ह्मणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥३॥
आहे तें चि आह्मी मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुह्मां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥तुका ह्मणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥३॥
आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥आहे तैसा असो आतां चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥तुका ह्मणे आह्मांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥
आह्मांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥करूनि ठेलों जीवेंसाटीं । होय भेटी तोंवरि ॥ध्रु.॥लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥तुका ह्मणे अवकाशें । तुमच्या ऐसें होवया ॥३॥
बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥तुका ह्मणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥३॥ ॥१२॥
कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥उद्वेग ते वांयांविण। कैंचा सीण चिंतनें ॥२॥तुका ह्मणे गेला भ्रम । तुमच्या धर्में पायांच्या ॥३॥
संसार तो कोण देखे । आह्मां सखे हरिजन ॥१॥काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥तुका ह्मणे ब्रह्मरसें । होय सरिसें भोजन ॥३॥
पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उसीर कां आझूनि लावियेला ॥१॥येइप गा विठ्ठला येइप गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥ध्रु.॥काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥तुका ह्मणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥
आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥ह्मणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥२॥तुका ह्मणे कोणी न संगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥
जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥ह्मणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥इंिद्रयांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोई अहंकार ॥२॥तुका ह्मणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥३॥
धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥तुका ह्मणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥
लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥तुका ह्मणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥
निंचपण बरवें देवा । न चले कोणाचा ही दावा ॥१॥महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरि ॥२॥तुका ह्मणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥
उष्टएा पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥तुका ह्मणे एक नारायण घ्याइप । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥
आवडीच्या मतें करिती भजन । भोग नारायणें ह्मणती केला ॥१॥अवघा देव ह्मणे वेगळें तें काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥लाजे कमंडल धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणा ॥२॥शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥तुका ह्मणें यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥
ह्मणतां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज ह्मणसी हीना ॥१॥काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥तुका ह्मणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥
रिद्धिसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥पुसाल तरि आह्मां वैकुंठींचा वास । परि नाहीं राहएास ठाव कोठें ॥२॥तुका ह्मणे आह्मी राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥
घरोघरीं अवघें जालें ब्रह्मज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥तुका ह्मणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥४॥
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥अवघीं च तीथॉ व्रतें केले याग । अवघें चि सांग जालें कर्म ॥२॥अवघें चि फळ आलें आह्मां हातां । अवघें चि अनंता समर्पिलें ॥३॥तुका ह्मणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥४॥
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ॥२॥उंच निंच परिवार देवी। धन्या ठावी चाकरी ॥३॥झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥पावेल तो पैल थडी । ह्मणों गडी आपुला ॥५॥तुका ह्मणे उभायानें । कोण खरें मानितसे ॥६॥
अवघ्या उपचारा । एक मनें चि दातारा ॥१॥घ्यावी घ्यावी हे चि सेवा । माझी दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥अवघियाचा ठाव। पायांवरि जीवभाव ॥२॥चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥
आली सलगी पायांपाशीं । होइल तैसी करीन ॥१॥आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥अवघ्या निरोपणा भाव । हा चि ठाव उरलासे ॥२॥तुका ह्मणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥
देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोहा नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदझाडां ॥२॥तुका ह्मणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥
देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं किळवर ओंवाळूनि ॥१ ॥नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥तुका ह्मणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥
देह नव्हे मी हें सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥ह्मणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥तुका ह्मणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥३॥
पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥तुका ह्मणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । ह्मणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥नागवला अल्प लोभाचिये साटीं । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥तुका ह्मणे हात झाडिले परत्रीं । श्रम तो चि श्रोत्रीं वेठी केली ॥३॥
अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें पूजन ॥१॥उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥तुका ह्मणे वृत्ति । अविट हे सहज िस्थति ॥३॥
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥घडे कासयानें सेवा । सांग ब्रह्मांडाच्या जीवा ॥ध्रु.॥सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥तुका ह्मणे भावें । शरण ह्मणवितां बरवें ॥३॥
बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥जालें आह्मांसी जीवन । धणीवरि हें सेवन ॥ध्रु.॥सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥२॥तुका ह्मणे अच्युता । आमचा कल्पतरु दाता ॥३॥
त्रुशाकाळें उदकें भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥मिष्टान्नाचा योग भुके । ह्मणतां चुके पुरेसें ॥२॥तुका ह्मणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥
कुचराचे श्रवण । गुणदोषांवरि मन ॥१॥असोनियां नसे कथे । मूर्ख अभाग्य तें तेथें ॥ध्रु.॥निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥२॥पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥३॥हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥४॥फजीत करूनि सांडीं । तुका करी बोडाबोडी ॥५॥
जग तरि आह्मां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥येतो हिताचा कळवळा । पडती हातीं ह्मुन काळा ॥ध्रु.॥नाहीं कोणी सखा । आह्मां निपराध पारिखा ॥२॥उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥३॥
सोपें वर्म आह्मां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रह्मरस ॥ध्रु.॥पुढती घडे चढतें सेवन आगळें । भिक्तभाग्यबळें निर्भरता ॥२॥उपजों चि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥३॥तुका ह्मणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥तुका ह्मणे अगीविण । बीजें वेगळीं तों भिन्न ॥३॥
थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥अर्थ अनर्थ सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥उपाधिवेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥
काय हएाचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥केलें हरिकथेनें वाज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥तुका ह्मणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥भांडार त्या दातियाचें। मी कैचें ये ठायीं ॥२॥सादावीत गेला तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥गुंपोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥तुका ह्मणे कळा । देवाविण अमंगळा ॥३॥
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥व्यभिचारा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥तुका ह्मणे जिणें । शर्त्तीविण लाजिरवाणें ॥३॥
मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरिती तीं गोडी ॥ध्रु.॥रिद्धिसिद्धी देसी। आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥तुका ह्मणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥वरि ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥तुका ह्मणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥२॥तुका ह्मणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नर्का जाणें ॥३॥
तों च हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥२॥तुका ह्मणे देहसंबंध संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥३॥
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कारीये कारणा । पावावया उपासना । ब्रह्मस्थानीं प्रस्थान ॥१॥एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तो चि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥आवशक तो शेवट । मागें अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥
वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥तपतिर्थाटणें तुझे मूर्तिदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥लोहागांवीं स्वामींच्या अंगावर ऊन पाणी घातलें - तो अभंग ॥१॥
जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥३॥तुका ह्मणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥ ॥१॥
अभक्त ब्राह्मण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥तुका ह्मणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥नामदेव व पांडुरंग यांनी स्वप्नांत येऊन स्वामींस आज्ञा केली कीं कवित्व करणें - ते अभंग ॥२॥
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥३॥
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२२॥नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥ ॥२॥
त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरि वाहे ॥ध्रु.॥पापपुण्यात्मयाच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती। तेथें सत्तानायेका ॥२॥तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥३॥
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदांतर तेवी ॥२॥तुका ह्मणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥
अनुभवें अनुभव अवघा चि साधिला । तरि िस्थरावला मनु ठायीं ॥१॥पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥एक चि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥तुका ह्मणे आह्मी जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥
ऐसिया संपत्ती आह्मां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥काम तो कामना भोगीतसे देवा । आिंळगणें हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धि ॥२॥तुका ह्मणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥मोडलें हें स्वामी ठावाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥२॥तुका ह्मणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥३॥
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरि ते ॥१॥जयाचा विभाग तयासी च फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥शूर तो ओळखे घायडायहात । येरां होइल मात सांगायासी ॥२॥तुका ह्मणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जाणवसा ॥३॥
याजसाटीं केला होता आटाहास्ये । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥आदिअंताठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे मग उंचासनी ॥४॥भावारूढ तुका जाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥५॥
सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥२॥नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरिकथेचा ॥३॥काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥तुका ह्मणे आह्मी खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥५॥
जाणपण बरें देवाचे शिरीं । आह्मी ऐसीं बरीं नेणतीं च ॥१॥देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥आशंकेचा बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरि खेळा समबुद्धि ॥२॥तुका ह्मणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशीं खेळा ठाव जाला ॥३॥
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥उदयीं च अस्त उदयो संपादला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥स्वामीस संतांनीं पुसलें कीं तुह्मांस वैराग्य कोण्या प्रकारें जालें तें सांगा - ते अभंग ॥ ३ ॥
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥वचन मानिलें नाहीं सहुर्दाचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥बुडविल्या वहएा बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥तुका ह्मणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२०॥
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥बहु पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥३॥िप्रयापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥तोंड न दाखवे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाटीं लागला ॥५॥पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज ह्मणें यासाटीं ॥६॥सहज वडिलां होती सेवा । ह्मणोनि पूजितों या देवा । तुका ह्मणे भावा । साटीं झणी घ्या कोणी ॥७॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.