बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥तुका ह्मणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥ ॥३॥१३३१. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥तुका ह्मणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥जालों बरा बळी। गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥आधीं आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु.॥ब्रह्मज्ञानाचें कोठार । तें हें निश्चयें उत्तर ॥२॥तुका ह्मणे ते उन्मनी । नास कारया कारणीं ॥३॥
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥भक्तीची जोडी ते उखत्या चि साटीं । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥तुका ह्मणे आलें सांचत सांचणी । आजि जाली क्षणी एकसरें ॥३३॥
नाहीं येथें वाणी । सकळां वणाअ घ्यावी धणी ॥१॥जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥निवडिलें वरळा भूस । सार आइन जिनस ॥२॥तुका ह्मणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥अळंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरिकथा ॥२॥तुका ह्मणे उपज विल्हाळे आवडी । करावा तो घडी घडी लाहो ॥३॥
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥तया मूर्ख ह्मणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥दावितिया वाट। वेठी धरूं पाहे चाट ॥२॥पुढिल्या उपाया । तुका ह्मणे राखे काया ॥३॥
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥
वेश वंदाया पुरते । कोण ब्राह्मण निरुते ॥१॥ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥तुका ह्मणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥
ज्या ज्या आह्मांपाशीं होतील ज्या शिक्त । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥तुका ह्मणे येथें उरला विठ्ठल । खाये बोले बोल गाये नाचे ॥३॥
आह्मी आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥पायीं गोविली वासना । तुश केलें ब्रह्मज्ञाना ॥ध्रु.॥येतां पाहें मुळा । वाट पंढरीच्या डोळां ॥२॥तुका ह्मणे स्थळें । मग मी पाहेन सकळें ॥३॥
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥आतां सांडोनि भोजन । भिके जावें वेडेपणें ॥ध्रु.॥उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥तुका ह्मणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥
धन्ये शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥ऐकिलें तें चि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥तुका ह्मणे भाव । त्याचा तो चि जाणां देव ॥३॥
जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं ॥१॥संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥तुका ह्मणे जोडी । हाय जतन रोकडी ॥३॥
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व घेती सकळ ॥१॥कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥सर्व सत्ता करितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥२॥तुका ह्मणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥३॥
पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥तुका ह्मणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥तुका ह्मणे जाणे । ऐसे भले ते शाहाणे॥३॥
रूप नांवें माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयावरि ॥१॥सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥पोटा आलें तिच्या लोळे मांडएांवरि । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥२॥तुका ह्मणे भक्तीसाटीं हरिहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥३॥
लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥आह्मां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रह्मज्ञान आत्मिस्थति ॥ध्रु.॥वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥२॥तुका ह्मणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥३॥
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शिक्त ॥१॥फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥अल्पें तो संतोषी। स्थळीं सांपडे उदेसीं ॥२॥सहज संगम । तुका ह्मणे तो उत्तम ॥३॥
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥तुका ह्मणे थीत । दुःख पाववावें चित्त ॥३॥
भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥पिकविलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥
लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥१॥ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येइल सीण ॥ध्रु.॥वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥३॥
कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥१॥मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥जाणणियासाटीं। भय सामावलें पोटीं ॥२॥तुका ह्मणे चेता । होणें तें तूं च आइता ॥३॥
भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥१॥ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥एक हाकेचा कपाटीं। तेथें आणीक नाद उठी ॥२॥अभ्रें धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥३॥
नव्हों आह्मी आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥तुका ह्मणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ति सोहळा मान ॥१॥येरयेरांवरी जायांचें उसिणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥२॥तुका ह्मणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥
मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥तुका ह्मणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥
नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचे ॥ध्रु.॥कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥तुका ह्मणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥३॥
नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥नको गुंपों भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥तुका ह्मणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥
अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं ॥१॥सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥सांडिलें तें मांडे। आघ्र उरल्या काळें दंडे ॥२॥तुका ह्मणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥
न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥सिकविल्या गोटी । शिकोनि धरितील पोटीं ॥२॥तुका ह्मणे सीण । होइल अनुभवाविण ॥३॥
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥होणार तें घडो होणाराच्या गुणें । होइल नारायणें निर्मिलें तें ॥ध्रु.॥व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥तुका ह्मणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खर ॥३॥
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥तुका ह्मणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होइल डोळे ॥३॥
अभिन्नव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥पूजा तरि चित्तें कल्पा तें ब्रह्मांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥तुका ह्मणे माझा अनुभव यापरि । डोई पायांवरि ठेवीतसें ॥३॥
नटनाटए तुह्मी केलें याच साटीं । कवतुकें दृष्टी निववावी ॥१॥नाहीं तरि काय कळलें चि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥अभेद चि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥तुका ह्मणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥३॥
रवीचा प्रकाश । तो चि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥आतां हा चि वसो जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में याच्यानें ॥ध्रु.॥सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका ह्मणे जवळी ॥३॥
ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तो चाकरी । पारपत्य सकळ ॥२॥नाहीं आडकाटी । तुका ह्मणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगी च पायीं घालावी ॥३॥
उपकारी असे आरोणि उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥लाभावरि घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळ चि रासि गुणांची च ॥२॥तुका ह्मणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
कोणा पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥तुका ह्मणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥
क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला ॥१॥न घडावी पायीं तुटी । मन मुठी घातलें ॥ध्रु.॥विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥तुका ह्मणे मागें भ्यालों ॥ तरीं जालों जागृत ॥३॥
आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥२॥तुका ह्मणे खळ । हो क्षणें चि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥३॥
धरितां ये पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥२॥तुका ह्मणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥
नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि जरवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं िस्थरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें। अंगा येती उद्गार ॥२॥सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका ह्मणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥
रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतितां विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥तुका ह्मणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥
वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥तुका ह्मणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥
आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥२॥आनेत्रींचें तीथाअ नासे । तीथाअ वसे वज्रलेप ॥३॥पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥४॥ऐसें हरें गिरिजेप्रति । गुहए िस्थती सांगितली ॥५॥तुका ह्मणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥६॥
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥२॥भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४ ॥घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥तुका ह्मणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥तुका ह्मणे नुपजे दोष करा घोष आनंदे ॥३॥
पाहा रे हें दैवत कैसें । भिक्तपिसें भाविक ॥१॥पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥शुल्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरि न धरी ॥२॥तुका ह्मणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं ॥३॥
बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्न भिन्ना चांचपडो ॥ध्रु.॥कोण होईल तो ब्रह्मांडचाळक । आपणें चि हाके देईल हाके ॥२॥तुका ह्मणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैसें दिलें साचें करोनियां ॥१॥दुजियासी तंव अकळ हा भाव । करावा तो जीव साक्ष येथें ॥ध्रु.॥एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभाव प्रमाणें चि ॥२॥तुका ह्मणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुह्मी देवा ॥३॥
अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥आठवें विसरु पडियेला मागें । आलें तें चि भागें यत्न केलें ॥२॥तुका ह्मणे माझा विनोद देवासी । आह्मी तुह्मां ऐसीं दोन्ही नव्हों ॥३॥
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥तैसे आह्मी नेणों पालटों च कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥तुका ह्मणे तुह्मां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥
सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥गोत पति विश्वंभरीं । जाला हरि सोयरा ॥ध्रु.॥वोळखी ते एका नांवें । इतरभावें खंडणा ॥२॥तुका ह्मणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥३॥
मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥अंधारानें तेज नेलें। दृष्टीखालें अंतर ॥२॥तुका ह्मणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥
कवेश्वरांचा तो आह्मांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होइल तोंड ॥ध्रु.॥सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतंत ते गुण जैसेतैसे ॥२॥सेव्य सेववता न पडतां ठावी । तुका ह्मणे गोवी पावती हीं ॥३॥
वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥ह्मणऊनि मना लावावी कांचणी । इंिद्रयांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥तुका ह्मणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥
माया साक्षी आह्मी नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥सत्याचिये साटीं अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥पोंभाळिता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥तुका ह्मणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाडएासी देव साक्षी केला ॥३॥
संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नासा मूळ ॥२॥तुका ह्मणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥
संतांच्या धीकारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥तुका ह्मणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघें बरें ॥३॥
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धि ॥१॥नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥तुका ह्मणे कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥न ह्मणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥देव चि बरे देव चि बरे । तुका ह्मणे खरे तुह्मी ॥३॥
काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥१॥फावल्या या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें विहडतसे ॥२॥एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥३॥
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला किळवरा पाठी ॥१॥नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥काडिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥याजसाटीं हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥तुका ह्मणे अनुभव बरा । नाहीं तरी सास्त होय चोरा ॥५॥
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥१॥प्रेमाछंदें नाचे डोले । हारपला देहभाव ॥ध्रु.॥एकदेशीं जीवकळा। हा सकळां सोयरा ॥२॥तुका ह्मणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥३॥
न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सम चि ॥२॥तुका ह्मणे नारायणीं । पावो वाणी विसांवा ॥३॥
प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावतसे ॥१॥करितां घाईळाचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥२॥तुका ह्मणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥
आशा ते करविते बुद्धीचा लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥आपला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन गोही ॥ध्रु.॥नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें त्या निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥अंधळ्यानें नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥३॥
जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥१॥संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥लटिकियाचा अभिमान । होता सीण पावित ॥२॥तुका ह्मणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥३॥
निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥२॥तुका ह्मणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥३॥
भिक्ष्यापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥देवा पायीं नाहीं भाव। भिक्त वरी वरी वाव । समर्पिला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हें चि अभाग्य रोकडें । मूळ आणि विश्वास ॥२॥काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका ह्मणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥
भावबळें विष्णुदास । नाहीं नास पावत ॥१॥योगभाग्यें घरा येती । सर्व शिक्त चालत ॥ध्रु.॥पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥तुका ह्मणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥
कोरडएा गोठी चटक्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥घरोघरीं सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥२॥तुका ह्मणे आपुल्या मति । काय रितीं पोकळें ॥३॥
नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥१॥देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें ॥ध्रु.॥लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥२॥तुका ह्मणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥३॥
सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥ऐसें बरवें वचन । करितां तें नारायण ॥ध्रु.॥असे प्रारब्ध नेमें । श्रमुचि उरे श्रम ॥२॥सुख देते शांती । तुका ह्मणे धरितां चित्तीं ॥३॥
काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥सातांपांचांचें गोठलें । प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोगा सांभाळीं ॥२॥फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका ह्मणे मधीं । कोठें नेघें विसावा ॥३॥
न लगे देशकाळ । मंत्रविधानें सकळ । मनें चि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥येतो बैसलिया ठाया । आसणें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥कल्पनेचा साक्षी । तरि आदरें चि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥२॥घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव। तुका ह्मणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥३॥
मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥होइन धरणेकरी। मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥तुका ह्मणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥
मिटवण्याचे धनी । तुम्ही वेवसाय जनीं ॥१॥कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥२॥तुका ह्मणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥३॥
समर्पिली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥धार अखंडित । ओघ चालियेला नित ॥२॥पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥३॥
अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरिचें नाम ॥१॥धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांटविलें ॥ध्रु.॥शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥२॥तुका ह्मणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥३॥
बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥पाहेन ते पाय । जोंवरि हे दृष्टि धाय ॥२॥तुका ह्मणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥३॥
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥तुका ह्मणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥३॥
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥२॥तुका ह्मणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविते ॥३॥
आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥२॥चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥इंिद्रयें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देइप पायीं ॥४॥तुका ह्मणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुलती ह्मणऊनि ॥५॥
आह्मां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला ॥१॥कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥परतें कांहीं नेणें दुजें। तत्त्वबीजें पाउलें ॥२॥तुका ह्मणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥३॥
साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार खया मोलें ॥१॥भोगाचे सांभाळीं द्यावें किळवर । संचित चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥महत्त्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥२॥तुका ह्मणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥३॥
निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥नाहीं चालों येती सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥त्यागा नांव तरी निर्विषयवासना । कारीयेकारणांपुरते विधि ॥२॥तुका ह्मणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंशीं ॥३॥
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं या विषयांचे ॥१॥ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥२॥तुका ह्मणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥
कां जी धरिलें नाम । तुह्मी असोनि निष्काम ॥१॥कोणां सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥आवडीनें नाचें। आहे तरी पुढें साचें ॥२॥तुका ह्मणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥३॥
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥तुका ह्मणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥३॥
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥तुका ह्मणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥त्याचें खरें ब्रह्मज्ञान । उदासीन देहभावीं ॥२॥तुका ह्मणे सत्य सांगें । योत रागें येती ते ॥३॥
माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥तुज देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥आह्मां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥३॥तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥४॥तुका ह्मणे तुझ्या अंगीं । मज देखिल लागलीं औघीं ॥५॥
आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥समाधानासाटीं बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥२॥जिवाहूनि मज ते चि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥३॥तुका ह्मणे माझें तो चि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥४॥
आशा हे समूळ खाणोनि काडावी । तेव्हां चि गोसावी व्हावें तेणें ॥१॥नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हां चि निघावें सर्वांतूनि ॥२॥तुका ह्मणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥३॥
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥तुका ह्मणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥
नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥१॥सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आह्मीं ॥ध्रु.॥गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥२॥तुका ह्मणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.