मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग १४३४–१५३६

Tukaram Gatha, part 15

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग १५ — अभंग १४३४ ते १५३६.

नाम ह्मणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥१॥जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥२॥काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥३॥आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं। फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥४॥जगीं प्रसिद्ध हे बोली। नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥५॥जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥६॥काय सांगों ऐशीं किती । तुका ह्मणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥७॥
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोवाठीं ॥१॥लक्ष चौ†याशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवें चि तें ॥२॥तुका ह्मणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥
गासी तरि एक विठ्ठल चि गाइप । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा श्रम करिसी वांयां ॥२॥तुका ह्मणे किती करावी फजिती । लाज नाहीं नीतिं निलाजिरा ॥३॥
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥शत्रु तो म्यां केला न ह्मणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका ह्मणे ॥३॥
आह्मांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड किळकाळासी ॥ध्रु.॥अबद्ध वांकडें जैशातैशा परी । वाचे हरि हरि उच्चारावें ॥२॥तुका ह्मणे आह्मां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥३॥
जीव तो चि देव भोजन ते भिक्त । मरण तेचि मुक्ति पापांडएाची ॥१॥पिंडाच्या पोषकी नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥मना आला तैसा करिती विचार । ह्मणती संसार नाहीं पुन्हा ॥२॥तुका ह्मणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारी ॥३॥
भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥तुका ह्मणे हें तों आहे तयां ठावें । जिहीं एक्या भावें जाणीतलें ॥४॥
आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दरुषण धीर त्याचें ॥२॥तुका ह्मणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥३॥
चिंतनें सरे तो धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥संसारसिंधु नाहीं हरिदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥२॥तुका ह्मणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥३॥
मोक्षाचें आह्मांसी नाहीं अवघड । तो असे उघाड गांठोळीस ॥१॥भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुख ॥२॥तुका ह्मणे सुखें देइप संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥३॥॥१२॥
अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो चि बाधी ॥१॥बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥२॥तुका ह्मणे विश्वीं विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥३॥
एकाचिया घाटएा टोके । एक फिके उपचार ॥१॥ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥ध्रु.॥एकाचेथें उिच्छष्ट खाय । एका जाय ठकोणि ॥२॥तुका ह्मणे सोपें । बहु रूपें अनंत ॥३॥
कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥१॥ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥मृत्याचिये अंगीं छाये । उपाये चि खुंटतां ॥२॥तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥३॥
ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥अवघें साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥२॥तुका ह्मणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥३॥
आचरती कर्में । तेथें काळें कर्मधर्में ॥१॥खेळे गोविळयांसवें । करिती तें त्यांचें साहावें ॥ध्रु.॥यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥२॥तुका ह्मणे चोरी । योगियां ही सवें करी ॥३॥
नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तो चि ठेला ॥१॥आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ध्रु.॥आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ॥२॥तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥३॥परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारितां ॥४॥कोळियाची कीर्ति वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥५॥सगुण निर्गुण तुज ह्मणे वेद । तुका ह्मणे भेद नाहीं नांवा ॥६॥
भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥सरितां वाहाळां गंगे सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥आणीक अमुप होती तारांगणें । रविशशिमानें लेखूं नये ॥४॥तुका ह्मणे नाहीं नरमता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥
आणीक कांहीं मज नावडे मात । एक पंढरिनाथ वांचुनिया ॥१॥त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥तुका ह्मणे संत ह्मणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥३॥
ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥१॥एका अनुसरल्या काज । अवघें जाणें पंढरिराज ॥ध्रु.॥तर्कवितर्कासी वाव न लागे सायासीं ॥२॥तुका ह्मणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥तो चि ध्यावा एका चित्तें । करूनि रितें किळवर ॥ध्रु.॥षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥तुका ह्मणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥तुका ह्मणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतां ॥ध्रु.॥शब्दज्ञानी एक आपुल्याला मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥२॥तुका ह्मणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥३॥
देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥१॥या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धी द्वारीं । कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥२॥तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे रे मेघशामा । तुका ह्मणे आह्मां । जन्म गोड यासाटीं ॥३॥
न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं या केशवाविण दुजें ॥१॥काय उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु.॥आणिकाची कीर्ती नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥२॥न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें कोठें ॥३॥न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥४॥तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥५॥
नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥२॥तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥३॥
या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥१॥मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥२॥तुका ह्मणे चित्त । शुद्ध करावें हे नित ॥३॥
कुशळ वक्ता नव्हे जाणीव श्रोता । राहे भाव चित्ता धरूनियां ॥१॥धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रह्म तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥२॥जप तप ध्यान नेणे याग युक्ती । कृपाळु जो भूतीं दयावंत ॥३॥तुका ह्मणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥४॥
काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥याकारणें माझ्या विठोबाची कीर्ति । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥२॥तुका ह्मणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तें चि खरें ॥३॥
घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥काढावें आइतें। तें चि जोडावें स्वहितें ॥२॥तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥ह्मणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥२॥तुका ह्मणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥
कथा करोनिया द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥१॥रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥तुका ह्मणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥३॥
नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥वाखाणी अद्वैत भिक्तभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता ॥ध्रु.॥अहं ब्रह्म ह्मणोनि पाळित पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥२॥वेदबाहए लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥३॥तुका ह्मणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥
वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥२॥आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥३॥तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥४॥
तीर्थांचे मूळ व्रतांचें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरिये ॥१॥तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥जीवांचें जीवन सुखाचें सेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥२॥जनाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥३॥सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तें चि असे ॥४॥तुका ह्मणे नाहीं श्रुती आतुडलें । आह्मां सांपडलें गीती गातां ॥५॥
माझे मनोरथ पावले सिद्धी । तइप पायीं बुद्धि िस्थरावली ॥१॥समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं सामावलें ॥४॥तुका ह्मणे माप भरी आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥
कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहें ॥ध्रु.॥अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥२॥तुका ह्मणे जिव्हाश्रवणाच्या द्वारें । माप भरा वरें सिगेवरि ॥३॥
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें वाव घेती ॥१॥कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥तुका ह्मणे भय उपजलें मना । घेइप नारायणा कडिये मज ॥३॥
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥केला आतां अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥संसाराचा नाहीं पांग । देव सांग सकळ ॥२॥तुका ह्मणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥३॥
कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥२॥तुका ह्मणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥३॥
गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥तैसें जाणा ब्रह्मज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु.॥रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥२॥अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचें चि नाम ॥३॥तुका ह्मणे तारा । नाव तंबु†याच्या सारा ॥४॥
नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥तुका ह्मणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥३॥
आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥१॥तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥गांवाखालील वाहाळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥तुका ह्मणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥३॥
आशाबद्ध वक्ता । भय श्रोतयाच्या चित्ता ॥१॥गातो तें चि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥ध्रु.॥जालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ॥२॥तुका ह्मणे गोणी । माप आणि रितीं दोन्ही ॥३॥
तक्र शिष्या मान । दुग्धा ह्मणे नारायण ॥१॥ऐशीं ज्ञानाचीं डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥२॥रसनाशिश्नाचे अंकित । तुका ह्मणे वरदळ िस्पत ॥३॥
ब्रह्मचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥तुका ह्मणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥
निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांटवावा ॥ध्रु.॥नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंिद्रयें दमी ॥२॥तुका ह्मणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥३॥
जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥१॥आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥शुद्ध नाहीं चित्त । परी ह्मणवितों भक्त ॥२॥मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझें तुका ॥३॥
नाशवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥नामें चि तारिले कोटएान हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुह्मी मनीं आठवाना ॥२॥तुका ह्मणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाटीं ॥३॥
आळवितां बाळें । मातेतें सुख आगळें ॥१॥द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥३॥नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥४॥तुका ह्मणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥५॥
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥१॥कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥२॥व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥३॥तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥
देवासाटीं जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥तुका ह्मणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥४॥
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अतु । होय शुद्ध न पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥१॥बाहएरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥हस्ती परदळ तें भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयेच्या ॥३॥पिटितां घणें वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार। बुडे माथां भार । तुका ह्मणें वाहोनि ॥५॥
आह्मी वीर जुंझार । करूं जमदाढे मार । तापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥जाला हाहाकार । आले हांकीत जुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाणें । गरुडटके पताका ॥२॥तुका ह्मणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ। भोग आह्मां आमचा ॥३॥
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोल ॥ध्रु.॥जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥तुका ह्मणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥
आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥१॥सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥२॥एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥३॥तुका ह्मणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥४॥
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥कां हें आवडलें िप्रयापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥४॥कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न ह्मणती ॥५॥काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥६॥काय करिती हे बांधलिया काळें । तुका ह्मणे बळें वज्रपाशीं ॥७॥
जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥ऊर्ध पुंड भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे किळकाळ तया भेणें ॥२॥तुका ह्मणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥
जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥२॥तुका ह्मणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥३॥
मानी भक्तांचे उपकार । रुणीया ह्मणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥ह्मणोनि जया जे वासना ॥ ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तींचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥२॥ह्मणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवडे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥४॥पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥५॥भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । ह्मणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥त्यांचा आह्मांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥रिद्धिसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥२॥तुका ह्मणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥३॥
ठाकलोंसें द्वारीं । उभें याचक भीकारी ॥१॥मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥याचकाचा भार । नये घेऊं येरझार ॥२॥तुका ह्मणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥३॥सदाशिवावर अभंग ॥ २ ॥
काय धर्म नीत । तुह्मां शिकवावें हित ॥१॥अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रह्मांड सकळा ॥ध्रु.॥नाम महादेव । येथें निवडला भाव ॥२॥तुका ह्मणे वेळे । माझें तुह्मां कां न कळे ॥३॥
भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥२॥तुका ह्मणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥३॥॥२॥
ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥कैसें तुह्मां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥२॥तुका ह्मणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुह्मां ॥३॥ठळक मजकूर
तुह्मी बैसलेती निर्गुणाचे खोळे । आह्मां कां हे डोळे कान दिले ॥१॥नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥आपुले पोटीं तों राखियेला वाव । आह्मांसी कां भाव अल्प दिला ॥२॥तुका ह्मणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥माझी कोणी न धरो शंका ।हो कां लोकां निद्वपद्व ॥२॥तुका ह्मणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥३॥
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥२॥तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥३॥
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥४॥
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥तुह्मी सांभाळिलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥तुका ह्मणे काळ । आतां करूं न शके बळ ॥३॥
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥२॥तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥१॥भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥तुका ह्मणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥१॥बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥तुका ह्मणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरि ॥२॥तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥१॥येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥तुका ह्मणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥वा†या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ति मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥तुका ह्मणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥
पटे ढाळूं आह्मी विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥बिळवंत जेणें रचिलें सकळ । आह्मां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥तुका ह्मणे आह्मी देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥
सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा ।विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥ह्मणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं ।नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें ।नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण ।काना मात्र वांयांविण । तुका ह्मणे बिंदुलीं ॥३॥
हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥३॥येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥४॥तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥
नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥तुका ह्मणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥
घटीं अलिप्त असे रवि । अिग्न काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥२॥तुका ह्मणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥३॥
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥तुका ह्मणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥तुका ह्मणे सवें । आतां असिजेत देवें ॥३॥
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥३॥
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥२॥पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥३॥
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥१॥माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥तुका ह्मणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मि एकमय ॥३॥
कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥१॥ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥२॥तुका ह्मणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥३॥
परमार्थी तो न ह्मणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥३॥
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥तुका ह्मणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥ह्मणोनियां ऐसे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥२॥पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥तुका ह्मणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥
पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥१॥जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥तुका ह्मणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥नासिवंत आटी िप्रयापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥३॥
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥तुका ह्मणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥
तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥३॥तुका ह्मणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥
भिक्त तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥तुका ह्मणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व
ऐसें
— असे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तैसें
— तसे
तुज
— तुला
ठायीं
— ठिकाणी
जैसें
— जसे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
माया
— भासमान करणारी शक्ती
काई
— काय
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
दिठी
— दृष्टी, नजर
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
कीजे
— केले जाते
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
घडे
— घडते, शक्य होते

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा