पापी ह्मणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥२॥तुका ह्मणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥पुण्य पर्वकाळ तीथॉ ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥२॥सेळ्या मेंढएा गाई सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥तुका ह्मणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥४॥
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥तुका ह्मणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥१॥ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥
येणें बोधें आह्मी असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥१॥आह्मी भूमीवरी एक दइवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥न चळे हा मंत्र न ह्मणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥तुका ह्मणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥४॥
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभक्त । कृपावंत मानसीं ॥१॥ह्मणवी ह्मणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥तुका ह्मणे निर्विकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥जाला हरिनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥२॥तुका ह्मणे बळी । आह्मी लडिवाळें आळीं ॥३॥
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥२॥तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ब्रह्मांडनायका । भक्तजनाच्या पाळका ॥२॥जीवांचिया जीवा । तुका ह्मणे देवदेवा ॥३॥
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥१॥लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
आपुलिया लाजा । धांवे भक्तांचिया काजा ॥१॥नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥२॥उभा कर कटीं । तुका ह्मणे याजसाटीं ॥३॥
साधावया भिक्तकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥तुका ह्मणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥३॥
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥१॥तैसें करीं वो माझे आई । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥तुका ह्मणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥
हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बिळभद्र ॥४॥तुका ह्मणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥
ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥१॥जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥२॥तुका ह्मणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥३॥
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥२॥रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥२॥तुका ह्मणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥३॥
ह्मणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥तुका ह्मणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥३॥
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥२॥तुका ह्मणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥तुका ह्मणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥२॥तुका ह्मणे वेषधारी ॥ हिजडएा नारी नव्हती ॥३॥
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥फुगातें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥२॥गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥३॥मुलाम्याचें नाणें । तुका ह्मणे नव्हे सोनें ॥४॥
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥तुका ह्मणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥३॥
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाई नारदासी गौरवीन ॥२॥गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोईिरया ॥६॥परसो भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळांसी ॥७॥चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबाई ॥९॥आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥तुका ह्मणे माझा बिळया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥१२॥
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥१॥पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥जप तप अनुष्ठान। पोटासाटीं जाले दीन ॥२॥पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥३॥पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥४॥आरत्या ॥ १३ ॥
जगदेश जगदेश तुज ह्मणती । परि या जनामाजी असशील युक्ति ।पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल ह्मणतां सर्वथा ॥ध्रु.॥आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भिक्त जवळी च दोन्ही ।नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रह्मांडीं संपुष्टशयनीं ॥२॥असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें ।भक्ता शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥३॥एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें।तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥४॥सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख।जाणों ह्मणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका ह्मणे शरण आलों मज राखें ॥५॥
दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । ह्मणोनि तूज येणें जालें गोपाळा ।भिक्तप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥गुण रूप नाम नाहीं जयासी। चिंतितां तैसा चि होसी तयांसी ।मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी। असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती ह्मणती तुज विश्वंभरा।जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥३॥संतां महंतां घरीं ह्मणवी ह्मणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा ।सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून ।उत्पित्त प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥
काय तुझा महिमा वणूप मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती ।पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥१॥जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा ।श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी ।विष्णूचें पूजन एकाभावेंसी। नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं ।धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीथॉ मिळन वास तयांचा वाहाती ॥४॥देव भक्त तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भिक्त हे जनीं ।जड जीवां उद्धार होय लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥५॥
कंसरायें गर्भ वधियेले सात । ह्मणोनि गोकुळासी आले अनंत ।घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्त ॥१॥जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें ।दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥२॥अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार ।पांगलीं साई अठरा करितां वेव्हार । तो विळतसे गौळियांचें खिल्लार ॥३॥तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट ।गिळिलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उिच्छष्ट ॥४॥महिमा वणूप तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती ।भावेंविण कांहीं न चले चि युक्ति । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा ।अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा। गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना ।मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥२॥विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ति मनोहरा ॥३॥गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी।नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥४॥सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता।उत्पित्तपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥५॥
पंढरि पुण्यभूमी भीमा दिक्षणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी ।उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर ।मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी ।जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥आषाढी कार्तिकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर ।पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥४॥हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आह्मांलागिं हें सोपें ।ह्मणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥५॥
अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी ।उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता। आरती ओंवाळीन तुह्मां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ ।दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरि । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं ।राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं ।गोपाळ गाईवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी ।गुण मी काय वणूप मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देइप चरणीं ॥५॥
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख ।मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति ह्मणती तयां न कळे गति ।भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥२॥ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती। बोडके नग्न एक निराहार ईित ।साधनें योग नाना तपें दारुण किती। सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक। कामिनी मनमोहना रूप नाम अनेक ।नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्त्वासि तत्त्वसार मूळ जालासी बीज ।खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥२॥घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची ।कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥३॥सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं ।आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥वर्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥५॥
महा जी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा ।परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुह्मा जी त्रिनयना ॥१॥जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा। आरती ओंवाळिन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥रुद्र हें नाम तुह्मां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं ।उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव देइप कैलासीं ॥२॥त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान ।करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥३॥बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं ।हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥४॥पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात। करिती विज्ञापना परिसावी हे मात ।अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥५॥
अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद ।एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजि दावी अनंत हे छंद ॥१॥जय जया गणपती ओंवाळित आरती । साजिया सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां ।घातले तोडरीं हो भक्तजनपाळका । सहस्र नाम तुज भुक्तिमुक्तिदायका ॥२॥सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें ।रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रह्मांडबीजें ॥३॥वर्णिता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें ।अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूर्तिमंत होय भक्तीच्या सुखें ॥४॥विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव देइप तया नाचतां पुढें ।धूप दीप पंचारति ओंवाळिन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥५॥
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥ओंवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टि समाधि तुकया लागली पायीं ॥५॥
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥१॥ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥काय महिमा वणूप आतां सांगणें तें किती । कोटि ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥२॥राही रखुमाई दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळिति ठायीं ठायीं ॥३॥तुका ह्मणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥॥१३॥
धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥२॥तुका ह्मणे धन्य आह्मां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥
गाऊं वाणूं तुज विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥न करीं तपसाधनें रे मुक्तीचे सायास । हा चि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥तुका ह्मणे आह्मां प्रेमा उणें तें काई । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥३॥
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥या संतांसी निरवीं हें मज देइप । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥तुका ह्मणे आतां उदार होइप । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ २४ ॥
शोधितां चि नये । ह्मणोनि वोळगतों पाये ॥१॥आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥२॥विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥३॥
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥ह्मणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥२॥तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥३॥
ह्मणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥२॥तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥१॥
घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मिस्थती सांडवीन ॥१॥ब्रह्मभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥भिक्तभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥धन्य ह्मणवीन येहे लोकीं लोकां । भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥५॥
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध जालों ॥१॥आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥३॥
तुह्मी सनकादिक संत । ह्मणवितां कृपावंत ॥१॥एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥२॥तुका ह्मणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥
आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥२॥त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥३॥तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥४॥
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥२॥तुका ह्मणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥३॥
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥२॥तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥३॥
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥२॥तुका ह्मणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥३॥
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी ह्मणे त्वरे ॥ध्रु.॥मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभिस्त ॥२॥मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥३॥चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥दुरूनि येतां दिसे दृष्टी। धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥३॥
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ।सुख वाटे मना । डोळे बाहएा स्फुरती ॥ध्रु.॥उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥२॥तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥३॥
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥१॥तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ।फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥३॥
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ।कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥२॥मुखशुद्धि तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥३॥
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि ।तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥२॥देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥३॥
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥१॥सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥३॥अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥५॥
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आह्मी करूं कोठें ॥ध्रु.॥न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्टध देखोनि जग ॥२॥तुका ह्मणे तुह्मी दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥३॥
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥२॥आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥३॥
आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥अंतकाळीं विठो आह्मांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥१॥नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥२॥देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥३॥
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥१॥कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनीं ॥२॥तुका ह्मणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥३॥
वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥१॥येथूनियां आह्मां जाणें निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥२॥कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका ह्मणे ॥३॥ ॥२४॥शखे १५७१ एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्यद्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥१॥
जाती पंढरीस । ह्मणे जाइपन तयांस ॥१॥तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥चंद्रभागे न्हाती । तुका ह्मणे भलते याती ॥३॥
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥१॥तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥अंतर व्यापी बाहे । धांडोळितां कोठें नोहे ॥२॥योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥३॥दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥५॥
ज्याचे गर्जतां पवाडे । किळकाळ पायां पडे ॥१॥तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥चिंतितां जयासी । भुक्तिमुक्ति कामारी दासी ॥२॥वैकुंठासी जावें । तुका ह्मणे ज्याच्या नांवें ॥३॥
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥१॥तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥२॥तुका ह्मणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥३॥
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥२॥तुका ह्मणे नारायण । येता गोळ्या वारी वाण ॥३॥
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥२॥तुकयाबंधु ह्मणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥कोठें गुंतलासी भिक्तप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चालवे ॥२॥काय माझे तुज गुण दोष दिसती । ह्मणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका ह्मणे ॥४॥
परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टएा हाते नुडवी काग ॥२॥जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥४॥
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥२॥तुका ह्मणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥३॥
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥२॥खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥४॥तुका ह्मणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥५॥
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥२॥तुका ह्मणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥
पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥२॥तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥३॥
पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥तुका ह्मणे तो चि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥२॥तुका ह्मणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥३॥
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥काय तुझें आह्मां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥२॥तुका ह्मणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥तुका ह्मणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥२॥तुका ह्मणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥३॥
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥१॥उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥२॥तुका ह्मणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥३॥
काम क्रोध आह्मी वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥२॥तुका ह्मणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥३॥
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥तुका ह्मणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥
पंढरी पंढरी । ह्मणतां पापाची बोहोरी ॥१॥धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥रिद्धिसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥२॥अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ ह्मणे तुका ॥३॥
भार घालीं देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥२॥तुका ह्मणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥२॥तुका ह्मणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥३॥
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥२॥हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥आह्मी विठ्ठलाचे वीर । फोडूं किळकाळाचें शीर ॥५॥घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥६॥तुका ह्मणे मुक्ती । नाहीं आस चि ये चित्ती ॥७॥
आनुहातीं गुंतला नेणे बाहए रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥तुका ह्मणे बाहए रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥४॥
ब्रह्मरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥१॥नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥२॥तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥तुका ह्मणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ ४॥
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥तुका ह्मणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥
आह्मां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥१॥देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥२॥तुका ह्मणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥३॥
परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥१॥घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥तुका ह्मणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥
समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें ॥१॥वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥२॥ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥तुका ह्मणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥४॥
हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥२॥तुका ह्मणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.