सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥तुका ह्मणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥मागें पुढें ॠण । तुका ह्मणे फिटे हीण ॥३॥
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥होवा वाटे जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥३॥अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ १ ॥
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अिग्नज्वाळा ॥२॥आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥तुका ह्मणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥
बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥१॥जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥४॥नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥६॥तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥शूरा उल्हास अंगीं । गांढएा मरण ते प्रसंगीं ॥३॥शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥१॥न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥तुका ह्मणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥
कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥पंढरीस कोणी जाती वारेकरी । होईन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥३॥तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥
अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं ।तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥१॥माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥२॥एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी ।ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥३॥
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास ।कृपणें सांचलें धन। न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ।घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती ।वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ।तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥२॥भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोळिया।हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें ।तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥३॥
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥तुका ह्मणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥१॥भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंिद्रयें सुनाट दाही दिशा ॥३॥वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥तुका ह्मणे मन इंिद्रयांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥५॥
स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी बुडती ॥१॥जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख। देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणि करियेले ॥३॥अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका ह्मणे साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥५॥
माझिया संचिता । दृढ देखोनि बिळवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान करिसी लोकांत ॥ध्रु.॥तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून। तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भिक्तसोई । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका ह्मणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥
लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥काय ब्रह्मज्ञान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥२॥ आत्मिस्थतीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ।३॥रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें। तुका ह्मणे द्यावें । दरुषण पायांचें ॥५॥
तुझा ह्मणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें॥१॥तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥तुका ह्मणे आतां । अभय देइप पंढरिनाथा ॥३॥
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥तरि मी पाहेन पाहेन। तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥२॥पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥३॥करी गोपीचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥४॥तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका ह्मणें आतां। कोड पुरवीं हें माझें ॥५॥
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देइप मज हरी कृपादान ॥१॥प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥तुका ह्मणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥१॥न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाई ॥२॥तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥विसरला मरण। त्याची नाहीं आठवण ॥२॥देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥३॥
माझें मज आतां न देखें निरसतां । ह्मणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥१॥असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥पापपुण्यें श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव ।विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव ।ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव ।ह्मणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥२॥तनमनइंिद्रयें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा ।हातीं अधीन तें मज काई । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं ।मायामोहपाश करीं विष तैसें । तुका ह्मणे माझ्याठायीं ॥३॥
तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥२॥तुका ह्मणे आहार जाला। हा विठ्ठला आह्मांसी ॥३॥
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥१॥क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥अवघे खेळों अवघ्यामधीं । डाइप न पडों ऐसी बुद्धि ॥२॥तुका ह्मणे वांचवीत। आह्मां सत्ता समर्थ ॥३॥
एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग ह्मणऊनि॥१॥उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥२॥तुका ह्मणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ ह्मुण ॥३॥
बोलविले जेणें । तो चि याचें गुहए जाणे ॥१॥मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता॥३॥मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥त्याच्या साच गाई ह्मैसी । येणें खेळावें मातीशीं ॥६॥तुका ह्मणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥
कां हो तुह्मी माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥२॥तुका ह्मणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥३॥
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥ध्रु.॥समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥तुका ह्मणे तरी ह्मणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥
नये पुसों आज्ञा केली एकसरें । आह्मांसी दुसरें आतां नाहीं ॥१॥ज्याचें तो बिळवंत सर्व निवारिता । आह्मां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥२॥तुका ह्मणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥३॥
बिळवंत आह्मी समर्थाचे दास । घातली या कास किळकाळासी ॥१॥तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥तुका ह्मणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥२॥तुका ह्मणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥३॥
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥ह्मणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥तुका ह्मणे खूण न कळे चि निरुती। सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥
आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥मनाचा स्वभाव इंिद्रयांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥तुका ह्मणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥परउपकार घडे तो भला । नाठएाळ तया दया नाहीं ॥३॥जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा॥४॥हित तें अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥५॥
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१॥पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु.॥भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माउली ॥५॥दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार । करीं माझा अंगीकार तुका ह्मणे विठ्ठले ॥७॥
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥तुका ह्मणे मज तुझाची भरवसा । ह्मणऊनि आशा मोकलिली ॥७॥
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची ।कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥निष्काम वेडें ह्मणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा ।माझें ऐसें तया न ह्मणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी ।कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । ह्मणती या चांडाळा काय जालें ॥२॥गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आई बाप भाऊ ।घरी बाइल ह्मणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥जन्मोनि जाला अवघियां वेगळा । ह्मणोनि गोपाळा दुर्लभ तो ।तुका ह्मणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥४॥
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥२॥तुका ह्मणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।३॥
अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तें च ब्रह्म नव्हे ॥२॥काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥तुका ह्मणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥
नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥मज मूढा शिक्त कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि ध्यान ॥३॥तुका ह्मणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥
देवासी लागे सकळांसी पोसावें । आह्मां न लगे खावें काय चिंता ॥१॥देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥देवासी उत्पित्त लागला संहार । आह्मां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥तुका ह्मणे आह्मी भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥२॥आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका ह्मणे ॥४॥
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ ।ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥आह्मी धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥२॥न चले तुझे कांहीं त्यास । आह्मी बळकाविले दोष ॥३॥दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुहए भाव शुद्ध बोला ॥१॥अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥२॥तुका ह्मणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥३॥
नव्हे ब्रह्मज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥१॥काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥अमृताची गोडी पुढिलां सांगसी। आपण उपवासी मरोनिया ॥३॥तुका ह्मणे जरि राहील तळमळ । ब्रह्म तें केवळ सदोदित ॥४॥
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥२॥परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥तुका ह्मणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥४॥
परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका ह्मणे॥४॥
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥२॥मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥४॥तुका ह्मणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥१॥जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥गांवा जातों ऐसें । न लगे ह्मणावें तें कैसें ॥३॥स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥४॥तुका ह्मणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥
आण काय सादर । विशीं आह्मां कां निष्ठ ॥१॥केलें भक्त तैसें देइप । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥२॥काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥तुका ह्मणे मधीं । आतां तोडूं भेद बुद्धी ॥५॥
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥आह्मी सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥२॥इंिद्रयांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥न पडे विसर । तुझा आह्मां निरंतर ॥४॥प्रेम एकासाटी। तुका ह्मणे न वेचे गांठी ॥५॥
आह्मी पतित ह्मणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥आह्मां न तारावें तुह्मी काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥अन्याय एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि ।काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥पोहएा अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥३॥प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काई ।तुका ह्मणे तरी आह्मां का न कळे । तरलों किंवा आह्मी नाहीं ॥४॥
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥बघुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले॥४॥तुका ह्मणे हा भक्तांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥
तुजविण देवा । कोणा ह्मणे माझी जिव्हा ॥१॥तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥२॥तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर॥३॥
आह्मां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम॥१॥न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां॥ध्रु.॥आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥२॥तुका ह्मणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥
काय सांगू आता संताचे उपकार। मज निरंतर जागविसी।।१।।काय दयावे त्यासी व्हावे उतराई। ठेवीना हापायी जीव थोडा।।धृ़़।।सहज बोलणे हीत उपदेश। करुनी सायास शिकवीती।।२।।तुका म्हणे वत्स धेनू वेद चित्ती। तैसे मज येती सांभाळीती।।३।।रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥तुह्मांआह्मांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका ह्मणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥
नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥१॥वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२ ॥तुका ह्मणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥३॥
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा॥१॥एका नामा नाहीं ताळ । केली सहजरांची माळ ॥ध्रु.॥पाहों जातां घाई। खेळसी लपंडाई ॥२॥तुका ह्मणे चार । बहु करितोसी फार॥३॥
लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥लावियेलीं चाळा। बहू दावूनि पुतळा ॥२॥तुका ह्मणे हात । आह्मी अवरिली मात ॥३॥
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥थोंटा झोडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥तुका ह्मणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥
लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥१॥ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥तुका ह्मणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥जागा ना निजेला । धाला ना भुकेला ॥२॥न पुसतां भलें । तुका ह्मणे बुझें बोलें ॥३॥
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥कोपेल तो घनी । तुका ह्मणे नेणें मनीं॥३॥
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥२॥तुका ह्मणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥१॥ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥२॥ठाव पुसी सेणें । तुका ह्मणे खुंटी येणें ॥३॥
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥२॥तुका ह्मणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें॥३॥
कवतुकवाणें । बोलों बोबडएा वचनें ॥१॥हें तों नसावें अंतरीं । आह्मां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥स्तुति तैसी निंदा । माना सम चि गोविंदा ॥२॥तुका ह्मणे बोलें । मज तुह्मी शिकविलें॥३॥
असो मागें जालें । पुडें गोड तें चांगलें ॥१॥आतां माझे मनीं । कांहीं अपराध न मनीं ॥ध्रु.॥नेदीं अवसान । करितां नामाचें चिंतन ॥२॥तुका ह्मणे बोले । तुज आधीं च गोविलें॥३॥
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥३॥जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥६॥तुका ह्मणे काय । तुजविण प्राण राहे॥७॥
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥३॥तुका ह्मणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां॥ध्रु.॥घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥तुका ह्मणे याच्या उपकारासाटीं । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥४॥
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥तुका ह्मणे ऐसी धरितों वासना । होइप नारायणा साहए मज ॥३॥
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥ह्मणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चित्ता उपजतें॥२॥तुका ह्मणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार टाकीं ॥३॥
आतां नको चुकों आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाईच्या ॥१॥आचरावे दोष हें आह्मां विहित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुह्मांकून घडेल ते ॥२॥तुका ह्मणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥३॥
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी त्याचा ॥ध्रु.॥आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥तुका ह्मणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥२॥तुका ह्मणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥
बांधे सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतयानें भाव पालटिला ॥ध्रु.॥घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई घेऊनि फोडी ॥२॥तुका ह्मणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥
कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥१॥कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ध्रु.॥कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥२॥कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥३॥सर्वां ठायीं तूं चि सर्व ही जालासी। तुका ह्मणे यासी दुजें नव्हे ॥४॥
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें।रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें ।जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें ।सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥१॥अवघा आह्मां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा ।न लगे जाणें कोठें कांहीं च करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥वाचा बोले ते तुझे चि गुणवाद। मंत्रजप कथा स्तुति ।भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती ।चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति ।देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ति॥२॥जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें।महाल मंदिरें माडएा तनघरें । झोपडएा अवघीं देव देवाइलें।ऐकें कानीं त्या हरिनामध्वनी । नाना शब्द होत जाले ।तुका ह्मणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले ॥३॥काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥तुका ह्मणे स्तुति योग्य नाहीं परी । तुह्मां लाज थोरी अंकिताची ॥४॥
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठ पांडुरंगा ॥ध्रु.॥यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥२॥तुका ह्मणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥३॥
हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची॥१॥ह्मणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥निर्लज्ज भोजें नाचत रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥तुका ह्मणे विकलें देवें। आपण भावें संवसाटी ॥३॥
साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥२॥भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥३॥मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥तुका ह्मणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी ।वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां॥१॥आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं ।तो आह्मी भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥सहजरमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला ।तेथें माझी देहबुद्धि तें काई । थोर मी अन्यायी तुका ह्मणे ॥३॥
कृष्ण गातां गीतीं कृष्ण ध्यातां चित्तीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । ह्मणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥ओविये दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥२॥नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥३॥तुका ह्मणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देइप भेटे पांडुरंगे ॥१॥बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥एक वेळ माझा धरूनि आठव । तुका ह्मणे ये वो न्यावयासी ॥६॥
अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी॥१॥काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा ।करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥ध्रु.॥भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥२॥बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ॥३॥किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥मज राखें आतां । तुका ह्मणे पंढरिनाथा ॥५॥
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥१॥करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥देऊळ नव्हे घर । प्रपंच परउपकार ॥२॥विधिसेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥हत्या क्षत्रधर्म । नव्हे निष्काम तें कर्म ॥४॥तुका ह्मणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥५॥
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥सहज ते िस्थति। उपदेश परयुक्ति ॥२॥तुका ह्मणे भाव । जवळी धरूनि आणी देव॥३॥
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें वाटोळें ॥२॥तुका ह्मणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥३॥
अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥१॥जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥ध्रु.॥सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥२॥तुका ह्मणे आह्मी करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां द्यावें उघडा रे कान ॥३॥
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां। अल्पसुखासाटीं पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥२॥तुका ह्मणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें॥३॥
जाय परतें काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसें तरी ॥१॥कां हो केलें तुह्मी निष्ठ देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥भाग्यवंत त्यांसी सांगितल्या गोष्टी । तें नाहीं अदृष्टीं आमुचिया ॥२॥तुका ह्मणे तुह्मापासूनि अंतर । न पडे नाहीं िस्थर बुद्धि माझी ॥३॥
अनुभवें कळों येतें पांडुरंगा । रुसावें तें कां गा तुह्मांवरी ॥१॥आवरितां चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझें मज ॥ध्रु.॥अंतरीं संसार भिक्त बाहएात्कार । ह्मणोनि अंतर तुझ्या पायीं ॥२॥तुका ह्मणे काय करूं नेणें वर्म । आलें तैसें कर्म सोसूं पुढें ॥३॥
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥चुकलासी ह्मणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥तुका ह्मणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुह्मी ॥३॥
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥ह्मणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥पुढें चढे हात। त्याग मागिलां उचित ॥२॥तुका ह्मणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥
अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥१॥हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥२॥आठवूनि एका । उडी घाली ह्मणे तुका ॥३॥
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥तोडिलिया बळें। वांयां जाती काचीं फळें ॥२॥तुका ह्मणे मन । तेथे आपुलें कारण ॥३॥
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥सुख दुःख साहे । हर्षामषाअ भंगा नये ॥२॥तुका ह्मणे जीवें । आधीं मरोनि राहावें॥३॥
धांवे माते सोई । बाळ न विचारितां कांहीं ॥१॥मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥२॥तीविन तें नेणें । आणीक कांहीं तुका ह्मणे ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.