मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग १९४९–२०५०

Tukaram Gatha, part 20

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग २० — अभंग १९४९ ते २०५०.

आह्मां अराणूक संवसारा हातीं । पडिली नव्हती आजिवरी ॥१॥पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामें ॥ध्रु.॥वोडवलें ऐसें दिसतें कपाळ । राहिलें सकळ आवरोनि॥२॥मागें पुढें कांहीं न दिसे पाहातां । तेथूनियां चिंता उपजली ॥३॥तुका ह्मणे वाट पाह्याचें कारण । येथीचिया हिंणें जालें भाग्य ॥४॥
बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥तुटातें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥२॥बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥३॥काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका ह्मणे ॥४॥
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥२॥चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥तुका ह्मणे आसे लागलासे जीव । ह्मणऊनि कींव भाकीतसें ॥४॥ ॥१९॥व संत परत आले त्यांची भेट झाली ते अभंग ११
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥२॥तुका ह्मणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥३॥
घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥१॥बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्त ॥२॥तुका ह्मणे पेणी । येतां जातां दिवस गणीं॥३॥
आजि दिवस धन्य । तुमचें जालें दरुषण ॥१॥सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥आइकतों मन। करूनि सादर श्रवण ॥२॥तुका ह्मणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥३॥
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥ध्रु.॥पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥२॥तुका ह्मणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥३॥
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥२॥तुका ह्मणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा॥३॥
आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी जालें मन कल्पवेना ॥१॥आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या जाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥२॥माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होइल समाचार सांगती तो ॥३॥तुका ह्मणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥४॥
आजि बरवें जालें । माझें माहेर भेटलें ॥१॥डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥धन्य जालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥२॥इच्छेचें पावलों । तुका ह्मणे धन्य जालों॥३॥
वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥१॥माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥स्नेहें भूक तान । विसरती जाले सीण ॥२॥तुका ह्मणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें॥३॥
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या ॥१॥सांगितला आधीं आइकों निरोप । होइल माझा बाप पुसें तों तें ॥२॥तुका ह्मणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥काय सांगों सुख जालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥तुका ह्मणे यांच्या उपकारासाटीं । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥३॥
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥तुका ह्मणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥३॥ ॥११॥पत्राचे अभंग समाप्त । ३६ । १९ । ११ ॥ ६६॥
मना एक करीं । ह्मणे जाईन पंढरी । उभा विटेवरी। तो पाहेन सांवळा ॥१॥करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरि कृष्ण गोविंदा ॥ध्रु.॥लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देइप उचित॥२॥नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका ह्मणे मळी । सांडूनियां अंतरी ॥३॥
न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी ।जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥१॥भाविक गे माये भोळें गुणाचें। आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी ।ह्मणतां वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥२॥चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं ।करूनियां साटी। चित्त प्रेम दोहींची ॥३॥जया रूप ना आकार । धरी नाना अवतार ।घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥४॥ऐसा भक्तांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं ।नाहीं तुका ह्मणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥५॥
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥तुका ह्मणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥
आनंदाच्या कोटी । सांटवल्या आह्मां पोटीं ॥१॥प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥२॥थडी आहिक्य परत्र । तुका ह्मणे सम तीर ॥३॥
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्त्वता ॥१॥पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥जेणों त्याच्या वाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥२॥तुका ह्मणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥३॥
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥विंचु हाणें नांगी। अग्न लावी आणिकां अंगीं ॥२॥तुका ह्मणे जाती । नरका पाउलीं चालती ॥३॥॥६॥स्वामींनीं स्त्रीस उपदेश केला ते अभंग ॥ ११ ॥
पिकल्या सेताचा आह्मां देतो वांटा । चौधरी गोमटा पांडुरंग ॥१॥सत्तर टके बाकी उरली मागे तो हा । मागें झडले दाहा आजिवरी ॥ध्रु.॥हांडा भांडीं गुरें दाखवी ऐवज । माजघरीं बाजे बैसलासे ॥२॥मज यासी भांडतां जाब नेदी बळें । ह्मणे एका वेळे घ्याल वांटा ॥३॥तुका ह्मणे िस्त्रये काय वो करावें । नेदितां लपावें काय कोठें ॥४॥
करितां विचार अवघें एक राज्य । दुजा कोण मज पाठी घाली ॥१॥कोण्या रीती जावें आह्मी वो पळोनि । मोकळ अंगणीं मागें पुढें ॥ध्रु.॥काय तें गव्हाणें हिंडावीं वो किती । दूत ते लागती याच पाठी ॥२॥कोठें याची करूं केलों कुळवाडी । आतां हा न सोडी जीवें आह्मां ॥३॥होऊनि बेबाख येथें चि राहावें। देईल तें खावें तुका ह्मणे ॥४॥
नागवूनि एकें नागवीं च केली । फिरोनियां आलीं नाहीं येथें ॥१॥भेणें सुती कोणी न घेती पालवीं । करूनियां गोवी निसंतान ॥ध्रु.॥एकें तीं गोविलीं घेऊनि जमान । हांसतील जन लोक तयां ॥२॥सरले तयांसी घाली वैकुंठीं । न सोडी हे साटी जीवें जाली ॥३॥तुका ह्मणे जालों जाणोनि नेणती । सांपडलों हातीं याचे आह्मी ॥४॥
आतां तूं तयास होई वो उदास । आरंभला नास माझ्या जीवा ॥१॥जरूर हें जालें मज कां नावडे । उपास रोकडे येती आतां ॥ध्रु.॥बरें म्या तुझिया जीवाचें तें काय । व्हावें हें तें पाहें विचारूनि ॥२॥तुज मज तुटी नव्हे या विचारें । सहित लेकुरें राहों सुखें ॥३॥तुका ह्मणे तरी तुझा माझा संग । घडेल वियोग कधीं नव्हे ॥४॥
काय करूं आतां माझिया संचिता । तेणें जीववित्ता साटी केली ॥१॥न ह्मणावें कोणी माझें हें करणें । हुकुम तो येणें देवें केला ॥ध्रु.॥करूनि मोकळा सोडिलों भिकारी । पुरविली तरी पाठी माझी ॥२॥पाणिया भोंपळा जेवावया पानें । लाविलीं वो येणें देवें आह्मां ॥३॥तुका ह्मणे यासी नाहीं वो करुणा । आहे नागवणा ठावा मज ॥४॥
नको धरूं आस व्हावें या बाळांस । निर्माण तें त्यांस त्यांचें आहे ॥१॥आपुला तूं गळा घेइप उगवूनि । चुकवीं जाचणी गर्भवास ॥ध्रु.॥अवेज देखोनि बांधितील गळा । ह्मणोनि निराळा पळतुसें ॥२॥देखोनियां त्यांचा अवघड मार । कांपे थरथर जीव माझा ॥३॥तुका ह्मणे जरी आहे माझी चाड । तरी करीं वाड चित्त आतां ॥४॥
भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीर्ति जगामाजी ॥१॥ह्मणे मेलीं गुरें भांडीं नेलीं चोरें । नाहींत लेंकुरें जालीं मज ॥ध्रु.॥आस निरसूनि कठिण हें मन । करीं वो समान वज्र तैसें ॥२॥किंचित हें सुख टाकीं वो थुंकोनि । पावसील धनी परमानंद ॥३॥तुका ह्मणे थोर चुकती सायास । भवबंद पाश तुटोनियां ॥४॥
ऐक हें सुख होईल दोघांसी । सोहळा हे ॠषि करिती देव ॥१॥जडितविमानें बैसविती मानें । गंधर्वांचें गाणें नामघोष ॥ध्रु.॥संत महंत सिद्ध येतील सामोरे । सर्वसुखा पुरे कोड तेथें ॥२॥आलिंगूनि लोळों त्यांच्या पायांवरी । जाऊं तेथवरी मायबापें ॥३॥तुका ह्मणे तया सुखा वणूप काय । जेव्हां बापमाय देखें डोळां ॥४॥
देव पाहावया करीं वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥१॥दिन शुद्ध सोम सकाळीं पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥द्विजां पाचारूनि शुद्ध करीं मन । देइप वो हें दान यथाविध ॥२॥नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥तुका ह्मणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे आह्मां ॥४॥
सुख हें नावडे आह्मां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥भूक तान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आह्मांसी पाषाणाहूनि हीन ॥२॥सोइरे सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥३॥तुका ह्मणे आह्मां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥
गुरुकृपे मज बोलविलें देवें । होईल हें घ्यावें हित कांहीं ॥१॥सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥होई बळकट घालूनियां कास । हा चि उपदेश तुज आतां ॥२॥सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राह्मणाचें॥३॥वैष्णवांची दासी होइप सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥४॥पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला॥५॥तुका ह्मणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥६॥ ॥११॥
खडा रवाळी साकर । जाला नामाचा चि फेर ।न दिसे अंतर । गोडी ठायीं निवडितां ॥१॥तुह्मी आह्मी पांडुरंगा । भिन्न ऐसें काय सांगा ।जाळविलें जगा । मी हें माझें यासाटीं॥ध्रु॥पायीं हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं ।मुसे आल्यावरी। काय निवडे वेगळें ॥२॥निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं ।तुका ह्मणे दोन्ही । निवारलीं जागतां ॥३॥
आह्मी जाणों तुझा भाव । कैंचा भक्त कैंचा देव । बीजा नाहीं ठाव । कैंचें फळ शेवटीं ॥१॥संपादिलें बहु रूप । कैंचें पुण्य कैंचें पाप । नव्हतों आह्मी आप । आपणासी देखिलें॥ध्रु.॥एके ठायीं घरिच्याघरीं । न कळतां जाली चोरी । तेथें तें चि दुरी । जाणें येणें खुंटलें ॥२॥तुका ह्मणे धरूनि हातीं । उर ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देवभिक्तसोहळा ॥३॥
कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुह्मांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥१॥काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥घडे अवज्ञा सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें । आहे ठावें तुह्मासी ॥२॥तुका ह्मणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥३॥
बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा ।घेइन प्रेमपान्हा । भिक्तसुख निवाडें ॥१॥यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं ।काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं ।मोक्षपदें होती । ते विश्रांति बापुडी ॥२॥तुका ह्मणे हें चि देइप । मीतूंपणा खंड नाहीं।बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥३॥ ॥४॥
देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥ठाव देइप चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देइप ॥४॥तुका ह्मणे नको वरपंग देवा । घेइप माझी सेवा भावशुद्ध ॥५॥
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥घेइप माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥२॥कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥३॥पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥४॥तुका ह्मणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥५॥
मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो ह्मणे केशवा दास तुझा ॥१॥मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥२॥न लगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी॥३॥तुका ह्मणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥४॥
तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥आह्मां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चाळवितां ॥ध्रु.॥मन िस्थर ठेलें इंिद्रयें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥२॥पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥३॥तुका ह्मणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥४॥
जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥तुका ह्मणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥
जालें पीक आह्मां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥अवघा जाला आह्मां एक पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥२॥अवघे चि आह्मी ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥३॥तुका ह्मणे आह्मी सदेवांचे दास। करणें न लगे आस आणिकांची ॥४॥ ॥६॥
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥२॥तुका ह्मणे आतां आह्मांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥३॥
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥२॥तुका ह्मणे आह्मी खेळतियांमधीं । नाहीं केली बुद्धी िस्थर पाहों ॥३॥॥३॥
हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥हा चि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥चित्त राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥२॥अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका ह्मणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥ ॥१॥
माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥सुफळ हा जन्म होईल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥३॥तुका ह्मणे तो चि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरि ॥४॥
आमुचें जीवन हें कथाअमृत । आणिक ही संतसमागम॥१॥सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसें गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥२॥पिकलें स्वरूप आलिया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥३॥मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका ह्मणे ॥४॥
जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥१॥संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षय हें ॥ध्रु.॥शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥२॥बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे ॥३॥तुका ह्मणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥४॥
भिक्तभाव आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हा चि सांटा ॥३॥खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका ह्मणे चित्त शुद्ध करीं ॥४॥
प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥बीज तें चि फळ येईल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥काउळें ढोंपरा ककर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥३॥तुका ह्मणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥४॥
धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें॥१॥चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥सूर्यविकाशनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची॥२॥धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥३॥तुका ह्मणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥४॥ ॥६॥
रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण॥ध्रु.॥रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥तुका ह्मणे केलें किळकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥तुका ह्मणे मुगुटमणी हे भिक्त । आणीक विश्रांति अरतिया ॥३॥
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥तुका ह्मणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥उिच्छष्ट हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥तुका ह्मणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥ ॥४॥
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥ओठ हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा ॥२॥तुका ह्मणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥होसी फजीती वरपडा । लक्ष चौ†यासीचे वेढां ॥ध्रु.॥नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥२॥एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥तुका ह्मणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥५॥
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥घेइप हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा॥ध्रु.॥घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥हित सावकासें । ह्मणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका ह्मणे नेणसी ॥३॥ ॥३॥
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥तुका ह्मणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥तुका ह्मणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥
आह्मी बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे॥१॥काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥कारण सवें एका । अवघें आहे ह्मणे तुका ॥३॥
उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥१॥आह्मीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥भोजन भोजनाच्या काळीं। मागों करूनियां आळी ॥२॥तुका ह्मणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा॥३॥
केला पण सांडी । ऐसियासी ह्मणती लंडी ॥१॥आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥आपला निवाड। आपणें चि करितां गोड ॥२॥तुह्मीं आह्मीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥आसे धुरे उणें । मागें सरे तुका ह्मणे॥४॥
न व्हावें तें जालें । तुह्मां आह्मांसी लागलें ॥१॥आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥पाटोळ्यासवेंसाटी। दिली रगटएाची गांठी ॥२॥तुका ह्मणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥
पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥पावणांचा ठसा। दावीं मज तुझा कैसा ॥२॥वाव तुका ह्मणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥हे तों झोंडाईचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥तुका ह्मणे किती । बुडविलीं आळवितीं॥३॥
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥पांचांमधीं जावें । थोडएासाटीं फजित व्हावें ॥२॥तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आह्मी कांहीं ॥३॥टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥तुका ह्मणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥ ॥९॥
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥पाणचो†याचें दार। वरिल दाटावें तें थोर ॥२॥वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥तुका ह्मणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥
करूं याची कथा नामाचा गजर । आह्मां संवसार काय करी ॥१॥ह्मणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें किळकाळ ॥ध्रु.॥आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥तुका ह्मणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥ ॥२॥
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ध्रु.॥काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥तुका ह्मणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी॥१॥आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट॥ध्रु.॥आलें अंगासी तें बिळवंत गाढें । काय वेडएापुढें धर्मनीत ॥२॥तुका ह्मणे कळों येईल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥३॥ ॥२॥
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥अमृतें सागर भरवे ती गंगा । ह्मणवेल उगा राहें काळा ॥२॥भूत भविष्य कळों येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥४॥तुका ह्मणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥ ॥१॥
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥१॥इिच्छतील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥विसरले मुक्ती भिक्तअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥तुका ह्मणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥
भक्तां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥१॥सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा॥ध्रु.॥मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥तुका ह्मणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥
प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥सकळ इंिद्रयें जालीं ब्रह्मरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥तुका ह्मणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥॥३॥
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥तुका ह्मणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥ ॥१॥
काळ जविळ च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं॥ध्रु.॥काळ जविळच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥काळ भोंवताला भोंवे। राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥तुका ह्मणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥५॥ ॥१॥
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें॥१॥धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥तुका ह्मणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें॥१॥तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥तुका ह्मणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥ ॥२॥
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे।नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें ।भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें ।विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्त्वहीन ।दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप ।मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप ।ज्योति ना अंधार अवघा एकंकार। तेथें काय पुण्यपाप ।विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया ।मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां ।तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका ह्मणे देवराया ॥३॥ ॥१॥
कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तत्त्वता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥ऐसी गहन कर्मगति। काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्तीं । कांहीं नेघे आपुला॥ध्रु.॥उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । ह्मणे करितां ढवाळ्या ॥२॥जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका ह्मणे दुरा । देशत्यागें तयासी ॥३॥
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे।भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ।शुकनिळकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकिळया ॥ध्रु॥पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला ।जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न ह्मणें चाडा ।धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका ह्मणे जाण पावे पीडा ॥३॥ ॥२॥
कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥तुका ह्मणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥तुका ह्मणे तया करावें तें काई । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥
जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥१॥कैसा पाहे चिद्रद्राष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका ह्मणे॥३॥
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥तुका ह्मणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगिळया घरा येती ॥३॥ ॥४॥
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारेंएकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडीअवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरींफार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडेसभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती। ज्याचिया संचितें जैसें आलें पुढेंतयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातींतुका ह्मणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥ ॥१॥
नाहीं आह्मां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥पाहें तेथें पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया॥ध्रु.॥लज्जा भय कांही आह्मां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥तुका ह्मणे आह्मी सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥
गभाअ असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा॥१॥कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥तुका ह्मणे निश्चळ राहें । होईल तें सहज पाहें ॥५॥
न ह्मणे कवणां सिद्ध साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥ऐसें माझे बुद्धि काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥देइप चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥३॥आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥तुका ह्मणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देइप प्रेम देवा ॥५॥
अिग्नमाजी गेलें । अिग्न होऊन तें च ठेलें ॥१॥काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥२॥सरिता वोहळा ओघा। गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥३॥चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे॥४॥तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं॥५॥ ॥४॥
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥प्रेमामृतपान । होईल चरणरजें स्नान ॥२॥तुका ह्मणे सुखें । तया हरतील दुःखें॥३॥
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥तुका ह्मणे गोड । तेथें पुरे माझें कोड॥३॥ ॥२॥
वेद जया गाती । आह्मां तयाची संगति ॥१॥नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥तुका ह्मणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥
तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥आह्मी घ्यावें नाम । तुह्मां समाधान काम ॥२॥तुका ह्मणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥तुका ह्मणे आई । हातीं धरूनि संग देई ॥३॥
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२ ॥तुका ह्मणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥व्याला वाडविलें ह्मुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥माझें पोट धालें। तुझे अंगीं उमटलें ॥२॥तुका ह्मणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥हें चि माझेंभांडवल।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥तुका ह्मणे डोई । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥
आह्मी घ्यावें तुझें नाम । तुह्मी आह्मां द्यावें प्रेम॥१॥ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥माझी डोई पायांवरी । तुह्मी न धरावी दुरी ॥२॥तुका ह्मणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व
ठायीं
— ठिकाणी
ऐसें
— असे
तुज
— तुला
तैसें
— तसे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
घडे
— घडते, शक्य होते
जैसें
— जसे
येर
— दुसरा, इतर
माया
— भासमान करणारी शक्ती
देखोनि
— पाहून
पुढती
— पुन्हा, पुढे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
देखे
— पाहतो
काई
— काय
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
वरी
— वर; शिवाय

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा