मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग २०५१–२१५३

Tukaram Gatha, part 21

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग २१ — अभंग २०५१ ते २१५३.

वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥तुका ह्मणे देवा । करीन ते घ्यावी सेवा॥३॥
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥तुका ह्मणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥
आह्मांवैष्णवांचा।नेमकायामनेंवाचा॥१॥धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥उचित समय । लाजनिवारावें भय ॥२॥तुका ह्मणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥
उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥१॥सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥२॥तुका ह्मणे लोकां । उरली वाचा मारीं हाका॥३॥
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥माझें मज नारायणा । देतां ां रे नये मना॥३॥भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥तुका ह्मणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥करूनियां नीती। दिल्याप्रमाणें चालती ॥२॥हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं॥३॥बळ बुद्धी युक्ती । तुज दिल्या सर्व शक्ती ॥४॥तुका ह्मणे खरा । आतां घेईन मुशारा ॥५॥
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥तुका ह्मणे देवा । पावे ंतरींची सेवा॥३॥ ॥१५॥
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥१॥कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद ोले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां॥२॥हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका ह्मणे रीत । तुमची आह्मां न कळे ॥३॥
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥२॥तुका ह्मणे मनीं । आपुल्या च लाभहानि॥३॥
रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना॥१॥सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥२॥तुका ह्मणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥
जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय ॥१॥नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥तुका ह्मणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥॥३॥
ब्रह्मरस घेइप काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥तुका ह्मणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥तुका ह्मणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥तुका ह्मणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधु ॥ध्रु.॥करुनि अराणूक पाहे । भलत्या साहए व्हावया ॥२॥बोले तैसी करणी करी । तुका ह्मणे एक हरि ॥३॥ ॥४॥
उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं ।पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥१॥त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा ।संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥रूप डोळियां आवडे । कीर्ति श्रवणीं पवाडे ।मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥तुका ह्मणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम ।हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥
आह्मां हें चि भांडवल । ह्मणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥बाखराचें वाण। सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥न लगे वारंवार । तुका ह्मणे वेरझार ॥३॥
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥दृढ माझें मन। येथें राखावें बांधोन ॥२॥तुका ह्मणे वाटे । नको फुटों देऊं फांटे॥३॥ ॥३॥
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥तुका ह्मणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥
मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥काय उणे तयापाशीं । रिद्धिसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥तुका ह्मणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥असे भक्तांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥तुका ह्मणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥तुका ह्मणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कु†हाडी ॥३॥ ॥४॥
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥२॥तुका ह्मणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥बहुथोडएा आड । निवारितां लाभें जाड ॥२॥तुका ह्मणे खरें । नेलें हातींचे अंधारें॥३॥
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥अराणूक नाहीं कधीं। जाली तरि भेदबुद्धि ॥२॥अंतरली नाव । तुका ह्मणे नाहीं ठाव॥३॥ ॥३॥
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साहए येथें ॥ध्रु.॥शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥तुका ह्मणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥तुका ह्मणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥
बुद्धिमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥तुका ह्मणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥ ॥३॥
पूर्वजांसी नर्का । जाणें तें आइका ॥१॥निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥मात्रागमना ऐसी।जोडी पातकांची रासी ॥२॥तुका ह्मणे वाट । कुंभपाकाची ते नीट॥
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥लेंकरें वित्त पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे काई ॥४॥तुका ह्मणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥५॥
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥१॥जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥तुका ह्मणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥नाहीं इंिद्रयां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥४॥तुका ह्मणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥
लय लक्षूनियां जालों ह्मणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चितीनें ॥ध्रु.॥तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥तुका ह्मणे जरी होईल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥ ॥५॥
पुरली धांव कडिये घेइप । पुढें पायीं न चलवीं ॥१॥कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥अवघी निवारावी भूक। अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥तुका ह्मणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥३॥
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥आतां तूं चि बाहएात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥तुका ह्मणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
जेथें माझी दृष्टि जाय । तेथें पाय भावीन ॥१॥असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥अवघा च अवघे देसी। सुख घेवविसी संपन्न ॥२॥तुका ह्मणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥ ॥३॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥१॥भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावता ॥२॥अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥तुका ह्मणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें॥४॥
अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास॥१॥जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥२॥तुका ह्मणे भक्तराजा । कोण वर्णी पार तुझा ॥३॥
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला॥१॥न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥२॥वदे उपचाराची वाणी । कांहीं माग ह्मणऊनि ॥३॥उदासीनाच्या लागें । तुका ह्मणे धांवे मागें॥४॥
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥तुका ह्मणे भिक्तभाव । हा चि देवाचा ही देव ॥३॥
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥१॥न लगें सांगावें मांगावें ॥जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥तुका ह्मणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥
आह्मी नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें॥१॥देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥आह्मां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥तुका ह्मणे संतीं । वर्म दिलें आह्मां हातीं ॥३॥
जालों निर्भर मानसीं । ह्मणऊनि कळलासी ॥१॥तुझे ह्मणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥तुका ह्मणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥४॥ ॥७॥
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें॥३॥तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥काय करूं एका। मुखें सांग ह्मणे तुका ॥५॥
विठ्ठल माझी माय । आह्मां सुखा उणें काय ॥१॥घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥तुका ह्मणे कृपावंत । ठेवीं आह्मांपाशीं चित्त ॥३॥
भिक्तसुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥१॥हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥सहस्रनामाची आरोळी। एक एकाहूनि बळी ॥३॥नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥तुका ह्मणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी॥५॥ ॥३॥
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥तुका ह्मणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥
कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥तुका ह्मणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥४॥
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥१॥गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥तुका ह्मणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥ ॥३॥
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु॥१॥वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥तुका ह्मणे सार । भिक्त नेणती गव्हार ॥३॥
भाग्यवंत ह्मणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥भुक्तिमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥गाइलें पुराणीं । तुका ह्मणे वेदवाणी ॥३॥
जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर ।असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥तुका ह्मणे बुद्धि । ज्याची ते च तया सिद्धि ॥३॥
नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥तुका ह्मणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥मुक्ति कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥तुका ह्मणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आिंळगी आवडी करूनियां ॥२॥शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥तुका ह्मणे असों अनाथ दुबळीं । आह्मांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥आणिकाचें मज ह्मणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥तुका ह्मणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥
कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥३॥तुका ह्मणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥तुका ह्मणे भोळा भाविक हा देव । आह्मी त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥
न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥तुका ह्मणे आह्मी आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥
दैन्य दुःख आह्मां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निद।वा कोणा चाड ॥३॥तुका ह्मणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आह्मां ॥४॥
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥तुका ह्मणे थीत । नागवला नव्हे हित॥३॥
विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥३॥अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्षण ॥५॥
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥तुका ह्मणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥
न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥तुका ह्मणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥१॥नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥२॥असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥तुका ह्मणे देव भक्तपण सार । कवतुक- वेव्हार तयासाटीं ॥४॥
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥ह्मणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥तुका ह्मणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥काय वाउगी घसघस । आह्मी विठोबाचे दास ॥ध्रु.॥आह्मी जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥तुका ह्मणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥
नव जातां घरा । आह्मी कोणाच्या दातारा ॥१॥कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥नाहीं आह्मी खात। कांहीं कोणाचें लागत ॥२॥कळे तैसी सेवा । तुका ह्मणे करूं देवा ॥३॥
मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरि हिता ॥१॥तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥एखादिया भावें । तुका ह्मणे जवळी यावें ॥३॥
काय जाणों वेद । आह्मी आगमाचे भेद ॥१॥एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥तुका ह्मणे दीना । नुपेक्षावें नारायणा॥३॥
धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥हें चि आह्मां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥नाहीं भीड भार । तुका ह्मणे साना थोर॥३॥
निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥निवडावें तन। सेतीं करावें राखण ॥२॥तुका ह्मणे नीत । न विचारितां नव्हे हित॥३॥
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥तुका ह्मणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥ध्रु.॥नाहीं केली निंदा । आह्मीं दुसिलेंसे भेदा ॥२॥तुका ह्मणे मज । येणें विण काय काज॥३॥
कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥१॥तुज आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड॥३॥
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥२॥कायावाचामनें । तुका ह्मणे दुजें नेणें॥३॥
आतां होइप माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥१॥येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥तुका ह्मणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥
नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी॥१॥आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥तुका ह्मणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुह्मी आतां ॥ध्रु.॥खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥२॥तुका ह्मणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥तुका ह्मणे जाली कोंबडएाची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥१॥आतां माझें हातीं देइप हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥तुका ह्मणे ऐसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥तुका ह्मणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥तुका ह्मणे पाळी तोंडऴिचया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे॥ध्रु.॥घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥तुका ह्मणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥
कृपावंता दुजें नाहीं तुह्मां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रह्मरस ॥ध्रु.॥आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥तुका ह्मणे आह्मांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥तुका ह्मणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥जन्मांतरें मज तैसीं देइप देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥तुका ह्मणे आह्मी मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥४॥
माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥तुका ह्मणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥
कथा दुःख हरी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥२॥कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥३॥तुका ह्मणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥॥१३॥
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥तुका ह्मणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥
भला ह्मणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥तुका ह्मणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥
शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥बुद्धि नाहीं िस्थर । तुका ह्मणे शब्दा धीर ॥३॥
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥काय बळयुक्ति । नाहीं तुझे अंगीं शिक्त ॥२॥तुका ह्मणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥माझी शिक्त नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥आह्मां ओढी काळ। तुझें क्षीण झालें बळ ॥२॥तुका ह्मणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥
आतां घेइप माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥तूं चि डोळे वाती। होई दीपक सांगातीं ॥२॥तुका ह्मणे कांहीं । विचाराया चाड नाहीं॥३॥
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥तुका ह्मणे मधीं । आतां न पडे उपाधि॥३॥
करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥१॥आतां ये वो माझे आई । देइप भातुकें विठाई ॥ध्रु.॥उपायासी नाम। दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥बीज आणि फळ । हें चि तुका ह्मणे मूळ॥३॥
धनासीं च धन । करी आपण जतन ॥१॥तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥तुका ह्मणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥तुका ह्मणे उभें । आह्मी राखियेलें लोभें॥३॥ ॥१०॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला
ऐसें
— असे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
सकळ
— सर्व
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तैसें
— तसे
घडे
— घडते, शक्य होते
ठायीं
— ठिकाणी
तया
— त्याला, त्या
जैसें
— जसे
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
देखोनि
— पाहून
जेवीं
— ज्याप्रमाणे
काई
— काय
निष्काम
— फळाची अपेक्षा नसलेले
देखे
— पाहतो
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
मातें
— मला
वरी
— वर; शिवाय

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा