पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥तुका ह्मणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥१॥माझें चित्त मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥तुका ह्मणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईल कळों ॥३॥
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥याचा कांहीं तुह्मीं देखा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥तुका ह्मणे आतां जालों उतराई । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥१॥रुचिविण काय शब्द वाया माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें॥२॥तुका ह्मणे तुह्मी असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥
मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आह्मां ॥१॥वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥गाणें गीत आह्मां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥तुका ह्मणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥३॥
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥तुका ह्मणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥
काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाटए तुझे चाळे ॥ध्रु.॥जाली तरी मर्यादा। किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥तुका ह्मणे साचा । कोठें जासी हृदयींचा॥३॥
कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥१॥आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥लावूनियां सवे। पळतां दिसाल बरवे ॥२॥तुका ह्मणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥३॥ ॥३॥
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥द्रव्य आणि कन्या। येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥तुका ह्मणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥३॥
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥तुका ह्मणे मान । लवणासारिखें लवण॥३॥
मज नाहीं धीर । तुह्मी न करा अंगीकार ॥१॥ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥२॥वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें॥३॥
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥वेठीऐसा करीं भिक्तवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥२॥तुका ह्मणे कइप देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥ ॥४॥
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥तुका ह्मणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥ ॥१॥
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त ओढे ॥२॥विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका॥३॥
खोटएाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे॥३॥ ॥२॥
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ध्रु.॥केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता॥३॥माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥तुका ह्मणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥ ॥१॥
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥तुका ह्मणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि॥१॥ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥तुका ह्मणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥इिच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥देह आह्मी केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥तुका ह्मणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥
धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥१॥ह्मणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥तुका ह्मणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥ ॥४॥
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥१॥ताकिर्याचें अंग आपणा पारिखें । माजियासारिखें वाईचाळे ॥ध्रु.॥माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥२॥तुका ह्मणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥
कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखूं ॥१॥तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ध्रु.॥इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥२॥तुका ह्मणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥
भिक्त तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥उदक अिग्न धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥तुका ह्मणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥ ॥३॥
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥तुका ह्मणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥
नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥१॥नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥चुकी जाली आतां काय। तुका ह्मणे उरली हाय ॥३॥
आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥भांडवल सेवा। हा चि ठेवियेला ठेवा ॥२॥करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥आधारें वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसेवणी तुमचिया ॥२॥तुका ह्मणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥ ॥४॥
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥जळो ऐसी िब्रदावळी। भाटवोळीपणाची ॥२॥तुका ह्मणे पाहों डोळां । अवकळा नये हे॥३॥
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥तुका ह्मणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥३॥
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥तुका ह्मणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥ ॥४॥
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥तुका ह्मणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखटएाची ॥३॥
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥तुका ह्मणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे॥३॥
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोई येथुनें चि॥ध्रु.॥येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥तुका ह्मणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥ ॥३॥
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥आह्मां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥तुका ह्मणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । ह्मणतां शाहाणा येइल कैसा ॥२॥तुका ह्मणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥
कुतयाऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे॥१॥जाय तिकडे हाडहाडी । गोहवाडी च सोइरीं ॥ध्रु.॥अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥तुका ह्मणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥सेविलिया निःकामबुद्धी। मदें शुद्धी सांडवी ॥२॥त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥ ॥५॥
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥दुसयामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥तेथील तेथें येथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥ ॥२॥
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥तुका ह्मणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥३॥
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥फेडा आतां पांग। अंगीं लपवुनी अंग ॥२॥दुजें नेणें तुका । कांहीं तुह्मासी ठाउका॥३॥
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥कुंटित चि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शिक्त ॥२॥तुका ह्मणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥ ॥३॥
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥१॥नये पाहों कांहीं गोहवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥तुका ह्मणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥ ॥१॥
चावळलें काय न करी बडबड । न ह्मणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काई ॥२॥तुका ह्मणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥
आपुला तो देह आह्मां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥२॥तुका ह्मणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥३॥ ॥२॥
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥२॥सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥३॥
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥लाभ अथवा हानी । थोडएामध्यें च भोवनी ॥२॥तुका ह्मणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥॥२॥
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥२॥आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥
धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥१॥जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥२॥तुका ह्मणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥ ॥२॥
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥न ह्मणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥तुका ह्मणे भागा । आली निंदा करी मागा॥३॥
शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥१॥पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥२॥सिंदळी त्या सती । तुका ह्मणे थुंका घेती ॥३॥ ॥२॥
भक्ता ह्मणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥१॥नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥तुका ह्मणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥ ॥१॥
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥२॥तुका ह्मणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥३॥
बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥तुका ह्मणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥ ॥२॥अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोकबोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविलाआणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ २० ॥
भूतबाधा आह्मां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥तुका ह्मणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥
नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥१॥जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥२॥तुका ह्मणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥३॥
करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥आतां आला एका निवाडएाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥२॥तुका ह्मणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव िस्थर माझा मज ॥३॥
नव्हे तुह्मां सरी । येवढें कारण मुरारी ॥१॥मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥२॥शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची॥३॥
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥१॥सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥२॥जातीं उखळें चाटूं । तुका ह्मणे राज्य घाटूं ॥३॥
आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥१॥हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥जाणें तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥२॥तुका ह्मणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥३॥
पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥१॥करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥तुका ह्मणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥तुका ह्मणे आह्मां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥
काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥२॥तुका ह्मणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥तुका ह्मणे लाज । आह्मां स्वामीचें तें काज ॥३॥
कांहीं मागणें हें आह्मां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥२॥तुका ह्मणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥३॥
मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥१॥काय आह्मी नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥तुका ह्मणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥
असो तुझें तुजपाशीं । आह्मां त्यासी काय चाड ॥१॥निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥तुका ह्मणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥३॥
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥िस्थरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥२॥तुका ह्मणे विळतां मन । आह्मां क्षण न लगे ॥३॥
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥तुका ह्मणे आह्मां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥३॥
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥१॥न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥२॥तुका ह्मणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढएासाटीं ॥३॥
स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥खोटएा तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥ह्मणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥तुका ह्मणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥ध्रु.॥बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥तुका ह्मणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥
थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥१॥भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥
तूं कृपाळू माउली आह्मां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें॥२॥तुका ह्मणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आई । आतां पुढें काई तुज घालूं सांकडें ॥३॥
कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥चुकी जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वहएा राखिल्या॥ध्रु.॥नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका ह्मणे जाणावें ॥३॥
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव । आह्मां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥तुका ह्मणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुह्मां आकांत ॥१॥वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥जीव घेती मायबापें थोडएा अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥२॥तुका ह्मणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता। काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥३॥वर्षाव केला
तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्त्वांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका ह्मणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥
मी अवगुणी अन्यायी किती ह्मणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देइप विठ्ठले ॥१॥पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी िस्थर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥तुका ह्मणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥ ॥७॥
बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥जें आह्मी बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥३॥खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥गाढव कुतरा ऐसा मज ठावा बईल तूं देवा भारवाही ॥५॥लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥तुका ह्मणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥
आह्मी भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥होसी सरड बेडुक । बाग गांढएा ही पाईक ॥ध्रु.॥बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥२॥तुका ह्मणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥३॥
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥चौघांचिया मतें। आधीं खरें केलें होते ॥२॥तुका ह्मणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥३॥
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें॥२॥तुका ह्मणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम।३॥ ॥४॥
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।२॥तुका ह्मणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥ ॥१॥
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥अंतकाळींचा सोइरा । तुका ह्मणे विठो धरा ॥३॥ ॥१॥
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें॥१॥कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥२॥तुका ह्मणे ठाया । जाइप आपल्या आलिया ॥३॥ ॥१॥
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥१॥अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां॥२॥कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवताअ मायेचिये॥३॥मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥तुका ह्मणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची॥५॥
कृपाळू सज्जन तुह्मी संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥आठवण तुह्मी द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥तुका ह्मणे तुह्मी निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥
संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥२॥तुका ह्मणे शेष घेईन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥ ॥३॥
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥१॥पुरोनि पंढरिये उरलें भिक्तसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका ह्मणे विठ्ठल ॥३॥
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी ह्मणऊनि ॥ध्रु.॥उतावीळ बाहएा भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥२॥तुका ह्मणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंिद्रयांची ॥३॥
नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंिद्रयां व्यापार नाठवती ॥१॥गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें ॥ध्रु.॥प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥२॥तुका ह्मणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥३॥ ॥३॥
स्वामिकाज गुरुभिक्त । पितृवचन सेवा पति ॥१॥हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥निश्चयाचें बळ । तुका ह्मणे तें च फळ ॥३॥
चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ॥२॥तुका ह्मणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥३॥
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥तुका ह्मणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥
आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥तुझें नाम दिनानाथ । िब्रदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥२॥वांयां जातां मज । तुका ह्मणे तुह्मां लाज ॥३॥
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा॥१॥मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥उभयकुळींसाक्ष। तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥समर्पिली काया । तुका ह्मणे पंढरिराया॥३॥
वेदाचा तो अर्थ आह्मांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥उत्पित्तपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥तुका ह्मणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥३॥
आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥वर्म तुझें आह्मां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥तुज मज सरी होइल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥३॥भांडवल माझें मिरविसी जनीं । सहजर वोवनी नाममाळा ॥४॥तुका ह्मणे आह्मी केली जिवें साटी । तुह्मां आह्मां तुटी घालूं आतां ॥५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.