काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥कामक्रोधा वेगळा ऐसा होइप कां सोंवळा । तुका ह्मणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥
ऊंस वाढवितां वाढली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥१॥सत्यकर्में आचरें रे । बापा सत्यकर्में आचरें रे ।सत्यकर्में आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥साकरेच्या आळां लाविला कांदा । स्थूळसानापरि वाढे दुगपधा ॥२॥सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका ह्मणे याचा विचार करीं ॥३॥
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले॥ध्रु.॥उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥तुका ह्मणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें॥३॥ ॥१०॥
जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥संतमहंतसिद्धहरिदासदाटणी । फिटती पारणीं इंिद्रयांचीं॥२॥तुका ह्मणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेइप ॥३॥
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥२॥लावूनि बैसे टाळी । मन इंिद्रयें मोकळीं ॥३॥हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां॥४॥तुका ह्मणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥५॥ ॥२॥
येइप वो येइप वो येइप धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥२॥नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका ह्मणे हांवा हांवा हांवा साधावा ॥३॥
हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥हा चि होईजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥२॥जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥तुका ह्मणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥
सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥२॥तुका ह्मणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥३॥
करितां होया व्हावें चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥२॥तुका ह्मणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥३॥
संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥१॥घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥तुका ह्मणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥इच्छेऐसी आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥तुका करी नारायण । या या सेवन नामाचें॥३॥
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥सरे ऐसा नाहीं झरा। पंक्ती करा समवेत ॥२॥तुका ह्मणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥३॥
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥२॥तुका ह्मणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥ ॥८॥
तुह्मांसाटीं आह्मां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आह्मां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥२॥तुका ह्मणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात ह्मणऊनि ॥३॥
करावा उद्धार हें तुह्मां उचित । आह्मी केली नीत कळली ते ॥१॥पाववील हाक धांवा ह्मणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आह्मी भाव जाणतसों ॥२॥तुका ह्मणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥३॥
संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥ह्मणऊनि बहु तळमळी चित्त । येइप वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥तुका ह्मणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥तुका ह्मणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥
नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी ॥१॥आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी ॥ध्रु.॥नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें॥२॥तुका ह्मणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥३॥ ॥७॥
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥तुका ह्मणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥
वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें ।अंधापुढें दीप नाचती नाचणें । भिक्तभावेंविण भिक्त तैसी ॥१॥तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया ।खादलें ह्मणोनि सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काई होय ।नपुंसका काय करील पिद्मणी । रुचिविण वाणी तैसे होय॥२॥हात पाय नाहीं करिल तो काई । वृक्षा फळ आहे अमोलिक।हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं ह्मणे तुका ॥३॥
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी लागे दिवाण ॥२॥गुज बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥शुद्ध कसूनिपाहावें वरि रंगा न भुलावें । तुका ह्मणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥
नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होइप ॥१॥सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे॥ध्रु.॥नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥तुका ह्मणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥
उपाधिवेगळे तुह्मी निर्विकार । कांहीं च संसार तुह्मां नाहीं ॥१॥ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥निसंग तुह्मांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥२॥तुका ह्मणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥
माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥२॥तुका ह्मणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥तैसें शुद्ध करीं हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरि न ये ॥२॥तुका ह्मणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥तुका ह्मणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥
आगी लागो तया सुखा । जेणें हरि नये मुखा ॥१॥मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥जळो तें समूळ। धन संपित्त उत्तम कुळ ॥२॥तुका ह्मणे देवा । जेणें घडे तुझी सेवा॥३॥
आतां न ह्मणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥अवघा तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । तुझ्या रिगालों वोसंगा ॥३॥
समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ह्मणऊनि कोणीं न करावा आळस । ह्मणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥सकळ ही तीथॉ प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥तुका ह्मणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥भिक्तपंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एक खंडती॥ध्रु.॥उभारोनि बाहे विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥२॥भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका ह्मणे नासी कुतक्र्याचे कपाळीं ॥३॥
आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास ह्मणों दास विष्णूचे ॥२॥भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता । तुका ह्मणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥३॥
आह्मी हरिचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥ह्मणोनि भिन्न भेद नाहीं देवा आह्मां एकदेहीं । नाहीं जालों कहीं एका एक वेगळे ॥ध्रु.॥निद्रा करितां होतों पायीं सवें चि लंका घेतली तइप । वान्नरें गोवळ गाई सवें चारित फिरतसों ॥२॥आह्मां नामाचें चिंतन राम कृष्ण नारायण। तुका ह्मणे क्षण खातां जेवितां न विसंभों ॥३॥
अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काई ॥२॥तुज रूप नाहीं । तर माझें दाव काई॥३॥खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥४॥साच तूं लटिका । तैसा मी ही ह्मणे तुका ॥५॥
मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक॥२॥आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥तुका ह्मणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥
नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥२॥नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥तुका ह्मणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देइप सदा ॥२॥तुका ह्मणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥तुका ह्मणे आल्या थाया । वस्तु बया मोलाच्या ॥३॥
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥तुका ह्मणे देवा । लोभें न पुरे चि सेवा॥३॥
अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥हे चि चिंता काय खावें ह्मणऊनि । भले तुजहूनि पिक्षराज ॥ध्रु.॥पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥३॥तुका ह्मणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥४॥
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥४॥
उदारा कृपाळा पतितपावना । िब्रदें नारायणा साच तुझीं ॥१॥वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥दैत्यां काळ भक्तां मेघश्याममूर्ति । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका ह्मणे यासी वेद ग्वाही ॥४॥
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुह्मांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुह्मी धरावें चित्तीं ॥ध्रु.॥धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥मान पावे तो आगळा मुख्य इंिद्रयें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे॥६॥जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥आचारी अन्न काढी रे गाई अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥११॥धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥बिळयाढा तो चि जाणा रे भिक्त दृढ शरीरीं। गांढएा तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे ह्मणे होईल कैसें॥१५॥उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाइप ॥१६॥चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौयाशी जन्म ॥१८॥तुका ह्मणे मना घरी रे संतसंगतिसोई । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥॥ येकाखडी ॥ १॥
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥नानाहव्यासांची जोडी। तृष्णा करी देशधडी ॥५॥चरणीं ठेवा चित्त । ह्मणवा देवाचे अंकित ॥६॥छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥जगाचा जनिता । भुक्तिमुक्तींचा ही दाता ॥८॥झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं॥१४॥नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१६॥थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥दया तिचें नांव । अहंकार जाय जंव॥१८॥धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥परउपकारा । वेचा शिक्त निंदा वारा॥२१॥फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२२॥बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२६॥रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२७॥लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥वासने चि धाडी । बंद खोडएा नाडएा बेडी ॥२९॥सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥हातीं हित आहे । परि न करिसी पाहें॥३३॥अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥ख्याति केली विष्णुदासीं । तुका ह्मणे पाहा कैसी ॥३५॥
देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥तुका ह्मणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥॥ लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते ॥
अशक्य तों तुह्मां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥थोर भाग्य आह्मी समर्थाचे कासे । ह्मणवितों दास काय थोडें ॥२॥तुका ह्मणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥३॥
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥तुका ह्मणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥अलंकापुरीं ब्राह्मण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांतकीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राह्मण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ ३१ ॥
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं॥१॥अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं िब्रदावळी ॥ध्रु.॥न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥आिळकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥तुका ह्मणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देइप धीर मना ॥४॥
नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥१॥यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥तुका ह्मणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥ऐसे आह्मी जाणों दास । ह्मणोनि जालों उदास ॥ध्रु.॥तुह्मी दिला धीर। तेणें मन झालें िस्थर ॥२॥तुका ह्मणे आड । केलों मी हें तुझें कोड॥३॥
काय मी जाणता । तुह्मांहुनि अनंता ॥१॥जो हा करूं अतिशय । कां तुह्मां दया नये ॥ध्रु.॥काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥तुका ह्मणे वाणी । माझी वदे तुह्मांहुनि॥३॥
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥ऐकोनियां लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥तरी जाणे धणी। वदे सेवकाची वाणी ॥२॥तुका ह्मणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥
ठेवूनियां डोई । पायीं जालों उतराई ॥१॥कारण तें तुह्मीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥तुका ह्मणे भार । तुह्मी जाणां थोडा फार ॥३॥उपदेश अभंग ॥ ११ ॥
नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां॥ध्रु.॥साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥४॥तुका ह्मणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥इंिद्रयांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥तुका ह्मणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥
तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥तुका ह्मणे हा आहे कृपासिंधु। तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥तुका ह्मणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥ह्मणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥तुका ह्मणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । िस्थर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥तुका ह्मणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥आहे हा आधार। नाम त्याचें विश्वंभर ॥२॥नाही रिता ठाव । तुका ह्मणे पसरीं भाव॥३॥
संकोचोनि काय जालासी लहान । घेइप अपोशण ब्रह्मांडाचें ॥१॥करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका ह्मणे वाखे कौतुकाचे ॥३॥
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । ह्मणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । ह्मणती ज्ञानदेव ऐसें तुह्मां ॥१॥मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे॥२॥तुका ह्मणे नेणे युक्तीची ते खोलीं । ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥३॥
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥ध्रु.॥नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥तुका ह्मणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥
काय तुह्मी जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥आणीक कोणी मिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति॥४॥तुका ह्मणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥५॥
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके । तुका ह्मणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥३॥२३२७. तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥१॥राज्यमदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगांवा॥ध्रु.॥इंिद्रयें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥तुका ह्मणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥
हरिकथेवांचून इिच्छती स्वहित । हरिजन चित्त न घला तेथें ॥१॥जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नास कारणांचा ॥ध्रु.॥ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥तुका ह्मणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुह्मी ॥३॥
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां॥ध्रु.॥खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥तुका ह्मणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥तुका ह्मणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥३॥
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥तुका ह्मणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥
हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥तुका ह्मणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं॥३॥
प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥शिवाचें जीवन। जाळी महादोष कीर्तन ॥२॥तुका ह्मणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥ऐसें करींपांडुरंगा।प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥तुका वैष्णवांसंगती । हें चि भजन पंगती ॥३॥
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥आह्मी विठोबाचे दास । चिंता झुगारावी आस ॥ध्रु.॥भक्तीच्या उत्कषॉ । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥तुका ह्मणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥तुका ह्मणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥
तुह्मी येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥तुका ह्मणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराई ठावें असो ॥३॥ ॥३१॥
मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥तुका ह्मणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥
माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥तुका ह्मणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका ह्मणे ॥३॥
संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥तुका ह्मणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥बरें सेवन उपकारा । द्यावें द्यावें या उत्तरा ॥ध्रु.॥सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥गात जात तुका । हा चि उपदेश आइका॥३॥
कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥४॥कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥४॥आपण बैसे बाजेवरी सामान हरिच्या दासां धरी । तरि तो सुळावरि वाहिजे निश्चयेसीं ॥५॥येतां नकरी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥६॥तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥७॥
कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं ह्मणे तुका ॥३॥
कथा त्रिवेणीसंगम देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा ॥ध्रु.॥तीथॉ तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥२॥अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका ह्मणे ब्रह्मा नेणे वणूप या सुखा ॥३॥
सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥टाळी वाहूनियां विठ्ठल ह्मणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥तुका ह्मणे देवा नुपेक्षावें आह्मां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥
जळती कीर्तनें दोष पळतील विघ्नें ॥१॥हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥किळ पापाची हे मूर्ति। नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥तुका ह्मणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥
यम सांगे दूतां तुह्मां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥ते बिळयाशिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका ह्मणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥
कान्हया रे जगजेठी । देइप भेटी एकवेळे ॥१॥काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥तुका ह्मणें पाहिलें मागें । एवढएा वेगें अंतरला ॥३॥
आपुल्या आह्मी पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें॥१॥मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥तुका ह्मणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥
धन्य बा हएा ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥तुका ह्मणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया॥१॥वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥तुका ह्मणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥ह्मणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ।२॥तुका ह्मणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥
आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥वचनासी वचन मिळे। रिघती डोळे डोळियांत ॥२॥तुका ह्मणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥तुका ह्मणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥तुका ह्मणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥ ॥८॥
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा॥२॥तुका ह्मणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला॥३॥
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एकां एक ॥१॥गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥तुका ह्मणे बहुजन्मांचे खंडण । होइल हा सीण निवारोनि ॥३॥ ॥२॥
नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥तुका ह्मणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ ८ ॥
सालोमालो हरिचे दास । ह्मणउन केला अवघा नास॥१॥अवघें बचमंगळ केलें । ह्मणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥तुका ह्मणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥३॥
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बया वोजा ॥ध्रु.॥अभिलाषाच्या सुखें। अंतीं होती काळीं मुखें ॥२॥तुका ह्मणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.