कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥ऐशा अभाग्याच्या बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार तेणें ॥२॥तुका ह्मणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥
कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥तुका ह्मणे ज्ञान । दिमाकाची भनभन ॥३॥
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥हा तो निवाडएाचा ठाव । खया खोटएा निवडी भाव ॥ध्रु.॥गहवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥३॥
विषयीं अद्वये । त्यासी आह्मां सिवो नये ॥१॥देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रह्मिस्थति ॥२॥तुका ह्मणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥३॥
नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥गुणअवगुण निवाडा । ह्मैस ह्मैस रेडा रेडा ॥ध्रु.॥जनीं जनार्दन। साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥तुका ह्मणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥ ॥८॥
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें॥१॥जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥तुका ह्मणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥उदक अन्न काये ह्मणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥तुका ह्मणे जया आपुलें स्वहित। करणें तो चि प्रीत धरी कथे ॥४॥
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें॥१॥वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥तुका ह्मणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥
नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥२॥अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें॥ध्रु.॥काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥२॥काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥३॥तुका ह्मणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥४॥
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥तुका ह्मणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥१॥बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥रंडी चंडी शिक्त । मद्यमांस भिक्षती ॥२॥बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥मुंज्या ह्मैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥तुका ह्मणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती॥७॥
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥तुका ह्मणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥
मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥१॥रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥भांडवल आह्मां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥तुका ह्मणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥
नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥गाईगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥नेणपणे उगें चि उभें । भिक्तलोभें राहिलें ॥३॥नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर॥८॥तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥तुका ह्मणे वैकुंठवासी । भक्तांपासीं राहिला ॥१०॥
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥तयासी बोलतां होईल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥तुका ह्मणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम॥१॥कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥तुका ह्मणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें॥३॥
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥तुका ह्मणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥नाहीं वर्णाधमयाती। नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥तुका ह्मणे नाम । चैतन्य निजधाम॥३॥
नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईिकला ॥१॥सांगा विनवितों तुह्मांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥ध्रु.॥नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥सलगीच्या उत्तरा । तुका ह्मणे क्षमा करा ॥३॥
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥तुका ह्मणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥ ॥१५॥
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी ह्मणे तुका ॥३॥
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला िस्थरी राहें देवा ॥१॥निरसनें माझा होईल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥राहिलों चिकटूण कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥तुका ह्मणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥ ॥१॥
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंके ॥ध्रु.॥भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥तुका ह्मणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ह्मणऊनी मनीं मानूं नये खेदु । ह्मणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥तुका ह्मणे भार घातलिया वरी । होईल कैवारी नारायण ॥३॥
निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक॥१॥तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥सोइरें पिशुन समान चि घटे । चित्त पर ओढे उपकारी ॥२॥तुका ह्मणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥मानदंभांसाटीं। पडे देवासवें तुटी ॥२॥तुका ह्मणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां॥३॥
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥तुका ह्मणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥३॥
पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥तुका ह्मणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥
काविळयासी नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळसें ॥१॥तैसें कुधनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥तुका ह्मणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥
लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥मग न लगे पारखी। अवघीं सकट सारखीं । तुका ह्मणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥२३९४. नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥तुका ह्मणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥परिसावी हे विज्ञापना । आह्मां दीनां दासांची ॥ध्रु.॥चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥२॥तुका ह्मणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥
ह्मणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुह्मां असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुह्मां जागवी ॥३॥
बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमटएाचा ॥ध्रु.॥बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥
येहलोकीं आह्मां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं॥१॥कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥तुका ह्मणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥३॥
रोजकीदव जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥नाहीं होत झाडएापाडएाचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥२॥सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाडएापाशी गुंपों नेणे ॥३॥
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥१॥आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥तुका ह्मणे नाहीं पापपुण्य खतीं । झाडएाची हुजती हातां आली ॥३॥
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आह्मां जोडी वैष्णवांची ॥१॥मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आह्मांसि तरी खेळावरि चित्त ॥२॥तुका ह्मणे आह्मी देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे॥ध्रु.॥हरिदासांचा समागम। अंगीं प्रेम विसांवे ॥२॥तुका ह्मणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥
करूं जातां सन्निधान । क्षणि जन पालटे ॥१॥आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥२॥तुका ह्मणे केला त्याग । सर्वसंग ह्मणऊनि ॥३॥
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें॥ध्रु.॥अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥२॥तुका ह्मणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥तुका ह्मणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥
तीथाअची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥तुका ह्मणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोई माझी ॥३॥
भयाची तों आह्मां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥१॥समर्पिलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥तुका ह्मणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥
पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥२॥तुका ह्मणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥३॥
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥१॥येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥देहआत्म वंदी । केला घात कुबुद्धी ॥२॥तुका ह्मणे मन । कळवळी वाटे सीण ॥३॥
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥तुका ह्मणे जाणवलें । आह्मां भलें एवढेंच॥३॥
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥आपुलाल्या इच्छा। मागों जया व्हावें जैशा ॥२॥तुका ह्मणे आई । नव्हसी उदास विठाई ॥३॥
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥तुका ह्मणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥ध्रु.॥तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥तुका ह्मणे येथें पाहिजे सौरस । तुह्मांविण रस गोड नव्हे॥३॥
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥बैसायाची इच्छा कडे। चाली खडे रुपताती ॥२॥तुका ह्मणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥
आह्मी जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥२॥तुका ह्मणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥३॥
आह्मी आर्तभूत जिवीं । तुह्मी गोसावी तों उदास॥१॥वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥आह्मी मरों वेरझारीं। स्वामी घरीं बैसले ॥२॥तुका ह्मणे करितां वाद । कांहीं भेद कळेना॥३॥
पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥तुका ह्मणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥
माझी आतां सत्ता आहे । तुह्मां पायां हे वरती ॥१॥एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥२॥तुका ह्मणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥
फावलें तुह्मां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥तुका ह्मणे धडफुडा । जालों झाडा देइप देवा ॥३॥
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरि चित्त असों द्यावें ॥१॥तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥२॥तुका ह्मणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥३॥
करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥१॥जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मज्ञान । आह्मासी चरण न सोडणें ॥२॥विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥३॥सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥४॥तुका ह्मणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥भिक्तभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥संतांचे सेवटीं उिच्छष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥करीं इच्छा मज ह्मणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥तुका ह्मणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥
सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥तुका ह्मणे लाभ घेतला पालवीं। आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥
येणें मुखें तुझे वणाअ गुण नाम । तें चि मज प्रेम देइप देवा ॥१॥डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देइप देवा ॥ध्रु.॥कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देइप हातांस पायां बळ॥३॥तुका ह्मणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार। तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥३॥तुका ह्मणे तुज विकला जीवभाव। कळे तो उपाव करीं आतां ॥४॥
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा॥१॥गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥कांहीं एक तुझा न देखों आधार । ह्मणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥तुका ह्मणे तूं ब्रह्मांडाचा जीव । तरी कां आह्मी कींव भाकीतसों ॥४॥
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥आमुचें स्वहित जाणतसों आह्मी । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज जन्मा गोवण पडतसे ॥२॥राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥३॥तुका ह्मणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥४॥
विष्णुदासां भोग । जरी आह्मां पीडी रोग ॥१॥तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुह्मांसी सांगणें ॥ध्रु.॥आह्मां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥२॥तुका ह्मणे दास । आह्मी भोगूं गर्भवास ॥३॥
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा॥३॥वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥तुका ह्मणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा- ऐसें ॥१॥कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी॥ध्रु.॥नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥तुका ह्मणे जरी गिळे अहंकार । तरी वसे घर नारायण॥३॥
नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥२॥विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥३॥आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥तुका ह्मणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥५॥
नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥१॥शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥२॥तुका ह्मणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥३॥
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन॥२॥तुका ह्मणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥तुका ह्मणे तुह्मां होईल हे परी । अनुभव वरी येईल मग ॥३॥
जैशा तुह्मी दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥अवघा हा चि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥२॥तुका ह्मणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥३॥
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥तुका ह्मणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥२॥तुका ह्मणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा॥३॥
एका बोटाची निशाणी । परीपाख नाहीं मनीं ॥१॥तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां वेंग ॥ध्रु.॥वैष्णवांचा धर्म। जग विष्णु नेणे वर्म ॥२॥अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तइप ॥२॥तुका ह्मणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥३॥
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥घेईन जन्मांतरें। हें चि करावया खरें ॥२॥तुका ह्मणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥३॥
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥बोरामध्यें वसे अळी। अठोळीच भोंवती ॥२॥पोटासाटीं वेंची चणे । राजा ह्मणे तोंडें मी ॥३॥बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥तुका ह्मणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥
धांव धांव गरुडध्वजा । आह्मां अनाथांच्या काजा॥१॥बहु जालों कासावीस । ह्मणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥२॥असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर॥४॥तुका ह्मणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥५॥
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥तुका ह्मणे घेइन उडएा । सांडिन कुडएा भावना॥३॥
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥२॥तुका ह्मणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तांसी संकटीं रक्षावया ॥३॥
चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥न करीं आणीक साधनें । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥२॥गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली ॥३॥तुका ह्मणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारीं ॥४॥
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥तुका ह्मणे धीरें- । विण कैसें होतें बरें॥३॥
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें॥१॥न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ॥३॥याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥४॥तुका ह्मणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥५॥
भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उिच्छष्ट तें ॥१॥उिच्छष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥तुका ह्मणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥
सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी॥१॥डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे॥२॥प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका ह्मणे येणें गरुडध्वजें ॥४॥
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥ताकिकांर्चा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥नका शोधूं मतांतरें। नुमगे खरें बुडाल ॥२॥कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥३॥
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥२॥मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका ह्मणे दुःखें बांधला तो ॥३॥
आलिया अतीता ह्मणतसां पुढारें । आपुलें रोकडें सत्त्व जाय ॥१॥काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं ह्मणावया ॥ध्रु.॥दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥२॥तुका ह्मणे ध्वज उभारिला कर । ते शिक्त उदार काय जाली ॥३॥
जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥तें म्यां हृदयीं धरिलें । तापें हरण पाउलें ॥ध्रु.॥सेवा केली संतजनीं। सुखें राहिले लपोनि ॥२॥तुका ह्मणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥३॥
रूपीं जडले लोचन । पायीं िस्थरावलें मन ॥१॥देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥कळों नये सुखदुःख। तान हरपली भूक ॥२॥तुका ह्मणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥
जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥१॥तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥नाहीं मुक्ताफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥तुका ह्मणे लोणी । ताक सांडी निवडूनि॥३॥
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥तुका ह्मणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥
ऐसें भाग्य कइप लाहाता होईन । अवघें देखें जन ब्रह्मरूप ॥१॥मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥शांति क्षमा दया मूर्तिमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥२॥विवेकासहित वैराग्याचें बळ । धग्धगितोज्ज्वाळ अिग्न जैसा ॥३॥भिक्त नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥तुका ह्मणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥२॥कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥३॥तुका ह्मणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥४॥
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥तुका ह्मणे हे आशीर्वादें बळी । जाईल तो छळी नरकायासीं ॥३॥
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥तुका ह्मणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥तुझा ह्मणवितों दास । केली उिच्छष्टाची आस ॥ध्रु.॥राहिली तळमळ । तइप पासोनी सकळ ॥२॥तुका ह्मणे धालें । पोट ऐसें कळों आलें॥३॥
रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी॥३॥
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥तुका ह्मणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचारअनुभव॥२॥उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.