मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग २४६६–२५७०

Tukaram Gatha, part 25

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग २५ — अभंग २४६६ ते २५७०.

घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥१॥तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥देव आतां जाला । उगवे संकोच वहिला॥३॥अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥आडकिला झोंपा । रिता किळवरचा खोंपा ॥५॥गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड॥६॥तुका ह्मणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥
उंबरांतील कीटका । हें चि ब्रह्मांड ऐसें लेखा ॥१॥ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥हें चि ब्रह्मांड आह्मांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥२॥विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥३॥ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥४॥तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा ह्मणवी परमानंद ॥५॥ऐशी अगम्य ईश्वरी लीळा । ब्रह्मानंदीं गम्य तुक्याला ॥६॥
ब्रह्मज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका ह्मणे तधीं होतों आह्मी ॥४॥
सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥१॥हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥कामक्रोधे देह मिळण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञ मनमुंडण नव्हे चि ॥३॥अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥आतां सांगे तुका एक तुह्मी चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥
आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥होइप मज तैसा मज तैसा साना सकुमार रुषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं॥ध्रु.॥खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥२॥मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका ह्मणे गा विठोबा ॥३॥
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु॥३॥हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
अनंत ब्रह्मांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥मारी दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥२॥तुका ह्मणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥तुका ह्मणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥अिग्नकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥तुका ह्मणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥तुका ह्मणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥३॥
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥१॥अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥सोळा सहजर नारी ब्रह्मचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥दशरथा पातकें ब्रह्महत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥तुका ह्मणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥पाळणा
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वीं जडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥निजीं रे निजीं आतां । ह्मणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । ह्मणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें॥२॥संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरि थोरपुण्यें बहुतीं ॥३॥खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक। भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख। आप पर तें ही नाहीं देहभाव सकिळक ॥५॥सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी। घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥७॥धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका ह्मणे नाहीं विश्वास ते घात ॥९॥॥१॥
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा॥१॥अवघें पोटासाटीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥लावी अनुसंधान। कांहीं देईल ह्मणऊन ॥२॥काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥३॥
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥२॥जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका ह्मणे ॥३॥
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥तुका ह्मणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भिक्तभावें ॥१॥पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥तुका ह्मणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥
तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥तुका ह्मणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥तुका ह्मणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आिंळगीं मज ॥३॥
इंिद्रयांचीं दिनें । आह्मी केलों नारायणें ॥१॥ह्मणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥२॥तुका ह्मणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥तुका ह्मणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥तैसा भिक्तवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥काजव्याच्या ज्योती । तुका ह्मणे न लगे वाती ॥३॥
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥ज्याल्याचें तें फळ। अंगीं लागों नेदी मळ ॥२॥तुका ह्मणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥॥ लळतें ९ ॥
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥तुका ह्मणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥
न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥१॥कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥३॥अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥४॥भावभक्ती सत्त्वगुण जाला दुर्जना । तुका ह्मणे सकळां छंदें खेळे आपण ॥५॥
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥२॥तुका ह्मणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आह्मांसी तुटी ॥३॥
जाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥तुका ह्मणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराई ॥३॥
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति ह्मणती गोविंदु रे ॥१॥विठोबाचीं वेडीं आह्मां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥सदा सन सांत आह्मां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥तुका ह्मणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक॥३॥
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण ह्मण कां मुरारि ॥१॥हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥उपास पारणें न लगे वनसेवन। न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यज्ञां परिस तुका ह्मणे हें सार ॥३॥
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे ह्मणती॥१॥तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥तुका ह्मणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥३॥
न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुह्मी सकळ ह्मणा ॥ध्रु.॥राम ह्मणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौ†याशी ॥२॥मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका ह्मणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥३॥
थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥तुकाह्मणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥॥९॥
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥किती नेणों तुह्मां साहाते कटकट । आह्मी च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुह्मां वोखटीं ढाळ देवा ॥२॥तुका ह्मणे धीर कारण आपुला । तुह्मीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥
आमुचे ठाउके तुह्मां गर्भवास । बिळवंत दोष केले भोग ॥१॥काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥तुका ह्मणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥
निर्दयासी तुह्मी करितां दंडण । तुमचें गा†हाणें कोठें द्यावें ॥१॥भाकितों करुणा ऐकती कान ।उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें॥२॥तुका ह्मणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥
नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥२॥तुका ह्मणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥३॥
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥हें कां मिळतें उचित । तुह्मी नेणा कृपावंत ॥ध्रु.॥सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥२॥तुका ह्मणे नास । आह्मां ह्मणविलियां दास॥३॥
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥तुका ह्मणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । ह्मणऊनि जीव त्रासलासे ॥१॥लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥तुका ह्मणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥३॥
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥२॥तुका तुमचा ह्मणवी दास । तेणें आस पुरवावी ॥३॥
माझी मज जाती आवरली देवा । नव्हतां या गोवा इंिद्रयांचा ॥१॥कासया मी तुझा ह्मणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥तुका ह्मणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुह्मां ॥३॥
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुह्मी ॥ध्रु.॥नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥२॥तुका ह्मणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥३॥
एका ऐसें एक होतें कोणां काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥तुका ह्मणे जाळीं अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥३॥
जाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥२॥तुका ह्मणे भाग । गेला निवारला लाग ॥३॥
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥आतां होईल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥तुका ह्मणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥
नाहीं माथां भार । तुह्मी घेत हा विचार ॥१॥जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥२॥तुका ह्मणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥
माझें जड भारी । आतां अवघें तुह्मांवरी ॥१॥जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥करितों जें काम। माझी सेवा तुझें नाम ॥२॥तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे॥३॥
तुह्मी आह्मी भले आतां । जालों चिंता काशाची॥१॥आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥तुका ह्मणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥आलिया वचनें रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥तुका ह्मणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥
कोण पुण्य कोणा गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी॥१॥जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संवसारा पाणी ॥ध्रु.॥कोण हा भाग्याचा । ऐसियांसी बोले वाचा ॥२॥तुका ह्मणे त्यांचे भेटी। होय संसारासी तुटी ॥३॥
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुह्मां सोई ॥१॥एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥२॥तुका ह्मणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥३॥
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥कोणा एका भावें तुह्मी अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥तुका ह्मणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥३॥
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥तांतडींत करीं ह्मणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥संकल्पाच्या बीजें इंिद्रयांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥तुका ह्मणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥३॥
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥१॥नाही केली जीवेंसाटी । तों कां गोष्टी रुचे तें ॥ध्रु.॥आधी निर्धार तो सार । मग भार सोसीन ॥२॥तुका ह्मणे खाऊं जेवूं । नेदूं होऊं वेगळा ॥३॥
होइल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥तुका ह्मणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥३॥
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आह्मी असों ॥ध्रु.॥नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥तुका ह्मणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥३॥
निष्ठ तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी॥१॥केला च करावा केला कइवाड । होईल तें गोड न परेते ॥ध्रु.॥मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥२॥तुका ह्मणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥३॥
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥गादल्याचा जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥तुका ह्मणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥आजिवरि होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥२॥तुका ह्मणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥३॥
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आह्मां ॥२॥तुका ह्मणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥उधारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥करा आतां मजसाटीं वाड पोट । ठाव नाहीं तंटे जालें लोकीं ॥२॥तुका ह्मणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥३॥
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥तुका ह्मणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥३॥
गोदे कांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें॥१॥देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥राखोनियां ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥तुका ह्मणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥३॥
न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥सावधान चित्त होईल आधारें । खेळतां ही बरें वाटईल ॥२॥तुका ह्मणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥३॥
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥२॥तुका ह्मणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥
अवचिता चि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां॥१॥भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥२॥तुका ह्मणे वांटा जाला । बोलों बोली देवासीं ॥३॥
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥तुका ह्मणे नव्हे धीर । तुह्मां िस्थर दयेनें ॥३॥
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥जिहीं केला मूर्तिमंत । ऐसे संतप्रसाद ॥ध्रु.॥सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥तुका ह्मणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निज खुण राहिलोंसें ॥१॥आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥एकविध भाव नव्हे अभावना । आणिकिया गुणां न मिळवे ॥२॥तुका ह्मणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥३॥
काय तुझी थोरी वणूप मी पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥१॥तुज ऐसी दया नाहीं आणिकासी । ऐसें हृषीकेशी नवल एक ॥ध्रु.॥कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केलें कोठें त्यांनीं ॥२॥अकस्मात तेथें रणखांब रोविला । युद्धाचा नेमिला ठाव तेथें ॥३॥कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणीं आले तेथें ॥४॥तये काळीं तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती ह्मणोनियां ॥५॥हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥६॥ऐसिये आकांतीं वांचों कैसे परी । धांव बा श्रीहरी लवलाहें ॥७॥टाकोनियां पिलीं कैसें जावें आतां । पावें जगन्नाथा लवलाहीं ॥८॥आली तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥९॥एका गजाचिया कंठीं घंटा होती। पाडिली अवचिती तयांवरी ॥१०॥अठरा दिवस तेथे द्वंदजुंज जालें । वारा ऊन लागलें नाहीं तयां ॥११॥जुंज जाल्यावरी दाविलें अर्जुना । तुह्मीं नारायणा पिक्षयांसी ॥१२॥पाहें आपुलिया दासां म्यां रिक्षलें । रणीं वांचविलें कैशा परी ॥१३॥ऐसी तुज माया आपुल्या भक्तांची । माउली आमुची तुका ह्मणे ॥१४॥
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥तुका ह्मणे आतां आपुल्या सायासें । आह्मां जगदेशें सांभाळावें ॥३॥
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥देह सांभाळून। पायांवरी लोटांगण ॥२॥विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥३॥
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥३॥मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघें गंगा काई परतों जाणे ॥४॥तुका ह्मणे कोठें उदार मेघां शिक्त । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
युक्ति तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥तुका ह्मणे तुह्मी केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥३॥
हा गे आलों कोणी ह्मणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥तुह्मी तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥तुका ह्मणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
कैसा तीं देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंतीं डोळीं नारायणा ॥१॥तेणें लोभें जीव जालासे बराडी । आह्मी ऐशी जोडी कइप लाभों ॥ध्रु.॥असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥२॥तुका ह्मणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणाक्षणां होते ॥३॥
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिरों नेणे ॥ध्रु.॥सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥२॥तुका ह्मणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥३॥
काय माझा पण होईल लटिका । िब्रदावळी लोकां दाविली ते ॥१॥खरी करूनियां देइप माझी आळी । येऊनि कृवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥आणीक म्यां कोणा ह्मणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥तुका ह्मणे मज येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनीं च ॥३॥
तुह्मां आह्मां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥नेणपणें आह्मी आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥तुका ह्मणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥
नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥तुका ह्मणे माझी येथें चि आवडी। श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥
ह्मणऊनी लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥१॥पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥२॥तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें॥३॥
जेणें वाढे अपकीर्ति । सर्वाथाअ तें वर्जावें ॥१॥सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥२॥तुका ह्मणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥२॥तुका ह्मणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें॥३॥
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥तुका ह्मणे दुस†या भावें । छायें नावें न देखवे ॥६॥
न संडावा आतां ऐसें वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥१॥ह्मणऊनि मनें विळयेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥नाना वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥२॥तुका ह्मणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥३॥
सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥१॥वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम जाला ॥२॥तुका ह्मणे धणी ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
देईल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥गुणां ऐसा भरणा भरी। जो जें चारी तें लाभे ॥२॥तुका ह्मणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥
तेव्हां होतों भोगाधीन । तुह्मां भिन्न पासूनि ॥१॥आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥सन्मुख जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥२॥चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥सहज िस्थत आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना॥४॥तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥तुका ह्मणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥॥५॥
केला कैवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥अबाळीनें जावें निचिंतिया ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥तुका ह्मणे बळी देतां तें निधान । भिकेसाटीं कोण राज्य देतो ॥३॥
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥तुका ह्मणे तरीं सज्जनाची कीर्ति । पुरवावी आर्ति निर्बळांची ॥३॥
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें॥१॥मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा ॥ध्रु.॥उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥२॥तुका ह्मणे माझें खरें देणें घेणें । तुह्मी साक्षी जाणें अंतरींचें ॥३॥
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥२॥तुका ह्मणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥या चि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥२॥तुका ह्मणे न सरें मागें । होईन लागें आगळा ॥३॥
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां॥१॥मन येथें साहए जालें । हरिच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥तुका ह्मणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥३॥
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥१॥पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥कांहीं नेघें शिरीं निमित्त्याचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥२॥तुका ह्मणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥३॥
लौकिकासाटीं या पसा†याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥डव्हिळल्या मनें वितिळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥२॥तुका ह्मणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥२॥तुका ह्मणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥३॥
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आह्मी जालों निंद लंडीपणें ॥ध्रु.॥उभयतां आहे करणें समान । तुह्मां ऐसा ह्मणें मी ही देवा ॥२॥तुका ह्मणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥३॥
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥तुका ह्मणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
तुज
— तुला
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
काई
— काय
ठायीं
— ठिकाणी
तैसें
— तसे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
माया
— भासमान करणारी शक्ती
वरी
— वर; शिवाय
नोहे
— नाही, होत नाही
देखोनि
— पाहून
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
कीजे
— केले जाते
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
जंव
— जोपर्यंत
घडे
— घडते, शक्य होते

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा