नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥१॥निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥२॥आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥३॥तुका ह्मणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥४॥
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥आतां माझ्या मना होइप सावधान । वोंपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥तुका ह्मणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥१॥पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते॥ध्रु.॥आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥तुका ह्मणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥
साधावा तो देव सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण॥१॥मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥तुका ह्मणे निज भोगईल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥३॥
जळों अगी पडो खान । नारायण भोक्ता ॥१॥ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥भोजनकाळीं करितां धंदा । ह्मणा गोविंदा पावलें ॥२॥तुका ह्मणे न लगे मोल। देवा बोल आवडती ॥३॥
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बिळवंत ॥२॥तुका ह्मणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥३॥
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाची च मूर्ति ॥२॥तुका ह्मणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥तरी च नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥जावें वनांतरा। येणें उद्देशें दातारा ॥२॥तुका ह्मणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥
येइल तुझ्या नामा । जाल ह्मणों पुरुषोत्तमा ॥१॥धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥जगा कथा नांव। निराशेनें नुपजे भाव ॥२॥तुह्मी साक्षी कीं गा । तुका ह्मणे पांडुरंगा ॥३॥
नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥१॥रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥तुका ह्मणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥३॥
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुह्मांसी ॥१॥तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥आड ऐसें येतें पाप। वाढे ताप आगळा ॥२॥तुका ह्मणे गुण जाला । हा विठ्ठला हीनशिक्त ॥३॥
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥कोण्या पापें उदो केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥न देखवे पिडला सर्प। दया दर्प विषाचा ॥२॥तुका ह्मणे भलें । मज तो न वजे साहिलें॥३॥
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥न धरावा धीर । धांवा नका चालों िस्थर ॥२॥तुका ह्मणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥४॥तुका ह्मणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥३॥२६८९. उद्वेगासी बहु फाकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥तुका ह्मणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरि विज्ञापना ॥३॥
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥क्षणभंगुर ते ठाव। करूनि सांडावे चि वाव ॥२॥तुका ह्मणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥
मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥तुका ह्मणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥विश्वासिया घडे लाभ । देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥तुका ह्मणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥तुका ह्मणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥
अतित्याई बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥१॥हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥अवचटें अिग्न जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥२॥जैसें तैंसें दावी आरसा । नकटएा कैसा पालटे ॥३॥
हेंदयाचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥तुका ह्मणे फजितखोरा। ह्मणतां बरा उगा रहा ॥३॥
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥तुका ह्मणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥तुका ह्मणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥
एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती ॥१॥तेणें जालें अवघें काम । निवारला भवश्रम ॥ध्रु.॥परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥तुका ह्मणे फार । नाहीं लागत वेव्हार ॥३॥
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥कैसी जाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥संसाराची खंती । मावळल्या तरी शिक्त ॥२॥तुका ह्मणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥२॥तुका ह्मणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥३॥
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥हुंगों नये गोहवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥२॥तुका ह्मणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥
न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥आणीक काय तुह्मां काम । आह्मां नेदा तरी प्रेम ।कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥आह्मीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें ।संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी ।जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।होईन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा ।तुका ह्मणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥२७०४. भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥२॥तुका ह्मणे जड । मज न राखावें दगड ॥३॥
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥तुका ह्मणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥होइप बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥तुका ह्मणे लोटांगणीं । भिक्तभाग्यें जाली धणी ॥३॥
नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥१॥जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥तुका ह्मणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥३॥
आह्मी सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥१॥तरी ह्मणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥२॥तुका ह्मणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुह्मी हो श्रीपती साक्षी येथें ॥३॥
नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥२॥तुका ह्मणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥
कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥उफराटी तुह्मां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥२॥तुका ह्मणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥३॥
शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥प्रीत कळे आलिंगनीं। संपादनीं अत्यंत ॥२॥तुका ह्मणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें॥३॥
नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥१॥तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥नाहीं विटाळिलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥२॥तुका ह्मणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥३॥
ऐकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥तुका ह्मणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥३॥
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥तुका ह्मणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥
ह्मणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥तुका ह्मणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पिला ॥३॥
विभ्रंशिली बुद्धि देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥१॥पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥तुका ह्मणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥३॥
न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥ह्मणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥मोकळें हे मन कष्ट। करी नष्ट दुर्जन ॥२॥तुका ह्मणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥३॥
कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥१॥धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥तुका ह्मणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥
उकरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥१॥कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥२॥तुका ह्मणे काय उपदेश वेडएा । संगें होतो रेडएासवें कष्ट ॥३॥
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥२॥तुका ह्मणे शूर राखे । गाढएा वाखेसांगातें॥३॥
एक एका साहए करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥तुका ह्मणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥३॥
फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥तुका ह्मणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥१॥कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥आवडे तें तें च यासी । ब्रह्मरसीं निरसें ॥२॥तुका ह्मणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥३॥
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित॥१॥तरि ह्मणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥तुका ह्मणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥ध्रु.॥पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥२॥तुका ह्मणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥३॥
असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥१॥धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शिक्तहीन ॥ध्रु.॥भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥तुका ह्मणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येइप लवकरी ॥३॥
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या॥१॥ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥गळ गिळी आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥२॥तुका ह्मणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥३॥
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥तुका ह्मणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥३॥
मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें॥१॥पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥३॥
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥२॥तुका ह्मणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥परी आह्मी असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥तुका ह्मणे तुह्मी बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥
लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥तुका ह्मणे वाटे चित्त । करा फजित ह्मणऊनि ॥३॥
पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ ॥प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥तुका ह्मणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥३॥
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥२॥निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥३॥
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥तुका ह्मणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥३॥
न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥१॥मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥२॥तुका ह्मणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥३॥
तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव ह्मणऊनि ॥२॥तुका ह्मणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥३॥
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥तुह्मांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥तुका ह्मणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥नाहीं भेदू ह्मुण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥तुका ह्मणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥
कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥तुका ह्मणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥
याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥१॥येइप गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे॥२॥विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका ह्मणे हें चि आह्मां ध्यान निरंतर ॥३॥
गंगा आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥१॥तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें॥२॥तुका ह्मणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥३॥
पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम ह्मणतां तुझी बसली दांतखीळ ॥१॥हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । ह्मणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥२॥तुका ह्मणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न ह्मणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥
आह्मां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥२॥धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥३॥माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥४॥नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका ह्मणे गेलें । वांयांविण न घेतां ॥५॥
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥निक्षेपिलें धन। तेथें गुंतलेसे मन ॥२॥नाशिवंतासाटीं । तुका ह्मणे करिसी आटी ॥३॥
करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥१ ॥ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥िप्रया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥२॥तुका ह्मणे एका । हरीविण नाहीं सखा ॥३॥
आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥आधीं करूं चौघाचार। मग सांडूं भीडभार ॥२॥तुका ह्मणे सेवटीं । तुह्मां आह्मां घालूं तुटी ॥३॥
नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥तुका ह्मणे तूं निर्लज्ज । आह्मां रोकडी गरज ॥३॥
बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥१॥बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका ह्मणे धांवे खाऊं ॥३॥
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥२॥तुका ह्मणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥३॥
केली सलगी तोंडपिटी । आह्मी लडिवाळें धाकुटीं॥१॥न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥अवघ्यांमध्यें एक वेडें । तें चि खेळविती कोडें ॥२॥तुका ह्मणे मायबापा । मजवरि कोपों नका ॥३॥
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥हातीं प्रेमाचें भातुकें । आह्मां देऊनियां निकें ॥२॥तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥३॥
तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥१॥दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका ह्मणे पाहे । कोण आस या मुक्तीची ॥३॥
शूद्रवंशी जन्मलों । ह्मणोनि दंभें मोकलिलों ॥१॥अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥२॥सर्वभावें दीन । तुका ह्मणे यातिहीन ॥३॥
वेडें वांकडें गाईन । परि मी तुझा चि ह्मणवीन॥१॥मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥केल्या अपराधांच्या राशीं । ह्मणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥तुका ह्मणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥
हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥देइन आिंळगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥३॥कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥५॥अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥८॥तुका ह्मणे तया उपकारें बांधलों। ह्मणऊनि आलों शरण संतां ॥९॥
लटिका तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंिद्रयें ॥१॥लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥लटिकिया विपित्त हरिविण करिती । हरि नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥२॥तुका ह्मणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा ॥३॥
सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥२॥शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥तुका ह्मणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥
एकांतांचे सुख देइप मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देइप देवा ॥२॥कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥तुका ह्मणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥
भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥२॥तुका ह्मणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥३॥
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥२॥तुका ह्मणे शुद्ध मन । समाधान पाहिजे॥३॥
मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥दावी प्रेमभातें। आणि अंगावरि चढतें ॥२॥तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें॥३॥
कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें॥१॥ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥२॥तुका ह्मणे जाला । लाभ सहज विठ्ठला॥३॥
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची॥१॥एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥तुका ह्मणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥
संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं ।तृष्णा देशधडी केलों। भिक्तभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों।मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची ।करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची॥ध्रु.॥इंिद्रयें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान ।नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक िस्थर नाहीं ।करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी। न चले माझें यास कांहीं ॥२॥शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु। धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें ।तुका ह्मणे हरी राखे भलत्या परी । आह्मी तुझीं शरणागतें ॥३॥
नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३॥
प्राण समर्पिला आह्मी । आतां उशीर कां स्वामी॥१॥माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥२॥तुका ह्मणे सेवा । कैसी बरी वाटे देवा॥३॥
येणें मागॉ आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥२॥तुका ह्मणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥
तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं॥४॥
तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥३॥
धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥३॥कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥तुका ह्मणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥
उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥२॥तुका ह्मणे शेकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥३॥
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥तुका ह्मणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥
अवघीं च तीथॉ घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥तुका ह्मणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥३॥
सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥१॥ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥ध्रु.॥जयासी न कळे भक्तीचें महिमान । तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये ॥२॥ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये ॥३॥तुका ह्मणे ज्यासी नाहीं हरिभिक्त । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥४॥
अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥जातीऐसा दावी रंग। बहु जग या नावें ॥२॥तुका ह्मणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.