मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग २८८९–२९८९

Tukaram Gatha, part 29

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग २९ — अभंग २८८९ ते २९८९.

शुद्ध ऐसें ब्रह्मज्ञान । करा मन सादर ॥१॥रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं॥३॥
अिग्न हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तो चि तापे जाणोनियां ॥१॥उदक ह्मणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥काय वस्त्र ह्मणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥तुक्यास्वामी ह्मणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥
भक्त देवाघरचा सुना । देव भक्ताचा पोसणा ॥१॥येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥देव भक्ताची कृपाळु माता । भक्त देवाचा जनिता ॥२॥तुका ह्मणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥
बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥२॥तुका ह्मणे अंतीं । ठाव मागितला संतीं॥३॥
मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥जे जे हरिरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥वेद खाय शंखासुर। त्याचें वागवी कलिवर ॥२॥तुका ह्मणे ऐसा । बराडी हा भिक्तरसा॥३॥
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥कैंचा राम अभागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥तुका ह्मणे जडा । काय चाले या दगडा॥३॥
आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥१॥तुह्मां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥तुह्मी देहशून्य। आह्मां कळे पाप पुण्य ॥२॥सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥३॥
मायबापें केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी॥१॥पुंडलीकें काय केलें । परब्रह्म उभें ठेलें ॥ध्रु.॥तैसा होइप सावधान। हृदयीं धरीं नारायण ॥२॥तुका ह्मणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥३॥
सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥३॥
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥२॥मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥३॥जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥तुका ह्मणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥रविरिश्मकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥तुका ह्मणे चित्त । माझें पायीं अखंडित॥३॥
तुह्मां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥फुकासाटीं जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥कृपेचें भुकेलें। होय जीवदान केलें ॥२॥तुका ह्मणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें॥३॥
लोक ह्मणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥अधिकार नाहीं। पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥मन जाणे पापा । तुका ह्मणे मायबापा॥३॥
एका ह्मणे भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥१॥कांहीं न करितां आयास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥बरें वाइटाचें। नाहीं मज कांहीं साचें ॥२॥तुका ह्मणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं॥३॥
आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥मज आपुलेंसें ह्मणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥वेचियेली वाणी । युक्ती अवघी चरणीं ॥२॥तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय॥३॥
न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥१॥जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥तुका ह्मणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥३॥
तुझ्या नामाची आवडी । आह्मी विठो तुझीं वेडीं॥१॥आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥तुका ह्मणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥
साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥तैसें आह्मां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥देवा देवपाट देव्हा†यावरी बैसे स्पष्ट॥४॥ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥५॥
धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें॥३॥तुका ह्मणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥
न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥करावें लाताळें। ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥न कळे उचित । तुका ह्मणे नीत हित॥३॥
कंठ नामसिका । आतां किळकाळासी धका ॥१॥रोखा माना कीं सिका माना । रोखा सिका तत्समाना ॥ध्रु.॥रोखा न मना सिका न मना । जतन करा नाककाना ॥२॥सिका न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥३॥सिका मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥४॥तुका ह्मणे नाम सिका । पटीं बैसलों निजसुखा॥५॥
भूतीं देव ह्मणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥तुका ह्मणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां॥३॥
हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥१॥पावलें तें ह्मणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥तुका ह्मणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥
नेसणें आलें होतें गळ्या । लोक रळ्या करिती॥१॥आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥सावरिलें नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥४॥बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥५॥तुका ह्मणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥
जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न कळे ॥१॥देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥३॥तुका ह्मणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥तुका ह्मणे कइप होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥
मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आह्मी तरी फुका मागों बळें ॥१॥नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥नेदूं भोग आह्मी आपुल्या शरीरा । तुह्मांसी दातारा व्हावें म्हूण ॥२॥कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥तुका ह्मणे तुज काय मागों आह्मी । फुकाचे कां ना भी ह्मणसी ना ॥४॥
काय लवण किळकेविण । एके क्षीण सागरा ॥१॥मां हे येवढी अडचण । नारायणीं मजविण ॥ध्रु.॥कुबेरा अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥२॥तुका ह्मणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥३॥
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ॥३॥तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥तुका ह्मणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥
वैराग्याचें भाग्य । संतसंग हा चि लाग ॥१॥संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥तो चि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥३॥
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥१॥राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां॥२॥तुका ह्मणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠिद्धसिद्धि ॥३॥
नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्तीं असों द्यावी ॥१॥सरलिया भोग येईन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥आतां मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥२॥तुका ह्मणे मुखीं असो तुझें नाम । देईल तो श्रम देवो काळ ॥३॥
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥२॥तुका ह्मणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण॥१॥नाहीं आह्मांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥द्वैताद्वैतभावें। अवघें व्यापियेलें देवें ॥२॥तुका ह्मणे हरि । आह्मांमाजी क्रीडा करी ॥३॥
नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥क्रियाकर्महीन । जालों इंिद्रयां अधीन ॥२॥तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी॥३॥
जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥१॥तो एक पंढरीचा राणा । नये श्रुती अनुमाना ॥ध्रु.॥विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥२॥तुका ह्मणे तो आकळ । आहे सकळव्यापक॥३॥
नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥१॥जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी॥३॥तुका ह्मणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥४॥
आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥२॥जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥३॥तुका ह्मणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥४॥
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥तुका ह्मणे रंग रंग । रंगलें पांडुरंगे ॥३॥
कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥आतां हें चि काम करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥नेंदाविया वृत्ति। आतां उठों चि बहुती ॥२॥उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥३॥
मागेन तें एक तुज । देइप विचारोनि मज ॥१॥नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥रंक होईन दीनांचा । घायें देहपात साचा॥३॥तुका ह्मणे हें चि आतां । देइप देइप तूं सर्वथा ॥४॥
जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥तरि म्यां बोलावें तें काई । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥२॥तुका ह्मणे सत्ता । होसी सकळ करिता॥३॥
तुह्मी कांटाळलां तरी । आह्मां न सोडणें हरी ॥१॥जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥केली जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥२॥तुका ह्मणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥३॥
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥तुका ह्मणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥
सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥
काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥२॥कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥तुका ह्मणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥४॥
आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥२॥तुका ह्मणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥३॥
आह्मी मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची ॥१॥सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥पाप पुण्य ज्याचें तो चि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आह्मांसवें ॥३॥तुका ह्मणे तुह्मी आइका हो मात । आह्मी या अतीत देहाहूनी ॥४॥
लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥तुका ह्मणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥
हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥१॥सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥दुरील जवळी आपण चि होतें । कविळलें चित्तें जिवापासीं ॥२॥तुका ह्मणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥३॥
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥३॥
हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥तुका ह्मणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥३॥
ऐसा घेइप कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास॥१॥मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ध्रु.॥तोडीं जाणिवेची कळा । होइप वृत्तीसी वेगळा ॥२॥तुका ह्मणणे नभा । होइप आणुचा ही गाभा ॥३॥
सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापें ॥१॥ऐसे तुह्मां ठायाठाव । देव ह्मुण संपादे ॥ध्रु.॥कैची चिरामध्यें चिरे। मना बरें आलें तें ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा॥३॥
इहलोकीं आह्मां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥२॥तुका ह्मणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥३॥
आह्मी भाग्याचे भाग्याचे । आह्मां तांबे भोपळ्याचे॥१॥लोकां घरीं गाई ह्मैसी । आह्मां घरीं उंदीरघुसी ॥ध्रु.॥लोकां घरीं हत्ती घोडे । आह्मां आधोडीचे जोडे ॥२॥तुका ह्मणे आह्मी सुडके। आह्मां देखोन काळ धाके ॥३॥
गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि ह्मणें हरी॥१॥माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥२॥तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥३॥तुका ह्मणे माझी विनंती । तुह्मी परिसा कमळापती ॥४॥
विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥चंदन िप्रय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥तुका ह्मणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना॥३॥
देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥२॥तुका ह्मणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥३॥
मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥तुह्मी अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥मैथुनाचें सुख सांगितल्या शून्य । अनुभवाविण कळूं नये ॥२॥तुका ह्मणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥तुका ह्मणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥
तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥तुका ह्मणे बिळये गाढे । किळकाळ पायां पडे ॥३॥
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां॥१॥आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥तुका ह्मणे देवा । देइप चरणांची सेवा ॥३॥
अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥२॥तुका ह्मणे जवळी आलें। उभे ठालें समचरणीं ॥३॥
देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई ॥१॥आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥तुका ह्मणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥
जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥जाल्या हीन शिक्त नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥बाइल ह्मणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥२॥तुका ह्मणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नऴिचया सृष्टि चेविल्या जेवीं ॥२॥तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥४॥
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥कइप कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥तुका ह्मणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥
ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण॥१॥साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥ध्रु.॥काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥२॥तुका ह्मणे निरंजनी। शट कैंचा ब्रह्मज्ञानी ॥३॥
वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥आशा धरोनि मनीं । कांहीं देईल ह्मणऊनि ॥२॥पोटा एका साटीं । तुका ह्मणे जाले कष्टी ॥३॥
प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥लटिकें तें फेडा । तुका ह्मणे जाय पीडा॥३॥
ऐका कलीचें हें फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ ॥१॥चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥वामकवळ मार्जन । जन जाईल अधोपतन ॥३॥तुका हरिभिक्त करी । शिक्त पाणी वाहे घरीं॥४॥
गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । ह्मणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥१॥पवित्राला ह्मणती नको हा कंटक । मानिती आित्मक अनामिका ॥ध्रु.॥डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥४॥इंिद्रयांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥६॥तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥व्याली वाढविलें। निजपदीं निजवलें ॥२॥दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रह्मरसें ॥३॥विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥तुका ह्मणे बळ । तोरडीं हा किळकाळ ॥५॥
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥२॥तुका ह्मणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥१॥तुझ्या नामाचा विश्वास । आह्मां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥नाम घ्या रे कोणी फुका। भावें सांगतसे तुका ॥३॥
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥१॥घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥तुका ह्मणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥
बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडएांच्या ॥ध्रु.॥वाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥२॥तुका ह्मणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुत†याचें खाणें लगबगा ॥३॥
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥२॥तुका ह्मणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥३॥
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें॥२॥संशयाचें बि†हडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥३॥तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आह्मी भार वाहिका ॥४॥
झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥काय तें उचित तुह्मां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥तुका ह्मणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा॥१॥हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभक्ताची ॥ध्रु.॥ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥२॥नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥३॥तुका ह्मणे त्याचे दिवशीं। रांड गेली महारापाशीं ॥४॥
पतित मी पापी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥सुदामा ब्राह्मण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥तुका ह्मणे तुज शरण निजभावें । पाप निर्दाळावें पांडुरंगा ॥५॥
कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥ ।३॥तुका ह्मणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य ॥४॥
नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥१॥तुह्मां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥शिक्तहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥२॥तुका ह्मणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥३॥
पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ति वाढे ॥२॥तुका ह्मणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥दिसतो हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥२॥ह्मणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका। जो या लोकां दाखवितो ॥३॥
दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे॥१॥ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥२॥काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥३॥तुज ठावें आह्मां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण॥४॥कान्हा ह्मणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥५॥
सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥१॥पावलों आपुलें केलें लाहें रास । निद।वां परिस काय होय ॥ध्रु.॥कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥२॥उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा ह्मणे कांहीं बोलों आतां ॥३॥
असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येइल येथें ॥१॥करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥ध्रु.॥करितां रोदना बापुडें ह्मणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥३॥
चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥१॥कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥ध्रु.॥न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सत्त्वा होइल हानी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥३॥
न लगे चिंता आतां अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥१॥घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ध्रु.॥त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥२॥तुकयाबंधु ह्मणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥३॥
मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु.॥वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥२॥तुकयाबंधु ह्मणे आलें अनुभवास । तेणें च आह्मांस नागविलें ॥३॥
बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मां ॥२॥कान्हा ह्मणे कां रे निःकाम देखिलें । ह्मणोनि मना आलें करितोसी ॥३॥
धिंदधिंद तुझ्या करीन धिंदडएा । ऐसें काय वेडएा जाणितलें ॥१॥केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥ध्रु.॥मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥२॥तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥३॥
भुक्ति मुक्ति तुझें जळों ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥१॥रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥२॥नको होऊं कांहीं होसील प्रसन्न। दे माझ्या आणून भावा वेगीं ॥३॥तुकयाबंधु ह्मणे पाहा हो नाहींतरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥४॥
मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥नको लावूं आह्मां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन मी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥३॥
नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी॥ध्रु.॥तुह्मां आह्मां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥२॥तुकयाबंधु ह्मणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे॥३॥
लालुचाईसाटीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ध्रु.॥मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥२॥करुणारसें तुकयाबंधु ह्मणे भुलवीन । काढूनि घेईन निज वस्तु ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
तुज
— तुला
सकळ
— सर्व
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
घडे
— घडते, शक्य होते
तया
— त्याला, त्या
ठायीं
— ठिकाणी
येर
— दुसरा, इतर
जैसें
— जसे
तैसें
— तसे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जेवीं
— ज्याप्रमाणे
वरी
— वर; शिवाय
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
देखे
— पाहतो
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
काई
— काय
परिसा
— ऐका
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
देखोनि
— पाहून

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा