तुझीं वर्में आह्मां ठावीं नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी ॥ध्रु.॥जाणोनि अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥२॥तुकयाबंधु ह्मणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥३॥
अवघीं तुज बाळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥ह्मणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दुरी ॥ध्रु.॥एकां सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एक दारीं गळा श्रमविती ॥२॥एकां नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्नें करितील ॥३॥एकें वाटतील न वजावीं दुरी । एकांचा मत्सर जवळी येतां ॥४॥तुकयाबंधु ह्मणे नावडतीं त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥५॥
निनांवा हें तुला । नांव साजे रे विठ्ठला ।बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें ।भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे ।हातीं फांशाचे गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥२ ॥तुकयाबंधु ह्मणे मिस्किन । करितोसी देखोन ।पाहा दुरिवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥३॥
नाहीं घटिका ह्मणसी । लाग लागला तुजपाशीं ।पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन ।माणसांमधून । उठविलें खाणोया ॥ध्रु.॥आह्मीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि ।जालासी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥२॥तुकयाबंधु ह्मणे केलें। उघडें मजचि उमगिलें ।ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें॥३॥
कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । ह्मणवितोसी परि केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥१॥काय केलें होतें आह्मीं । सांग तुझें एकये जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया॥ध्रु.॥भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥२॥तुकयाबंधु ह्मणे भला । कैसें ह्मणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहींतरी॥३॥
आतां कळों आले गुण । अवघे चि यावरोन । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥या नांवें कृपासिंधु । ह्मणवितोसी दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ध्रु.॥अमळ दया नाहीं पोटीं । कठीण तैसाचि कपटी । अंधळ्याची काठी । माझी गुदरसी च ना ॥२॥तुकयाबंधु ह्मणे पुरता । नाहीं ह्मुण बरें अनंता। एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥३॥
काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा । गिळावासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥माझें बुडविलें घर। लेंकरें बाळें दारोदार । लाविलीं काहार । तारातीर करोनि ॥ध्रु.॥जीव घ्यावा कीं द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें उरलें आहे। भावाचिया निमित्यें ॥२॥तुकयाबंधु ह्मणें जग । बरें वाईट ह्मणो मग । या कारणें परी लाग । न संडावा सर्वथा ॥३॥
मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाई ॥१॥हे कां भिक्तचे उपकार। नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे जालासी ॥ध्रु.॥एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो निर्लज्जा ॥२॥तुकयाबंधु ह्मणे भला । आणीक काय ह्मणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥३॥
निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥ऐसा काढियेला निस । काय ह्मुण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे॥ध्रु.॥उरलों पालव्या सेवटीं । तें ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥२॥तुकयाबंधु ह्मणे गोड । बहु जालें अति वाड । ह्मणोनी कां बुड । मुळ्यांसहित खावें ॥३॥
बरा जाणतोसी धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती। करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥१॥आतां जाब काय कैसा। देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ध्रु.॥सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व । येइल परि हा भाव। ज्याचा त्यासी कारणा ॥२॥तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां आह्मां बोल कांहीं । जडोनियां पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥३॥
कांहीं विपित्त अपत्यां । आतां अमुचिया होतां । काय होईल अनंता । पाहा बोलों कासया ॥१॥बरें अनायासें जालें। सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥२॥तुकयाबंधु ह्मणे दगा । बरा दिला होता बागा । झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥३॥
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी अझून ।अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों नेदीं ॥१॥कळों येईल रोकडें । उभा करिन संतांपुढें ।तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥२॥ठेविला ये जीवनीं जीव । ह्मणे तुकयाचा बंधव ।माझा गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥३॥
मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला।तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार ।सिद्धासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा ।धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥२॥अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी ।तुकयाबंधु ह्मणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥३॥
आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक। नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥१॥संबंध पडिला कोणाशीं। काय डोळे झांकितोसी । नेईन पांचांपाशीं । दे नाहींतरी वोढूनि॥ध्रु.॥सुखें नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें । तरि तें ही विचारिलें । आह्मी आहे तुज आधीं ॥२॥असें च करूनि किती । नागविलीं नाहीं नीती । तुकयाबंधु ह्मणे अंतीं । न सोडिसी ते खोडी॥३॥
तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते आह्मांसवें आतां न फावे कांहीं ॥१॥नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं॥ध्रु.॥अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥२॥आतां निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु ह्मणे राखावें । देवा महत्व आपुलें॥३॥
बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आह्मां । काय सांगणें तें सांग ॥१॥देणें आहे कीं भांडाई । करणें आहे सांग भाई । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ध्रु.॥मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥२॥सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु ह्मणे खळखळ । करावी ते उरेल ॥३॥
आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके।जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाटीं ॥१॥नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें ।बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ध्रु.॥दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे ।दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनि ॥२॥तुकयाबंधु ह्मणे देखतां । अंध बहिर ऐकतां ।कैसें व्हावें आतां । इतकियाउपरी॥३॥
तिहीं ताळीं हेचि हाक । ह्मणती पांढरा स्फटिक ।अवघा बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥१॥थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।ह्मणोनि शाहाणे ते कोणी। तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ।नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥२॥सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण ।तुकयाबंधु ह्मणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥३॥
तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज। न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥तूं तर न होसी शाहाणा। नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ध्रु.॥न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥२॥आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु ह्मणे॥३॥
हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी परी पुढें ॥१॥मी तों सांगून उतराई । जालों आतां तुज काई । कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज कासावीस। होसी देवा ये कामें ॥२॥तुकयाबंधु ह्मणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥३॥
पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी पुण्यें । तुझ्या काय उणें आह्मां ॥१॥नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी । ह्मणउनि नाहीं ह्मणसील॥ध्रु.॥आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । ह्मणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥२॥तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा। केला कांहीं मागायाची नव्हती गरज ॥३॥
माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी । घालुनि अवघें वैकुंठ ॥१॥आतां न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें जालें ॥ध्रु.॥असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥२॥अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु ह्मणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥३॥
आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर । आला सकळसिद्धींचा ॥१॥जालों निधाई निधानें। लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें विच्छिन्न । दुःख जालें दारिद्र॥ध्रु.॥तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें । ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥२॥तुकयाबंधु ह्मणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा। आतां पुरुषोत्तमा । ऐसा सवदागर सांपडला ॥३॥
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूवाअचिया ॥१॥सुखें आनंदरूप आतां । आह्मी आहों याकरितां । निवारली चिंता । देणें घेणें चुकलें ॥ध्रु.॥जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥२॥तुकयाबंधु ह्मणे फिटला । पांग नाहीं बोलायाला। चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥३॥ ॥३७॥
काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं ।वास पंढरीचा जन्म सदा देइप । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥१॥कृपा देइप दान हरि मज कृपा देइप दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण ।आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं ।संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥२॥पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता ।नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥३॥
तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥१॥परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥तुकयाबंधु ह्मणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥तुकयाबंधु ह्मणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥१॥काय धाक आह्मां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तासाटीं ॥२॥पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥
राम ह्मणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥राम ह्मणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥राम ह्मणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥राम ह्मणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥राम ह्मणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥राम ह्मणतां ह्मणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥
मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥तुकयाबंधु ह्मणें अवघ्या देशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥
आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥१॥असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥मातेचिया परी देखती परनारी। ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥२॥तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥३॥सकळ इंिद्रयांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥तुकयाबंधु ह्मणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा॥५॥
नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥१॥परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥द्वयें द्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥२॥जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥३॥उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥तुकयाबंधु ह्मणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥
चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥उत्पित्तसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन ह्मणवीतसे ॥ध्रु.॥असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उिच्छष्टकवळा पसरी मुख ॥३॥तुकयाबंधु ह्मणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥४॥
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं ।जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥भला रे पुंडलिका भला। महिमा नव जाये वर्णिला ।दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें ।दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे किल्ल्या। संताचे हातीं दिल्या ।आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥
केली हार्णाळां अंघोळी । येऊनि बैसलों राउळीं॥१॥अजिचें जाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥२॥तुकयाबंधु ह्मणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥३॥ ॥१२॥
तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥तुका ह्मणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुह्मां कोणा ॥१॥लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥तुका ह्मणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥
एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साध्य काय तेथें ॥१॥काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥तुका ह्मणे देव केल्याविण साहे । फजिती आहे लटिक्या अंगीं ॥३॥
भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥१॥बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥तुका ह्मणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥
आवडीनें धरिलीं नांवें । िप्रयभावें चिंतन ॥१॥वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥निचाडएा चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥२॥धरिला मग न करी बळ । तुका ह्मणे कळ पायीं ॥३॥
कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥१॥ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥संतांचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोई ॥२॥तुका ह्मणे तरें । भवसिंधु एका सरें॥३॥
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥वाये टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥विठ्ठल आद्ये अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥तुका ह्मणे विठ्ठलवाणी। वदा कानीं आईका ॥३॥
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥मूढ पापी जैसे तैसे। उतरी कासे लावूनि ॥२॥तुका ह्मणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥ऐसियांचा संग देइप नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥ध्रु.॥उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥२॥तुका ह्मणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥
पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥तुका ह्मणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥३॥
न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर ह्मणतां वाचे ॥४॥तुका ह्मणे आसक्त जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥
बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥तुका ह्मणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥तुका ह्मणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । ह्मणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥२॥तुका ह्मणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥येरू ह्मणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥३॥येरू ह्मणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥५॥
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥तुका ह्मणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥
तुज न भें मी किळकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥माझा बिळया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रिक्षला ॥५॥वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य॥६॥छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥गजेंद्र स्मरे राम राम। त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥तुका ह्मणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥१२॥
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥ह्मणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका ह्मणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥तुका ह्मणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥
वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥१॥ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥तुका ह्मणे भले । जन्मा येऊनियां जाले ॥३॥
केली प्रज्ञा मनाशीं । तइप मी दास सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका ह्मणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥
नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥१॥उघडा मंत्र जाणा राम कृष्ण ह्मणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥शेष घेईन उिच्छष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥तुका ह्मणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥
जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥तुका ह्मणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणतसें ॥३॥
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । िस्त्रयेसी पाठवी उंच साडी ॥१॥गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥लेकराची रास स्वयें धांवें क्षाळूं ॥ न ह्मणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥२॥तुका ह्मणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥अतीत देखोनि होय पाठमोरा । व्याहएासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥द्विजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुर्काचे दासीचा लेंक होय ॥२॥तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
ब्रह्मज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥शास्त्रांचे भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका ह्मणे ॥३॥
गायत्री विकोन पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥२॥आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका ह्मणे ॥३॥
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥तुका ह्मणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ॥ध्रु.॥देवाब्राह्मणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें॥३॥तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥४॥
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥आतां ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥उपजला भाव । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥२॥तुका ह्मणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥तैसें तुह्मां आह्मां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥उदकावरील तरंग।तरंग उदकाचें अंग ॥२॥तुका ह्मणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया॥३॥
साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥तुका ह्मणे शहाणा होइप रे गव्हारा । चोयासीचा फेरा फिरों नको ॥४॥
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गहवार बोभाट जनामध्यें ॥१॥लटिके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥तुका ह्मणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥विसरतां रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥तुका ह्मणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥तुका ह्मणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥
थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥तुका ह्मणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥
जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥सांडोनियां वाळवंट । काय इिच्छसी वैकुंठ ॥ध्रु.॥खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥३॥
जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा॥१॥पोटा येतां हरलें पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥ध्रु.॥मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आह्मी लागलों ध्यानीं ॥२॥तुका ह्मणे मी पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रह्मींची आळ ॥३॥
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥तुका ह्मणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥
बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥१॥बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥
जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥१॥हें चि वोसनावोनी उठी । देव सांटविला पोटीं ॥ध्रु.॥नाहीं ओढा वारा। पडिला प्रसंग तो बरा ॥२॥तुका ह्मणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥कैचें पुण्य तया गांठी । व्रतें वेची लोभासाटीं ॥ध्रु.॥वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥तुका ह्मणे मोल । देउन घेतला सोमवल ॥४॥
बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥विटू दांडू चेंडू लगोया वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥३॥तुका ह्मणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥
तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥१॥अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥हातीं दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥तुका ह्मणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥
ह्मातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥सेजारी ह्मणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आह्मां ॥३॥तुका ह्मणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥तटावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा ॥२॥तुका ह्मणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥तुका ह्मणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥
व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥१॥ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥तुका ह्मणे विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥तुका ह्मणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईकोनी विश्वासलों ॥३॥
ब्रह्मयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥१॥तेणें आत्मा नव्हता नेला ब्रह्मांडासी । काय ब्रह्मयासी नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥२॥तुका ह्मणे विठोबा मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देइप ॥३॥
देवीं आणि दैतीं सिंधू गुसिळला । भार पृथ्वीस जाला साहावेना ॥१॥जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती ह्मणोनियां ॥२॥तुका ह्मणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥३॥
हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥१॥इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी ह्मणती धांव ॥ध्रु.॥तइं पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले॥२॥तुका ह्मणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली पांडुरंगा॥३॥
प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य केलें ॥१॥राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भक्तराज ॥ध्रु.॥विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥२॥तुका ह्मणे तयां कारणें सगुण । भक्तांचें वचन सत्य केलें ॥३॥
नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥१॥खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥ध्रु.॥राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बिळयासी ॥२॥असों द्यावीं सामथ्यॉ ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देइप ॥३॥
वाटीभर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥१॥भोक्ता नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥२॥तुका ह्मणे ऐसे तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥३॥
अिग्नकुंडामध्यें घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥पितियासी ह्मणे व्यापक श्रीहरि । नांदतो मुरारी सर्वां ठायीं ॥ध्रु.॥अिग्नरूपें माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥२॥तुका ह्मणे अिग्न जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥३॥
कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥येरू ह्मणे काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण ह्मणतां चि ॥२॥तुका ह्मणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकीं ॥३॥
डळमिळला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोई झाडी ॥१॥लोपे तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी॥२॥तुका ह्मणे भक्तांकारणें श्रीहरि । बहु दुराचारी निर्दाळिले ॥३॥
बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भक्तवत्सळु नाम तुझें ॥१॥मानियेला चित्तीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा बहु ॥२॥तुका ह्मणे भक्तजनाची ममता । तुह्मांसी अनंता अलोलिक ॥३॥
पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥१॥दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गाहाणें सांगावया ॥ध्रु.॥बिळचिये द्वारीं तुह्मी बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥२॥तुका ह्मणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भक्तावरी प्रेमच्छाया ॥३॥
बळी ह्मणे आजि दुर्वासया स्वामी । मागों नका तुह्मी नारायणा ॥१॥बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया ॥ध्रु.॥परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं उद्वेगला ॥२॥काय तूं एकाचा आहेसी अंकित । होइप कृपावंत तुका ह्मणे ॥३॥
त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बिळचें तुवां घर धरियेलें ॥१॥आह्मां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक ॥ध्रु.॥अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । िब्रदें तुझीं हरी जाती वांयां ॥२॥तुका ह्मणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥३॥
बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥१॥मागुता दुर्वास पुसे बिळराया । निरोप जावया देइप देवा ॥ध्रु.॥बळी ह्मणे त्यासी जाय मी न ह्मणें । जाईल नारायण लागला ची ॥२॥मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका ह्मणे पाय न सोडीं मी ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.