मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ३०९३–३१९३

Tukaram Gatha, part 31

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ३१ — अभंग ३०९३ ते ३१९३.

दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥१॥ठेविलें चरण बिळचिये द्वारीं । शीर अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥पाडियेलें द्वार द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥२॥तेथूनियां नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका ह्मणे ॥३॥
मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥१॥मारियेला मुरु ह्मणोनी मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥पूवाअहुनी ऐसा भिक्तप्रतिपाळ । केला त्वां सांभाळ नारायणा ॥२॥तुका ह्मणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥३॥
गुरुपादाग्रींचें जळ । त्यास मानी जो विटाळ ॥१॥संतीं वाळिला जो खळ । नरकीं पचे चिरकाळ ॥ध्रु.॥गुरुतीथाअ अनमान । यथासांग मद्यपान ॥२॥गुरुअंगुष्टा न चोखी । मुख घाली वेश्येमुखीं ॥३॥तुका ह्मणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥४॥
वाढविलें कां गा । तुह्मी एवढें पांडुरंगा ॥१॥काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥ब्रह्मसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥निमित्याचा धणी । तुका ह्मणे नेणे कोणी ॥३॥
साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं क्रीडतो राम ॥१॥शिवाचें निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोळिया घरीं पाहुणा राम॥३॥क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम दे राम ॥४॥राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका चरण वंदितो ॥५॥
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन। सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥तुका ह्मणे माझा विठ्ठल विसावा। नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥
न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥सुखा आणि दुःखा । ह्मणे वेगळा मी तुका ॥३॥
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद ह्मणियारा ॥२॥तुका ह्मणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥तुका ह्मणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥३॥
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥तुका ह्मणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥१॥येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥२॥न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भिक्तभाग्य संतसंगें ॥३॥नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥तुका ह्मणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥५॥
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत॥१॥त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥२॥मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥तुका ह्मणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥
देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥१॥कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥शरीरसंबंधाचें नातें । भोरडएा बुडविती सेतातें ॥३॥अझुनि तरी होइप जागा । तुका ह्मणे पुढें दगा॥४॥
मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । ह्मणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥अझुनि कां नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥तुका ह्मणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥
कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता जालें जिणें ॥ध्रु.॥पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठ जालासी तूं ॥३॥तुका ह्मणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥
तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली िब्रदावळी ॥१॥साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईन ॥२॥घेईन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥तुका ह्मणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥४॥
आह्मी तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥तुझें नाम कंठीं । आह्मां संसार आटी ॥२॥तुका ह्मणे काळ । करी आह्मांसी विटाळ॥३॥
लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥आह्मी नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥तुका ह्मणे देवा । रोकडी हे मोडे सेवा॥३॥
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय॥१॥परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥तुका ह्मणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥तुका ह्मणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥
सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥घातला तो आशा। मोहोजाळें गळां फासा ॥२॥सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥तुका ह्मणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥
तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥अवघें हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रह्मांड॥४॥तुका ह्मणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥५॥
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥खोलीं पडे ओली बीज। तरीं च हाता लागे निज ॥२॥तुका ह्मणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥अहंकार आड । आह्मां जगासी हा नाड ॥ध्रु.॥येथें भुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥तुका ह्मणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती॥३॥
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आह्मां तारूं ॥ध्रु.॥रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥सारितील कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥तुका ह्मणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥
नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आह्मांपुढें ॥ध्रु.॥निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥२॥तुका ह्मणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम॥३॥
न करि त्याचें गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥१॥भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥याचे सोई पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥२॥तुका ह्मणे खरें खोटें । न ह्मणे मोटें लहान ॥३॥
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥भ्रमणांच्या मोडीं वाटा। न भरें फाटा आडरानें ॥२॥तुका ह्मणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥
पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें॥१॥आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥३॥किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥तुका ह्मणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥
देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥बरवें जालें बरवें जालें । चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥तुका ह्मणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥३॥
बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी॥१॥सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥तुका ह्मणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥३॥
आह्मां सोइरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन ॥१॥ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥भुके तान्हे चित्तीं। सदा देव आठविती ॥२॥तुका ह्मणे धन । ज्याचें वित्त नारायण ॥३॥
ह्मणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा॥ध्रु.॥आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥तुका ह्मणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुह्मां ठावा ॥३॥
जळालें तें बाहए सोंग । अंतर व्यंग पडिलिया॥१॥कारण तें अंतरलें । वाइट भलें ह्मणवितां ॥ध्रु.॥तांतडीनें नासी । तांतडीनें च संतोषी ॥२॥तुका ह्मणे धीर । नाहीं बुद्धि एक िस्थर॥३॥
चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥ब्रह्मांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥तुका ह्मणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न सुटतां॥३॥
दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥तुका ह्मणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा॥३॥
धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे॥ध्रु.॥आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥२॥तुका ह्मणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥३॥
भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥तुका ह्मणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥१॥जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं ठाव मागईन ॥३॥तुका ह्मणे रज होईन चरणींचा । ह्मणविती त्यांचा हरिचे दास ॥४॥
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥तुका ह्मणे भावभिक्त हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥
देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥तुका ह्मणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥
माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥१॥भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा॥२॥तुका ह्मणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं ह्मुण ॥३॥
एकविध आह्मी न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥ह्मणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥२॥तुका ह्मणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥
राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥देईन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥तुका ह्मणे देवा । साटी करोनियां जीवा॥३॥
तैसे नहों आह्मी विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला किळकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥तुका ह्मणे आह्मां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाइप विळवतें॥१॥काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥अहंकारास उरलें काई । पांचांठायीं हें वांटे ॥२॥तुका ह्मणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसान ॥ध्रु.॥अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥तुका ह्मणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ति मागें ॥३॥
आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥तुका ह्मणे तुह्मीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥तुका ह्मणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥३॥
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अिग्न टणत्कारी दिसों येतो ॥१॥सांगावें तें काई सांगावें तें काई । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥तुका ह्मणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥१॥काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ठेविलिये ठायीं । चित्त ठेवुनि असें पायीं ॥२॥करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा॥३॥न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥तुका ह्मणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥५॥
जाणतों समये । परि मत कामा नये ॥१॥तुह्मी सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥२॥तुका ह्मणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥वचना या चित्त द्यावें । असो ठावें पायांसी ॥२॥तुका ह्मणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥
दोहीं बाहीं आह्मां वास । असों कास घालूनि ॥१॥बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥तुका ह्मणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी ह्मुण ॥२॥तुका ह्मणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर ह्मणवूनि ॥३॥
बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली॥४॥तुका ह्मणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥
तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥तुका ह्मणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥काय देवा नेणों आलें गांढेपण । तुह्मी शिक्तहीन जाले दिसां ॥ध्रु.॥विष्णुदास आह्मी निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥तुका ह्मणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥
खेळतां न भ्यावें समर्थाच्या बाळें । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी ह्मणऊनि ॥२॥तुका ह्मणे माझें ऐसें आहे देवा । ह्मणऊनि सेवा समर्पिली ॥३॥
निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥तुका ह्मणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥३॥
नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥चिंतनांचें मूळ चित्त । नेलें वित्त हरूनि ॥२॥तुका ह्मणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥
जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे॥१॥पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥तुका ह्मणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥
सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥तुका ह्मणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥
नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥नामरूपें रंगा आलीं। ते चि चाली स्वभावें ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगे । अंग संगें कविळलें॥३॥
खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥१॥माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान॥ध्रु.॥प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥तुका ह्मणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥तुका ह्मणे मुळें । खंड जाला एका वेळें॥३॥
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न घडतां ॥१॥कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥तुका ह्मणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥
आतां तुह्मी कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥गोमटें तें करा माझें । भार ओझें तुह्मांसी ॥ध्रु.॥वंचिलें तें पायांपाशीं। नाहीं यासी वेगळें ॥२॥तुका ह्मणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥३॥
सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल ह्मणे निर्लज्ज ॥ध्रु.॥अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥तुका ह्मणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥
धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥१॥आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥घेईन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥तुका ह्मणे लाड । विठोबा पुरवील कोड॥३॥
बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥येथें सावकासें घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥२॥बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥३॥बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥तुका ह्मणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥काळिमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥२॥तुका ह्मणे गुण । दरुषणें अपशकुन॥३॥
पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रह्म आणिलें ॥१॥पांडुरंग बाळमूर्ति । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । ह्मणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती॥२॥पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि-। निषेधाची वसति ॥३॥पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥४॥महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका ह्मणे तेथींचे॥५॥
देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥तुका ह्मणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥
त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंिद्रयें सकळें काया मन ॥ध्रु.॥सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥तुका ह्मणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥
दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥तुका ह्मणे धीरें । देवें नुपेक्षिलें खरें ॥३॥
न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥तुका ह्मणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥तुका ह्मणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥
विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥तंव जाला साहए हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥तुका ह्मणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धि तो ॥१॥विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥भुलल्यांचें अंग आपण्या पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥तुका ह्मणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥
केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥पडिलें पालवीं। त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥तुका ह्मणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौन्य चि॥१॥नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥तुका ह्मणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥
चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥तुका ह्मणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी॥३॥
करितां तडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥ध्रु.॥भुके इच्छी अन्न। तें ही त्यासाटीं निर्माण ॥२॥तुका ह्मणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥
निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥तुका ह्मणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥
तीर्थाचिये आस । पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥ह्मणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥तुका ह्मणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥
क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमाथाअ ॥२॥तुका ह्मणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥
कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढएा लाभें तुटी जाल्या तरे ॥१॥सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥तुका ह्मणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव कार्या येतो ॥३॥
असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥आह्मीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥तुका ह्मणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥करवितो आत्महत्या। नेदी सत्या आतळों ॥२॥तुका ह्मणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि॥३॥
इिच्छलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥भाग्याविण कैचें फळ ।अंतर मळमूत्राचें ॥२॥तुका ह्मणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥
काशासाठीं आह्मी जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥कैसें नेणों तुह्मां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥तुका ह्मणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाटीं ॥३॥
नाहीं तुह्मां कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥१॥एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥२॥तुका ह्मणे तुह्मां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥
जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥१॥धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥२॥तुका ह्मणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥३॥
दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा॥१॥नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥तुका ह्मणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥
आह्मी पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥राखावा तो ठाव। मिरासी करोनि उपाव ॥२॥वादें मारी हाका । देवा आइकवी तुका ॥३॥
पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥तुका ह्मणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥
भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥करितां सरोबरी। कांहीं न ठेवावी उरी ॥२॥तुका ह्मणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे॥३॥
जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥पतितपावन िब्रद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें जालें देवा ॥४॥हा ना तोसा ठाव जाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका ह्मणे ॥६॥
प्रेमभेटी आिंळगण । मग चरण वंदावे ॥१॥ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥न संगतां सीण भाग। पांडुरंग जाणतसे ॥२॥तुका ह्मणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
ठायीं
— ठिकाणी
तुज
— तुला
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
तैसें
— तसे
घडे
— घडते, शक्य होते
काई
— काय
वरी
— वर; शिवाय
कीर
— खरोखर, खरे तर
येर
— दुसरा, इतर
वैराग्य
— आसक्ती सुटणे
आघवें
— सगळे, संपूर्ण
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
देखोनि
— पाहून
पुढती
— पुन्हा, पुढे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा