वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥तुका ह्मणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥
कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें ॥१॥भिक्तप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रह्मानंदें ॥२॥तुका ह्मणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळावरी वसे ॥३॥
आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन॥१॥अवघियां केली काळें तडातोडी । अवश्वरु घडी पुरों नये ॥ध्रु.॥वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला॥२॥आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥काम तरी क्रोध बुद्धि मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥तुका ह्मणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥भवव्याधि येणें तुटेल रोकडी । करूनियां झाडी निश्चयेसी ॥ध्रु.॥आणिकां उपायां अनुपान कठिण । भाग्यें बरें सीण शीघ्रवत ॥२॥तुका ह्मणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥
जपाचें निमित्त झोपेचा पसरु । देहाचा विसरू पाडूनियां॥१॥ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥तुका ह्मणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आह्मी ॥३॥
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥तुका ह्मणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका ह्मणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥
कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥२॥तुका ह्मणे मोल । न लगें द्यावें वेचावे बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥
तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥कासया मोकळ। भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥तुका ह्मणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें॥३॥
हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥तुका ह्मणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥
भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥१॥क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥२॥तुका ह्मणे जाणे धने । धरी तें वर्म चिंतन ॥३॥
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥काया कुरवंडी। करुन ओंवाळून सांडी ॥२॥तुका ह्मणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥
भेद तुटलियावरी । आह्मी तुमचीं च हो हरी ॥१॥आतां पाळावे पाळावे । आह्मां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥तुका ह्मणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥ध्रु.॥हें चि एक जाणें। काया वाचा आणि मनें ॥२॥नीच जनालोकां । तिळले पायेरीस तुका ॥३॥
विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥पुरली वासना । येणें होईल नारायणा ॥२॥तुका ह्मणे जो देहाडा । तो चि वर्णीन पवाडा ॥३॥
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥तुका ह्मणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥३॥
बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥भक्षी त्याचा जीवमाग। आले भाग तो बरा ॥२॥तुका ह्मणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां॥३॥
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥सांभाळावें वर्म। उचिताच्या काळें धर्म ॥२॥तुका ह्मणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥२॥अळसाची धाडी ॥ तुका ह्मणे बहु नाडी॥३॥
शक्ती द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥१॥मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥तुका ह्मणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥३॥
कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥२॥तुका ह्मणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥हरिभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग किळकाळाचा ॥ध्रु.॥कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥तुका ह्मणे सुख समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाईल तो ॥३॥
विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥१॥लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥तुका ह्मणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कइप पक्षी पांडुरंग ॥३॥
वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥२॥तुका ह्मणे बरें धाकटएाचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥३॥
कइप ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥काय ऐसा पात्र होईन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥२॥तुका ह्मणे धन्य मानीन संचित । घेईन तें नित्य प्रेमसुख ॥३॥
नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥आळीकरें आह्मी एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥तुका ह्मणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥
देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥२॥तुका ह्मणे इच्छे पावविले कष्ट । ह्मणऊनि नष्ट दुरावली ॥३॥
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥तुका ह्मणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥
काय करूं सांगतां ही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥१॥मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥तुका ह्मणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥३॥
अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्त्तभूतां आवश्यक ॥१॥आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥खयाचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥तुका ह्मणे चाडे करा वेवसाव । आह्मांसी तो वाव धीर आहे ॥३॥
अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥२॥तुका ह्मणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥३॥
काय मज एवढा भार । हे वेव्हार चाळवाया ॥१॥उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥२॥तुका ह्मणे सेवट झाल । देव या बोला भोगिता ॥३॥
न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥१॥तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥२॥जरी तुह्मी नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥३॥
विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥१॥विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाहएा ॥२॥विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्त्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥३॥विठ्ठला रे तुकयाबंधु ह्मणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥४॥
एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥घ्यावें द्यावें आह्मीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥२॥तुका ह्मणे आह्मां विश्वासाच्या बळें। ठेविलें मोकळें देवें येथें ॥३॥
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥तुका ह्मणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे॥३॥
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥तुका ह्मणे जे जे जाती । तैसी िस्थति येतसे ॥३॥
कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥१॥बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥घटापटा ढवळी मन। होय सीण न करूं तें ॥२॥तुका ह्मणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥३॥
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि॥१॥आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें॥२॥तुका ह्मणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥३॥
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥तूं वो माझी सखी होसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥काया वाचा मनें हें चि काम करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥तुका ह्मणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रह्मरस भोजन हें ॥३॥
हें आह्मां सकळा । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा हेवा॥३॥
आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावीं भेटी पायांशी ॥१॥यासी तुह्मी कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ।ध्रु.॥तळमळ करी चित्त । अखंडित वियोगें ॥२॥तुका ह्मणे पंढरिनाथा । जाणें वेथा अंतरिंची ॥३॥
बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥तुका ह्मणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥१॥सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा उरो मागुतालीं ॥२॥तुका ह्मणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥
डौरलों भिक्तसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥ब्रह्मादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी॥४॥तुका ह्मणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥
फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥घ्यावें धणीवरी । तुका ह्मणे लाहान थोरीं ॥३॥
आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें॥१॥काय सांगों जालें कांहऴिचयाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
ह्मणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आह्मास ॥ध्रु.॥वाढली ते तळमळ चिंता । शम आतां करावी ॥२॥तुका ह्मणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥३॥
कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरि ॥२॥तुका ह्मणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥३॥
हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥१॥तेथें माझ्या मना होइप पिक्षराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥मुळऴिचया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥२॥तुका ह्मणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥देव आह्मा प्राणसखा । जालें दुःखा खंडण ॥ध्रु. ॥जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥तुका ह्मणे निजठेवा । होईल हेवा लाधलों ॥३॥
जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥१॥कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥समर्पिला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥तुका ह्मणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥३॥
पात्र शुद्ध चित्त गोही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥तुका ह्मणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥
प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥देखोवेखीं वदे वाणी। पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥तुका ह्मणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥
मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥उदासीन वृत्ति देहीं। चाड नाहीं पाळणें ॥२॥तुका ह्मणे नाहीं भय । सम सोय विषमाची॥३॥
आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका॥१॥आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥२॥तुका ह्मणे चिंतन बरें । आहे खरें खयापें ॥३॥
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ध्रु.॥आह्मी तरी जड जीव। कैंचा भाव पुरता ॥२॥अनन्यभावें घ्यावी सेवा । आह्मां देवा घडेसी ॥३॥तुह्मीं आह्मी शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥४॥तुका ह्मणे भाकुं कींव । असों जीव जड आह्मी ॥५॥
सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥पाळी तोंडऴिचया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥२॥तुका ह्मणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥३॥
इिच्छती तयांसी व्हावें जी अरूप । आह्मांसी स्वरूपिस्थती चाड ॥१॥आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥लेंकरासी कोठें जाणत्याची परी। करूं येते दुरी धरावया ॥२॥लागली न सुटे नामाची आवडी। माझी भावजोडी भंगूं नका ॥३॥घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें। चाळवीं जा पिसे ब्रह्मज्ञानी ॥४॥तुका ह्मणे माझा कोठें भिक्तरस। पाडावया ओस चाळविसी ॥५॥
आह्मां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥जाणें माउली त्या खुणा। क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना ॥लावीं अवो कृपाळे॥ध्रु.॥तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्ते । उपासने परतें। नये कांहीं आवडों ॥२॥करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम उच्चारणा। तुका ह्मणे जना । जल स्थल देखतां ॥३॥
ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥प्रारब्धीं संसार । बरी हिमतीची थार ॥ध्रु.॥होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥२॥तुका ह्मणे देवें । कृपा केलिया बरवें ॥३॥
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस जालेती ॥१॥माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥कांहीं न मागतां भलें । होईल तें चि काम केलें । नसावें आथिलें। कांहीं एका संकल्पें ॥२॥तुका ह्मणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥
बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥१॥एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥तुका ह्मणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
या रे हरिदासानो जिंकों किळकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥ध्रु.॥येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥वांकडएा माना बोल बोलावे आर्ष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥तुका ह्मणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक॥५॥
अवघा च अन्यायी । तेथें एकल्याचें काई ॥१॥आतां अवघें एकवेळें । जळोनि सरो तें निराळें ॥ध्रु.॥काय माझें खरें । एवढें च राखों बरें ॥२॥तुका ह्मणे आतां । परिहार न लगे चित्ता ॥३॥
काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥
स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥१॥नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥जीव ज्याचें दान। त्याचा खंडूनियां मान ॥२॥तुका ह्मणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥३॥
अवो कृपावंता । होइप बुद्धीचा ये दाता ॥१॥जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥वदवीं हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥तुका ह्मणे देवा । माझे अंतर वसवा ॥३॥
नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥तुका ह्मणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥तुका ह्मणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥
आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती ॥१॥पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥तुका ह्मणे मानोन घ्यावें । वाटे खावें वाटतें ॥३॥३२६७. काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥तुका ह्मणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी॥३॥
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥ह्मणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥तुका ह्मणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥तुका ह्मणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥
भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥२॥तुका ह्मणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥
जा रे तुह्मी पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥तुका ह्मणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड॥३॥
गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळा ॥ध्रु.॥लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥२॥तुका ह्मणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥
अनुसरे तो अमर जाला । अंतरला संसारा ॥१॥न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥विसंभेना माता बाळा। तैसा लळा पाळावा ॥२॥त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रिक्षता तो जाला ॥३॥
आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥काळाचें खंडण घडावें चिंतन । धनमानजनविन्मुख तो ॥२॥कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं॥३॥सावध तों माझीं इंिद्रयें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥तुका ह्मणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐकता सकळांसी ॥५॥
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंिद्रयांची ॥१॥हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥तुका ह्मणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥३॥
बोलोनियां काय दावूं । तुह्मी जीऊ जगाचे ॥१॥हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥तुका ह्मणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥
निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी॥१॥वोंगळानें घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥मेळऊनि सवें जन । चिंता नेणे देवळीं च ॥२॥तुका ह्मणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥३॥
मायबाप सवें नये धनवित्त । करावें संचित भोगावें तें ॥१॥ह्मणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥२॥तुका ह्मणे काळें लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥३॥
मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विकया घातलें केण।ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान ।खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन ।खरें वित्त तेथें आले चोजवीत । गिहाइक संतजन ॥१॥झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक ।याल तरि तुह्मी करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन ।बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण ।लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण ।अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥२॥एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें ।येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें ।लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें ।तुका ह्मणे आतां पाहूं नये वास। साधावें आपुलें पेणें ॥३॥
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा ह्मणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातपायटाळीं । जें मोकळी आहेती ॥२॥कां रे घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें। तुका ह्मणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥३॥
यत्न आतां तुह्मी करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥विश्वास तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥तुका ह्मणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥
अनाथां जीवन । आह्मां तुमचे चरण । करूनि सांटवण। धरीयेले हृदयीं ॥१॥पुष्ट जाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥करुणाउत्तरीं। करून आळवण हरी । जाऊं नेदूं दुरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥२॥मोहो माते करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका ह्मणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥३॥
सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा ॥ गोडावली वाचा येणें रसें ॥२॥तुका ह्मणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥
आह्मां कांहीं आह्मां कांहीं । आतां नाहीं या बोलें॥१॥मोल सांगा मोल सांगा । घेणें तिंहीं गा पुसावें ॥ध्रु.॥कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥२॥मुदलें साटी मुदलें साटी । लाभ पोटीं त्या च मधीं ॥३॥तुका ह्मणे साटवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥४॥
घ्या रे भाई प्या रे भाई । कोणी कांहीं थोडें बहु॥१॥ये च हाटीं ये च हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥वेच आहे वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥२॥उघडें दुकान उघडें दुकान । रात्री जाली कोण सोडी मग ॥३॥तुका ह्मणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनि ॥४॥
मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली॥१॥हातीं धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा ह्मणऊनि ॥ध्रु.॥सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥३॥उष्ण तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय ह्मणिजे ॥४॥खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे। अन्याय हि मोटे साच केले ॥५॥हातींचें हिरोनि घातला पाठीसी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥६॥३२८७ जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥लेकरांच्या स्नेहें गोड । करी कोड त्या गुणें ॥ध्रु.॥मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करीतें ॥२॥तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
गुणांचे आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरु इतरांचा ॥१॥आदिमध्यअंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें ॥ध्रु.॥रामकृष्णनाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥तुका ह्मणे तनु जालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रह्मानंदें ॥३॥
देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥१॥आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥देवें नेली चिंता । जाला सकळ करिता ॥२॥तुका ह्मणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥
पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥तुका ह्मणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥
जालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक ही देवा न लगे दुजें ॥१॥प्रारब्धा अंगीं अन्न आच्छादन । िस्थर करोनि मन ठेवीं पायीं ॥ध्रु.॥ये गा ये गा ये गा कृपाळुवा हरी । निववीं अभ्यंतरीं देउनि भेटी ॥२॥आसावलें मन जीवनाचे ओढी । नामरूपें गोडी लावियेली ॥३॥काय तुह्मांपाशीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥काय लोखंडाचे पाहे गुण दोष । सिवोनि परिस सोनें करी ॥५॥तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें। आपुलें करावें ब्रीद साच ॥६॥
येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें ॥१॥गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिली ॥२॥तुका ह्मणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥
शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥तुका ह्मणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥
वाचेचिया आळा कविळलें ब्रह्म । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥तुका ह्मणे वाटे चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥३॥
सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥आतां हेवा करावा सोस । भिक्तरस बहु गोड ॥ध्रु.॥पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥तुका ह्मणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥३॥
तुह्मी संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥अवतार तुह्मां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥वाढविलें सुख भिक्त भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥तुका ह्मणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुह्मी जगीं संतजन ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.