पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तइप छो ह्मणा ॥ध्रु.॥पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥तुका ह्मणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥
सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां॥१॥तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥तुका ह्मणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥
सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥१॥दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥केली याची फाडाफाडी। तडामोडी क्षेत्राची ॥२॥पातेजत नाहीं लोकां । तुका देवावांचूनि॥३॥
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥तुका ह्मणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥
सिळें खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी॥१॥कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥आपुलिये ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥२॥तुका ह्मणे मी जुनाट । मोहो आट परतला ॥३॥
लागलें भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें ॥१॥जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥तुका ह्मणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥
धनें वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥तुका ह्मणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त॥३॥
बोलावें तें आतां आह्मी अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळो ॥२॥तुका ह्मणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥३॥
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥तुका ह्मणे फांसे वाघुरा कुहाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥३॥
नव्हों वैद्य आह्मी अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥कुपथ्य करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥२॥तुका ह्मणे लांसू फांसंू देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥३॥
नव्हें परि ह्मणवीं दास । कांहीं निमित्तास मूळ केलें॥१॥तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचारा ॥धृ. ॥नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । ऐसें कां गा नेणां हें ॥३॥
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥तुह्मी आह्मां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥२॥तुका ह्मणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥३॥
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥तुका ह्मणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥३॥
असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥१॥परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥तुका ह्मणे वेथा । तुह्मा कळे पंढरिनाथा ॥३॥
वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥१॥काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥तुका ह्मणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥३॥
जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥१॥वाढवावें हें उत्तर । कांहीं लाज करकर ॥ध्रु.॥कोठें वांयां गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥तुका ह्मणे बाळा । असतात िप्रय खेळा॥३॥
वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥१॥काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥पोटा आलें बाळ। त्याचें जाणावें सकळ ॥२॥चुका ह्मणे हरी । वाहावें जी कडियेवरी॥३॥
सेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥ऐसे करा कृपादान । तुह्मां मन सन्निध ॥ध्रु.॥भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥२॥तुका ह्मणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥३॥
करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥तेथे सरे शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥२॥तुका ह्मणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥३॥
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥१॥काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥पडें तेथें तुझ्या पायां। करीं वायां न वजतें ॥२॥तुका ह्मणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥३॥
जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावें यावरी ॥१॥माझ्या अवघ्या भांडवला । तूं एकला जालासी ॥ध्रु.॥आतां दुजें धरा झणी । पायांहूनि वेगळें ॥२॥तुका ह्मणे आतां देवा । नका गोवा यावरी ॥३॥
स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥१॥ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ध्रु.॥धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्तावेगळें ॥२॥तुका ह्मणे नाश नाहीं । पुराणें ही गर्जती ॥३॥
आधी नाहीं कळों आला हा उपाय । नाहीं तरी काय चुकी होती ॥१॥घालितो पायांसी मिठी एकसरें । नेदीं तो दुसरें आड येऊं ॥ध्रु.॥कासया पडतों लटिक्याचे भरी । नव्हता का शिरीं भार घेतों ॥२॥तुका ह्मणे कां हे घेतों गर्भवास । कां या होतों दास कुटुंबाचा ॥३॥
आतां बरें जालें । माझें मज कळो आलें ॥१॥खोटा ऐसा संवसार । मज पायीं द्यावी थार ॥ध्रु.॥उघडले डोळे । भोग देताकाळीं कळे ॥तुका ह्मणे जीवा । होतां तडातोडी देवा ॥३॥
बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥सर्व सिद्धि पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥संतसमागमें अळंकार वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजा ॥२॥तुका ह्मणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥३॥
परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग॥२॥तुका ह्मणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें॥३॥
ज्याचे माथां जो जो भार । ते चि फार तयासी ॥१॥मागें पुढें अवघें रितें । कळों येतें अनुभवें ॥ध्रु.॥परिसा अंगीं अमुपसोनें । पोटीं हीन धातु चि ॥२॥आपुला तो करि धर्म । जाणे वर्म तुका तें ॥३॥
पाहें तिकडे दिशा ओस । अवघी पास पायांपें ॥१॥मन चि साच होइल कइप । प्रेम देइप भेटोनि ॥ध्रु.॥सर्वापरि पांगुळ असें । न कळे कैंसे तें तुह्मा ॥२॥तुका ह्मणे कृपावंता । तूं तों दाता दीनाचा ॥३॥
चालवणें काय । ऐसें अंगे माझे माय ॥१॥धांव धांव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥२॥देसील विसांवा । तुका ह्मणे ऐशा हांवा॥३॥
आवडीच्या ऐसें जालें । मुखा आलें हरिनाम ॥१॥आतां घेऊं धणीवरि । मागें उरी नुरेतों ॥ध्रु.॥सांटवण मनाऐसी । पुढें रासी अमुप ॥२॥तुका ह्मणे कारण जालें । विठ्ठल तीं अक्षरीं॥३॥
त्यांचिया चरणां माझें दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥१॥येथें माझा जीव पावला विसांवा । ह्मणऊनि हांवा भरलासें ॥ध्रु.॥चरणींचें रज लावीन कपाळा । जीं पदें राउळा सोई जाती ॥२॥आणिक तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥३॥वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं सत्यभावें ॥३॥तुका ह्मणे सखे हरिचे ते दास । आतां पुढें आस नाहीं दुजें ॥५॥
उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥१॥नाहीं आवडीसी पार । न ह्मणावें जालें फार ॥ध्रु.॥अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥तुका ह्मणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें॥३॥
सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥१॥सांभाळीं आपुली हाक देतो माया । आह्मांसी कां भयाभीत केलें ॥ध्रु.॥रूप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम। लटका चि श्रम वाढविला ॥२॥तुका ह्मणे कां गा जालासी चतुर । होतासी निसुर निर्विकार ॥३॥
अमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आह्मां ॥ध्रु.॥कोठें मूर्त्तिमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥तुका ह्मणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥
नो बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥१॥कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥संसारा हातीं सोडवूनि गळा । हें कां अवकळा येती पुढें ॥२॥तुका ह्मणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥३॥
आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥१॥मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येइल ठाया ॥ध्रु.॥वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुद्धि मज ॥२॥तुका ह्मणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥३॥
मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥अपराध माझे न मनावे मनीं । तुह्मी संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥आरुष वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥तुका ह्मणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठता उपेजना ॥३॥
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥दावी वैकुंठींच्या वाटा । पाहातां मोठा संपन्न। अभिमान तो नाहीं अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥तुका ह्मणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । आलें द्यावें भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ॥३॥
सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचे । त्यांसी कैचा संसार ॥१॥दोष पळाले दोष पळाले। पैल आले हरिदास ॥ध्रु.॥प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥२॥तुका ह्मणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा । दुर्बळा या शिक्तहीना । त्या ही जना पुरता ॥३॥
ऐसीं ठावीं वर्में । तरी सांडवलों भ्रमें ॥१॥सुखें नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ध्रु.॥ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥सुखे येथें जालें तरी । नाहीं आणिकांची उरी ॥३॥ऐसें केलें देवें । पुढें कांहीं चि न व्हावें ॥४॥तुका ह्मणे मन । आतां जालें समाधान ॥५॥
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥२॥तुकयाबंधु ह्मणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥३॥
व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंत ॥१॥ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥३॥
तुह्मांआह्मांसी दरुषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥ह्मणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ध्रु.॥भविष्याचें माथां देह । कोण जाणें होइल काय ॥२॥ह्मणे तुकयाचा बंधव । आमचा तो जाला भाव ॥३॥
अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पवे ह्मणे देह ॥१॥ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥ध्रु.॥उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीथॉ होती ॥२॥तुका ह्मणे तुकयाबंधु आणीक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥३॥
आह्मांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥तुका ह्मणे कर्मधर्में नये हातां । तयावरि सत्ता भाविकांची ॥३॥
प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥२॥बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥३॥
आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥१॥बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥तळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥२॥तुका ह्मणे बरवें जालें । फावलें हें कळे त्या ॥३॥
केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥१॥माझी बुद्धि िस्थर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥२॥तुका ह्मणे जोडी । आदीं अंतीं राहो गोडी॥३॥
माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥ध्रु.॥बाळक धांवोनि आड निघे स्तनीं ॥ घालावा जननी कृपे पान्हां ॥२॥तुका ह्मणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥३॥
वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा॥ध्रु.॥विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवें नव्हे नास ॥२॥तुका ह्मणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥
अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥१॥तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । हित तें चि वेगें करूनि घेइप ॥ध्रु.॥बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥२॥पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥३॥कनक झाड ह्म वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥४॥तुका ह्मणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नास तो चि पावे ॥५॥
मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥३॥तुका ह्मणे देखोनियां काई । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥४॥
मतिविण काय वणूप तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥२॥रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥तुका ह्मणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥४॥
ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥२॥एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥३॥तुका ह्मणे वाट दावूनि सद्गु । राहि हा दुरू पांडुरंग ॥४॥
उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेलें ।नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें॥१॥काय बडिवार सांगसी वांयां । ठावा पंढरिराया आहेसि आह्मां ।एकला चि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ध्रु.॥कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला वाणीं ।पडिला भूमी परी नयेची करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥२॥िश्रयाळ बापुडे सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर ।ऐसा कठिण कोण होईल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥३॥सिभ्री चक्रवर्ती करितां यज्ञयाग । त्याचें चिरिलें अंग ठायीं ठायीं ।जाचऊनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥४॥बळीचा अन्याय सांग होता काय। बुडविला तो पाय देऊनि माथां ।कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्त कथा ॥५॥हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व। विकविला जीव डोंबाघरीं ।पाडिला विघड नळा दमयंतीमधीं। ऐसी तुझी बुद्धि हरि ॥६॥आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपित्त माउसीच्या ।वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । ह्मणे बंधु तुकयाचा ॥७॥
जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥आभास ही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥२॥आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥तुका ह्मणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥
समश्रुळित असतां वाचा । घोष न करिसी कां नामाचा ॥१॥कां रे वैष्णव नव्हेसी । कवण्या दंभें नागवलासी॥ध्रु.॥हरि हरि ह्मणतां लाजसी । गर्वें फुगोनि चालसी ॥२॥तारुण्यें उताणा । पुंसेंविण बांडा सुना ॥३॥जालेंसि महिमेचे वेडें । नाचों लाजसी दिंडीपुढें ॥४॥अळंकारांच्यानि बळें । वंचलासी तुळसीमाळें॥५॥कैसा सकुमार जालासी । ह्मणसी न टकें एकादशी॥६॥स्नान न करिसी आंघोळी । विभुती न लाविसी कपाळीं ॥७॥वरिवरि न्याहाळिसी त्वचा । उपेग नाहीं मांसाचा॥८॥पद्मनाभी विश्वनाथ । तुका अझून रडत ॥९॥
वाघाचा काळभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥तुका ह्मणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥१॥फुकासाटीं भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥तुका ह्मणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥
तेणें सुखें माझें निवालें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची समूळ गेली ॥२॥तुका ह्मणे सुख जालें माझ्या जीवा । रंगलें केशवा तुझ्या रंगे ॥३॥
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकिळकांसी ॥२॥संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥माझिये माहेरीं सुखा काय उणें। न लगे येणें जाणें तुका ह्मणे ॥४॥
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम जिव्हामुखें ॥१॥पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं मनीं ॥ध्रु.॥तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥तुका ह्मणे जीव ठेविला तुझ्या पायीं । आणीक तो काई देऊं कोणा ॥४॥
देवाचें भजन कां रे न करीसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥१॥देवासी शरण कां रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥ध्रु.॥देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा । पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥२॥कां रे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥४॥कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक नारायण ॥५॥तुका ह्मणे कां रे घातलें वांयां। अवघें आयुष्य जाया भिक्तविण ॥६॥
माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश। करीं वास हृदयीं ॥२॥पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता। तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥३॥
आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों घडी आवडे तें ॥२॥दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥तुका ह्मणे नाहीं मुक्तीसवें चाड । हें चि आह्मां गोड जन्म घेतां ॥४॥
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहऴिवरहित जो ॥१॥राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥नवल काई तरी पाचारितां पावे । न श्मरित धांवे भिक्तकाजें ॥२॥सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥तुका ह्मणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
यासी कोणी ह्मणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥१॥आड वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥तुका ह्मणे निंब दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा जाय ॥४॥
निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥न पाहिजे जाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा वेंग पडियाली ॥२॥तुका ह्मणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥३॥
न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥१॥माझ्या उपकारासाटीं । वागविला ह्मुण कंठीं ॥ध्रु.॥घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥तुका ह्मणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥३॥३३६६. नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥१॥आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥निवारिलें भय । नाहीं दुसयाची सोय ॥२॥तुका ह्मणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं॥३॥
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेंटाळिल्या गुणें धांव घेती ॥१॥काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥इंिद्रयांचे भार फिरतील चोर । खान घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥तुका ह्मणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥
काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं॥१॥जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें॥ध्रु.॥जरी मागों ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥३॥आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥४॥तुका ह्मणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥५॥
आह्मी ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥तो हा देवांचा ही देव । काय किळकाळाचा भेव ॥ध्रु.॥वेद जया गाती। श्रुति ह्मणती नेति नेति ॥२॥तुका ह्मणे निज । रूपडें हें तत्त्वबीज ॥३॥
भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात॥१॥तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥गर्भवास धरी। अंबॠषीचा कैवारी ॥२॥सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥तुका ह्मणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी॥४॥
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥तुका ह्मणे अवघें फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥३॥
लावुनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देउनियां मिठी । पळे महिमा थुलिया ॥१॥पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड । लावुनि चरफड । हात गोऊनि पळावें ॥ध्रु.॥आधीं काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडीं पडे माती । फिरतां मागें कैचा तो ॥२॥तुका ह्मणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखें तुह्मां नार्पिती ॥३॥
नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥भेटावें पंढरिराया। हें चि इिच्छताती बाहएा ॥२॥ह्मणतों जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥३॥चित्त ह्मणे पायीं तुझे राहीन निश्चयीं ॥४॥ह्मणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥५॥
मन उताविळ । जालें न राहे निश्चळ ॥१॥दे रे भेटी पंढरिराया । उभारोनि चारी बाहएा ॥ध्रु.॥सर्वांग तळमळी । हात पाय रोमावळी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे कान्हा । भूक लागली नयना॥३॥
ह्मणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥१॥होऊनियां सहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ध्रु.॥मृगजळाचिया परी। तैसें न करावें हरी ॥२॥तुकयाबंधु ह्मणे हरी । कामा नये बाहएात्कारी ॥३॥
आकारवंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥ह्मणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आह्मी ॥१॥नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥२॥धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥३॥अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥तुका ह्मणे आह्मी असोनिया जना । तुज देव पणा आणियेलें ॥५॥
सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥ह्मणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥तुका ह्मणे निवे तनु । रजकणु लागती ॥३॥
देऊं कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥काय होईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥२॥तुका ह्मणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥आणिकांची चाले सत्ता आह्मांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥तुका ह्मणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥३॥
माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळां अंतरीं नारायण ॥१॥न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आह्मी ॥२॥तुका ह्मणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला॥१॥कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥तुका ह्मणे कुटिती हाडें। आपुल्या नाडें रडती ॥३॥
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥अंक तो पडिला हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥तुका ह्मणे आह्मी जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुह्मां अंगीं ॥३॥
आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
ब्रह्मज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं॥१॥रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर ह्मणोनियां ॥२॥। तुका ह्मणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥३॥
कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥ग्वाही बहुतांची घालूनियां वरि । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥तुह्मां वेगळा लागें आपल्या च ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥२॥भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥३॥ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज देवा ॥४॥तुका ह्मणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥५॥
देहबुद्धि वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥२॥पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥३॥तुका ह्मणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥४॥
निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥१॥तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥२॥तुका ह्मणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जविळकें ॥३॥
दुबळें सदैवा । ह्मणे नागवेल केव्हां ॥१॥आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥गांढें देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा ॥३॥आणिकांचा हेवा । न करीं शरण जाइप देवा ॥४॥तुका ह्मणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥५॥
माझी आतां लोक सुखें निंदा करू । ह्मणती विचारू सांडियेला ॥१॥कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥२॥तुका ह्मणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥३॥
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥भावें तुका ह्मणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौयाशीचा ॥४॥
भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥सुख दुःख तुज देईन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥तुझा दास ह्मणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥२॥कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा ह्मणवुनि ॥३॥तुका ह्मणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आह्मां तया ॥४॥
गातों नाचतों आनंदें । टाळघागरिया छंदें ॥१॥तुझी तुज पुढें देवा । नेणों भावे कैसी सेवा ॥ध्रु.॥नेणों ताळ घात मात । भलते सवां पाय हात ॥२॥लाज नाहीं शंका । प्रेम घाला ह्मणे तुका ॥३॥
रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥आह्मां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥२॥उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें॥३॥तुका ह्मणे करा होईल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥४॥
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावें नाम ॥ध्रु.॥येथें मिळतो दहीं भात । वैकुंठीं ते नाहीं मात ॥२॥तुका ह्मणे आतां । मज न लगे सायुज्यता ॥३॥
पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥जोडोनियां करकमळ । नेत्र जळ भरोनि ॥२॥तुका उभें दारीं पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥३॥
आतां हें सेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्प ॥१॥नुपेक्षावें आह्मां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुह्मीं ॥ध्रु.॥वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥२॥तुका ह्मणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.