तरि च होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥१॥काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥मृगजळा न्याहाळितां। तान न वजाये सेवितां ॥२॥न पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥३॥तुका ह्मणे हें लक्षण । संत अळंकार लेणें॥४॥
आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥१॥सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥२॥तुका ह्मणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥
न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईन तेथें दाटी वैष्णवांची ॥२॥अनु नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥३॥उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण ह्मणें नारायण ॥४॥आणिकांची सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका ह्मणे आणु दुजें नाहीं ॥५॥
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥उभा कटीं ठेवुनि कर। न ह्मणे पर बैससें ॥२॥तुका ह्मणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥३॥
बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता ॥२॥आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥तुका ह्मणे माझा विठ्ठल जनिता । जेथें आमची सत्ता तयावरी ॥३॥
काय करिती केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥विष्णुमूर्तिपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥२॥तुका ह्मणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥३॥
वेद नेलें शंखासुरें । केलें ब्रह्म्यानें गाहाणें ॥१॥धांव धांव झडकरी । ऐसें कृपाळुवा हरी ॥ध्रु.॥गजेंद्र नाडियें गांजिला ॥ तेणें तुझा धांवा केला ॥२॥ तुका ह्मणे पद्मनाभा । जेथें पाहें तेथें उभा ॥३॥
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥१॥एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥२॥तुका ह्मणे भार वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥३॥
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देइप ॥ध्रु.॥नेत्र उन्मिळत राहिले ताटस्त । गंगा अश्रुपात वहावली ॥२॥तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥
धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥१॥लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पा पसारा ॥ध्रु.॥खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥२॥तुका ह्मणे जिवें साटीं ॥ पडिली मिठी धुरेसी ॥३॥
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संग नव्हे तैसा ॥२॥तुका ह्मणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥२॥तुका ह्मणे रिघे । पुढें नाहीं जालें धींगे ॥३॥
ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥१॥साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥कां हीं वेचितील वाणी। निरर्थक चि कारणीं ॥२॥तुका ह्मणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥३॥
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥२॥चालिले अगळे । हळू च कान केश डोळे ॥३॥वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥४॥एकली तळमळ । जिव्हा भलते ठायीं लोळे ॥५॥तुका ह्मणे यांणीं। तुझी मांडिली घालणी ॥६॥
नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥१॥आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी॥३॥सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥४॥पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥५॥
माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥१॥सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥२॥तुका ह्मणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥३॥
करूं स्तुती तरि ते निंदा । तुह्मी जाणां हे गोविंदा॥१॥आह्मां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥ध्रु.॥बोबडएा उत्तरीं । तुह्मा रंजवितों हरी ॥२॥मागतों भातुकें । तुका ह्मणे कवतुकें ॥३॥
नव्हतील जपें नव्हतील तपें । आह्मांसी हें सोपें गीतीं गातां ॥१॥न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरि ॥ध्रु.॥जयासी नाहीं रूप आणि आकार । तो चि कटी कर उभा विटे ॥२॥अनंत ब्रह्मांडें जयाचिया पोटीं । तो आह्मां संपुष्टीं भिक्तभावें ॥३॥तुका ह्मणे वर्म जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥४॥
आह्मी जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥१॥केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥हातां चढलें धन। नेणं रचिलें कारण ॥२॥तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥३॥
लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥१॥करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥फोडिलीं भांडारें। मोहोरलीं एकसरें ॥२॥अवघियां पुरतें । तुका ह्मणे घ्यावें हातें॥३॥
एकीं असे हेवा । एक अनावड जीवां ॥१॥देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥प्रीतिसाटीं भेद। कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥तुका ह्मणे कळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥२॥तुका ह्मणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥३॥
रुसलों संसारा । आह्मी आणीक व्यापारा ॥१॥ह्मणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥परते चि ना मागें । मोहो निष्ठ जालों अंगें ॥२॥सांपडला देव । तुका ह्मणे गेला भेव ॥३॥
हें तों वाटलें आश्चर्य । तुह्मां न धरवे धीर ॥१॥माझा फुटतसे प्राण । धांवा धांवा ह्मणऊन ॥ध्रु.॥काय नेणों दिशा। जाल्या तुह्मांविण ओशा ॥२॥तुका ह्मणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥१॥वर्षे अमृताच्या धारा । घेइप वोसंगा लेंकरा ॥ध्रु.॥उशीर तो आतां । न करावा हे चिंता ॥२॥तुका ह्मणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥३॥
जोडिले अंजुळ । असें दानउताविळ ॥१॥पाहा वाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥तूं धनी मी सेवक । आइक्य तें एका एक ॥२॥करितों विनंती । तुका सन्मुख पुढती॥३॥
काय तुज कैसें जाणवेल देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥१॥सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझा ॥ध्रु.॥कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥तुका ह्मणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥३॥
मी तव बैसलों धरुनियां ध्यास । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥२॥तुका ह्मणे येऊनियां देइप भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥३॥
आतां तुझें नाम गात असें गीतीं । ह्मणोनी मानिती लोक मज ॥१॥अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥सज्जन संबंधी तुटली उपाधी ।रोकडी या बंदीं सुटलोंसें ॥२॥घ्यावा द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥३॥तुका ह्मणे तुज कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥४॥
कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं जालों देवा ॥१॥आवरितां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥तुझिया विनोदें आह्मां प्राणसाटी । भयभीत पोटीं सदा दुःखी ॥२॥तुका ह्मणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥३॥
सन्मुख चि तुह्मीं सांगावी जी सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥निघों आह्मी कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥२॥तुका ह्मणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥
मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥१॥जीव झुरे तुजसाटीं । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥२॥तुका ह्मणे कृपावंत । माझी चिंता असावी॥३॥
कासया वांचूनि जालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥तुका ह्मणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥३॥
नको मज ताठा नको अभिमान । तुजवांचूनि क्षीण होतो जीव ॥१॥दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥२॥तुका ह्मणे तुझें जालिया दर्षण । मग निवारण होइल सर्व ॥३॥
चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरि माथा ॥१॥वेळोवेळां देइप क्षेमआलिंगन । वरी अवलोकन कृपादृष्टी॥ध्रु.॥प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त िस्थर करीं पांडुरंगा ॥२॥आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥३॥करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण वारी ॥४॥तुका ह्मणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥५॥
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥१॥देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा। लागों असत्याचा मळ नेदी ॥३॥देवाची ते खूण तोडी मायाजाळ। आणि हें सकळ जग हरी ॥४॥पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ। तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥५॥
अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुह्मां ॥१॥माझें कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य जालों ॥ध्रु.॥सर्वकाळ तुह्मी असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥तुका ह्मणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥१॥दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥२॥न धरावी शंका । नये बोलों ह्मणे तुका ॥३॥
भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हा चि ॥१॥कैसी तुझी वाट पाहों कोणा तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥२॥बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥३॥उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥४॥तुका ह्मणे करीं गोंवळें यासाटीं । आपल्या पालटीं संगें देवा ॥५॥
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा॥२॥तुका ह्मणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥३॥
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥होतीं धालीं पोटें। मागें उरलीं उिच्छष्टें ॥२॥तुका ह्मणे धांव । पुढें खुंटईल हांव ॥३॥
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥निजविल्या जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥एक वेवसाव । त्यांचा संग त्यांचा जीव ॥२॥हितें केलें हित । ग्वाही एक एकां चित्त ॥३॥विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥४॥तुका ह्मणे बरीं । घरा येतील त्यापरी ॥५॥
धोंडएासवें आदिळतां फुटे डोकें । तों तों त्याच्या सुखें घामेजेना ॥१॥इंगळासी सन्निधान अतित्याई । क्षेम देतां काई सुख वाटे ॥२॥तुका ह्मणे आह्मांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥३॥जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरीं ॥१॥प्रेम वाढे ग्रासोग्रासीं । ब्रह्मरसीं भोजन ॥ध्रु.॥तृप्तीवरि आवडी उरे। ऐसे बरे प्रकार ॥२॥तुका ह्मणे पाख मन । नारायण तें भोगी॥३॥
सरे आह्मांपाशीं एक शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥१॥कोण मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं जाली मनें ओळखी तों ॥२॥तुका ह्मणे आह्मां जाणीवेचें दुःख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥३॥सुख सुखा विरजण जालें । तें मथलें नवनीत ॥१॥हाले डोले हरुषे काया । निवती बाहएा नयन ॥ध्रु.॥प्रबल तो नारायण । गुणें गुण वाढला ॥२॥तुका ह्मणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥
आतां तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥१॥करील तें पाहें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥तो चि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥२॥तुका ह्मणे दासा । नुपेक्षील हा भरवसा॥३॥
लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥२॥तुका ह्मणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥
माझ्या इंिद्रयांसीं लागलें भांडण । ह्मणतील कान रसना धाली ॥१॥करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडिला थोर ॥ध्रु.॥गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥२॥दरुषणें फिटे सकळांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेइल तें ॥३॥तुका ह्मणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला सर्व तुझा ॥१॥सर्वकाळ सुख आमच्या मानसीं । राहिलें जयासी नास नाहीं ॥ध्रु.॥नेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥२॥न करीं आस मुक्तीचे सायास । भिक्तप्रेमरस सांडूनियां ॥३॥गर्भवासीं धाक नाहीं येतां जातां । हृदयीं राहतां नाम तुझें ॥४॥तुका ह्मणे जालों तुझा चि अंकिला । न भें मी विठ्ठला किळकाळासी ॥५॥
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष॥ध्रु.॥धन्य ते संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव टाकियेला ॥२॥प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषण होय त्याला ॥३॥पावटणिया पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥५॥तें दुर्लभ संसारासी । जडजीवउद्धारलोकासी ॥६॥तुका ह्मणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ॥७॥
काय दिवस गेले अवघे चि वहाडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥क्षण एके ठायीं मन िस्थर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥ध्रु.॥कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥२॥काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥३॥ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें॥४॥तुका ह्मणे हें चि बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥५॥
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥उदक भिन्न असे काई । वाहाळ बावी सरिता नई ॥२॥सूर्य तेजें निवडी काय। रश्मी रसा सकळा खाय ॥३॥वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाइप सारखें ॥४॥करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें॥५॥वर्त्ते एकविध अिग्न । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥तुका ह्मणे पात्र चाड । किंवा विसें अमृत गोड ॥७॥
न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । ह्मणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥तुका ह्मणे हित तों ह्मणा विठ्ठल । न ह्मणे तो भोगील कळेल तें ॥३॥
कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥पुण्य घेइप रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेइप शेवटीं ॥ध्रु.॥कथा विरस पाडी आळसें । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें। विटाळसें नावेसी ॥२॥सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहो ह्मणे हरि । विनंती करी तुका हे ॥३॥
कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसनें ॥१॥वाट पाहासी आठवाची । सत्ता सतंत कइपची ॥ध्रु.॥बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणीं चि लपा ॥२॥तुका ह्मणे तूं परदेशी । येथें आह्मां अंगेजिसी ॥३॥
आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥१॥तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥माझें केलें मज पारिखें माहेर । नटोनी साचार चाळविलें ॥२॥सुखासाटीं एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥३॥केला चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥४॥तुका ह्मणे आतां घेईन कांटीवरी । धनी म्यां कैवारी केला देव ॥५॥
आजिवरि होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी तों केली विटंबणा ॥१॥आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणों ॥२॥तुका ह्मणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥३॥
देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥मोडिलें या रांडे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥२॥तुका ह्मणे आणा राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥३॥
कां रे तुह्मी निर्मळ हरिगुण गा ना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जा ना ॥१॥काय गणिकेच्या याती अधिकार मोटा । दोषी अजामेळ ऐसीं नेलीं वैकुंठा ॥ध्रु.॥ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी पातकां नाहीं पार ॥२॥पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका ह्मणे त्याचें पुण्य॥३॥
बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥तुका ह्मणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥
नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुह्मां आळवाया जविळकें ॥१॥सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥नवनीतासाटीं खादला हा जीव । थोडएासाटीं कीव कोण करी ॥२॥तुका ह्मणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥३॥
सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥सेवटींच्या घासें गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर जाल्यावरी ॥२॥तुका ह्मणे आतां बहु चाळवावें । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥३॥
बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं ॥१॥कांहीं कोड कवतिकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥२॥तुका ह्मणे देवा । माझें चळण तुज सवा॥३॥
दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥माझीया मरणें । तुह्मी बैसविलें ठाणें ॥२॥तुका ह्मणे काइप । मी हें माझें येथें नाहीं॥३॥
एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाटीं ॥१॥घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥धांवे मागें मागें । जाय तिकडे चि लागे ॥२॥तुका ह्मणे नेलें । माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥३॥
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साटीं तें ॥१॥तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥मागलिया पेणें पावे । विसांवे तें ठाकणीं ॥२॥तुका ह्मणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥१॥उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें सांतवीजे ॥२॥तुका ह्मणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥
बहुजन्में सोस केला । त्याचा जाला परिणाम ॥१॥विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥२॥तुका ह्मणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥३॥
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥२॥तुका ह्मणे कृपावंता । माझी चिंता खंडावी॥३॥
तुह्मांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥कां बा तुह्मी ऐसें नेणें । निष्ठपणें टाळित असां ॥ध्रु.॥आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥तुका ह्मणे जगदीशा । काय असां निजेले ॥३॥
नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥१॥साहए जालीं घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥२॥तुका ह्मणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥३॥
जाला हा डांगोरा । मुखीं लहानाचे थोरा ॥१॥नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥संचिताचा ठेवा। आतां आला तैसा घ्यावा ॥२॥तुका ह्मणे देवें । ह्मणों केलें हें बरवें ॥३॥
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥२॥तुका ह्मणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥३॥
पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥बहुतांसी दिला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥तुका ह्मणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥३॥
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । ह्मणउनि धणी कृपा करी ॥१॥आह्मांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥करूनि सांभाळीं राहिला निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥तुका ह्मणे योग्यायोग्य विनीत । देवा नाहीं चित्त येथें देणें ॥३॥
आतां नव्हे गोड कांहीं करितां संसार । आणीक संचार जाला माजी ॥१॥ब्रह्मरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥२॥तुका ह्मणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरईल ॥३॥
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु.॥देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥२॥तुका ह्मणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥३॥
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥वेठीचें मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥तुका ह्मणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥३॥
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥तुका ह्मणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥३॥
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥षड उर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥२॥तुका ह्मणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥३॥
खोल ओले पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥लटिक्याचे आह्मी नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥तुका ह्मणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥३॥
गोमटएा बीजाचीं फळें ही गोमटीं । बाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥खयाचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥२॥तुका ह्मणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥३॥
मन जालें भाट । कीर्ति मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि॥२॥पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥
दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळभेद ॥१॥आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हे अंतर जालें होतें ॥२॥तुका ह्मणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाई ॥३।३४८७. कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥१॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ध्रु.॥ होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तो मी हा न्याहाळीं धरुनी दृष्टी ॥२॥ तुका ह्मणे तुज रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ।.३॥
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥केला अहंकार आड । आह्मां जगासी हा नाड ॥ध्रु.॥यथंभुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥तुका ह्मणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥
विश्वास तो देव । ह्मणुनि धरियेला भाव ॥१॥माझी वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥ध्रु.॥जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीचीं उत्तरें ॥२॥नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाटीं॥३॥कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥४॥तुका ह्मणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥५॥
सुराणीचीं जालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आह्मी देवा ॥१॥ह्मणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळऴिचया मुळें िस्थराविलें ॥२॥लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥तुका ह्मणे आह्मी आळवूं आवडी । ह्मणऊनी जोडी दाखविली ॥५॥
एका वेळे केलें रितें कलिवर । आंत दिली थार पांडुरंगा ॥१॥पाळण पोषण लागलें ते सोई । देहाचें तें काई सर्वभावें ॥ध्रु.॥माझिया मरणें जाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाशा ॥२॥जाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका ह्मणे कांहीं बोलों नये ॥३॥
पावतों ताडन । तरी हें मोकलितों जन ॥१॥मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥२॥तुका ह्मणे मान । होतां उत्तम खंडन ॥३॥
धरावें तों भय । अंतरोनि जाती पाय ॥१॥जाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥२॥तुका ह्मणे असो । अथवा हें आतां नासो॥३॥
आह्मांसी सांगाती । होती अराले ते होती ॥१॥येती आइकतां हाक । दोन मिळोन ह्मणती एक ॥ध्रु.॥आणिकां उत्तरीं। नसे गोवी वैखरी ॥२॥तुका ह्मणे बोल । खूण पहाती विठ्ठल॥३॥
आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥१॥ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥अंकिता ऐसया। होइल पावविलें ठाया ॥२॥तुका ह्मणे ऐसें । दिलें आभंड प्रकासे ॥३॥
काहे लकडा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥१॥देवलवासी तरवरछाया । घरघर माई खपरिबसमाया॥ध्रु.॥कां छांडियें भार फेरे सीर भागें । मायाको दुःख मिटलिये अंगें॥२॥कहे तुका तुम सुनो हो सिद्धा । रामबिना और झुटा कछु धंदा ॥३॥
आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया ॥१॥त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥दृढ एक चित्तें जालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुह्मांसी हे ॥२॥पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥३॥तुका ह्मणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येइल तुह्मां ॥४॥
व्हावया भिकारी हें आह्मां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥१॥संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । ह्मणऊनि आस मोकलिली ॥२॥तुका ह्मणे दुःखें उबगला जीव । ह्मणऊनी कीव भाकीं देवा ॥३॥
कोरडिया ऐशा सारून गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥लौकिकाचा आड येईल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥तुका ह्मणे डांख लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटाविण ॥३॥
ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥१॥माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥२॥संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥तुका ह्मणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥५॥
करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥सुखदुःखें तुज देऊनी सकळ । नाहीं ऐसा काळ केला आह्मी ॥२॥तुका ह्मणे जाला देहाचा विसर । नाहीं आतां पर आप दोन्ही ॥३॥
काळा च सारिखीं वाहाती क्षेत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें॥ध्रु.॥शीतउष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषतां वाव होय शीण॥२॥तुका ह्मणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणें तया ॥३॥
तुझिया विनोदें आह्मांसी मरण । सोसियेला सीण बहु फेरे ॥१॥आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥२॥तुका ह्मणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥३॥
पाठीलागा काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार जाणील तों ॥२॥तुका ह्मणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.