मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ३५०६–३६१०

Tukaram Gatha, part 35

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ३५ — अभंग ३५०६ ते ३६१०.

आपुलिये टाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥१॥करीन पायांशीं वोळखी । करिसी तें करीं सुखीं ॥ध्रु.॥कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥तुका ह्मणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥
माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥संपादितों तो अवघा बाहए रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥२॥तुका ह्मणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥३॥
नव्हावा तो बरा मुळीं च संबंध । विश्वासिकां वध बोलिलासे ॥१॥आतां माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥नाहीं भाव परी ह्मणवितों दास । नका देऊं यास उणेंयेऊं ॥२॥तुका ह्मणे कां हो उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा॥३॥
काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥कोण तुह्मां सुख असे या कौतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मा ॥२॥तुका ह्मणे काय जालासी निर्गुण । आह्मां येथें कोण सोडवील ॥३॥
निष्ठ यासाटीं करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥१॥ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥बैसलासी केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥२॥तुका ह्मणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥२॥तुका ह्मणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना॥३॥
तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तान ॥१॥जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काई ॥ध्रु.॥माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥२॥तुका ह्मणे साचें । तेथें मागील कईचें ॥३॥
तुह्मां आह्मां सरी । येथें कईच्या या परी ॥१॥स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥खुंटलिया वाचा। मग हा आनंद कइचा ॥२॥तुका ह्मणे कोडें । आह्मी नाचों तुज पुढें ॥३॥
कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें माव दावीतसें ॥१॥आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥संतांचें उिच्छष्ट मागिले पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥२॥तुका ह्मणे आलों दावूनि विश्वास । संचित तें नास पावे ऐसें ॥३॥
थोडे तुह्मी मागें होती उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥२॥तुका ह्मणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥
आह्मी ह्मणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥आह्मी तुज असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥२॥तुका ह्मणे मज धरियेलें बळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥३॥
आहेतें सकळ प्रारब्धा हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥१॥ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥२॥तुका ह्मणे तुज ठेवावें पुजून । आणीक ते गुण नाहीं येथें ॥३॥
सेवट तो होती तुझियानें गोड । ह्मणऊनि चाड धरीतसों ॥१॥देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥तुका ह्मणे आह्मी चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥३॥
ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥ध्रु.॥आह्मांसी न कळे । तुह्मी झाकुं नये डोळे ॥२॥तुका ह्मणे संगें । असों एक एका अंगें॥३॥
मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥१॥धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥करूनि नवल। याचें बोलिलों ते बोल ॥२॥तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते॥३॥
आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ध्रु.॥देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥तुका ह्मणे बाळीं । केली चाहाडी सकळीं॥३॥
नव्हेसी तूं लांसी । मायां आणिकां त्या ऐसी ॥१॥जे हे वांयां जाती बोल । होती निर्फळ चि फोल ॥ध्रु.॥नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥२॥तुका ह्मणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥३॥
आह्मां बोल लावा । तुह्मां अनुचित हें देवा ॥१॥ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं तुह्मां हातीं ॥ध्रु.॥आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥२॥तुका ह्मणे ठायीं । ऐसें विचारावें पायीं ॥३॥
मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥तुका ह्मणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥३॥
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥निष्ठ तूं बहु देवा । पुरे हेवा न ह्मणवी ॥ध्रु.॥पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥२॥तुका ह्मणे तुज माझें । ह्मणतां ओझें फुकट ॥३॥
नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥१॥तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥२॥तुका ह्मणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥३॥
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥निष्ठ हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥झुरावें तें तेथींच्या परी । घरिच्याघरीं अवघिया ॥२॥तुका ह्मणे देवपण । गुंडाळून असों दे ॥३॥
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥ह्मणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरस ॥२॥तुका ह्मणे आळवणे । माझ्या देणें उत्तर ॥३॥
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें॥१॥वाइटबरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥बोलों जातां वाढे बोल । वांयां फोल खटखट ॥२॥काकुलती यावें देवा । तो तों सेवा इिच्छतो ॥३॥हिशोबाचे खटखटे । चढे तुटे घडेना ॥४॥तुका ह्मणे कळों आलें । दुसरें भलें तों नव्हे ॥५॥
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥पळणें तों पळा सांडुनि कांबळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥२॥तुका ह्मणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥३॥
उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥१॥ह्मणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥ध्रु.॥कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥२॥तुका ह्मणे सापा । न कळे कुरवाळिलें बापा ॥३॥
आह्मां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥१॥जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ध्रु.॥व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥२॥कवतुकें वावरें । तुका ह्मणे या आधारें ॥३॥
पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥करितें पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥२॥तुका ह्मणे संत । तुह्मी मी बहु पतित ॥३॥
जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥१॥पायां पडणें न संडीं । पोटीं तें च वर तोंडीं ॥ध्रु.॥एका भावें चाड । आहे तैसें अंतीं गोड ॥२॥तुका ह्मणे आह्मां । टळणें चि नाहीं नेमा ॥३॥
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥१॥पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥माझें तुझें भिन्नभावें। गळां दावें मोहाचें ॥२॥तुका ह्मणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥३॥
देह प्रारब्धा शिरीं । असोन करी उद्वेग ॥१॥धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥ऐसी चुकोनियां वर्में। पीडा भ्रमें पावलों ॥२॥तुका ह्मणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा॥३॥
अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरिनाम ।उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥१॥आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें ॥ध्रु.॥खुंटूनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबला ।न लगे मोल द्यावा रुका । भावें एका कारणें॥२॥तुका ह्मणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं ।भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥३॥
तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥आवरिल्या वृत्ति । मन घेउनियां हातीं ॥२॥तुका ह्मणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥३॥
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ह्मणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥कृपादान केलें संतीं। कल्पांतीं ही सरेना ॥२॥तुका ह्मणे संतसेवा । हा चि हेवा उत्तम॥३॥
नारायणा ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥१॥जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥२॥कैवल्य तें जोडे । पालट लवकरी घडे ॥३॥जन्ममरणदुःख अटे । जाळें अवघेंचि तुटे ॥४॥तुका ह्मणे जाला । याचा गुण बहुतांला ॥५॥
अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट ।होती हरिनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥१॥तुह्मी हरि ह्मणा हरि ह्मणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला ।क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरि ह्मणतां॥२॥अमित्य दोषाचें मूळ । जालें वाल्मीकास सबळ ।जाला हरिनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ॥३॥हरि ह्मणतां तरले । महादोषी गणिके नेलें ।कुंटणी भिली उद्धरिलें । वैकुंठासी हरि म्हणतां ॥४॥हरिविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया ।ह्मणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥५॥
भजन या नासिलें हेडि । दंभा लंडा आवडी ॥१॥जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट कां जेवूं ॥२॥तुका ह्मणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥
कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥होइल यमपुरी । यमदंड यातना ॥ध्रु.॥कोण जाली लगबग । काय करिसि तेथें मग ॥२॥कां रे भरला ताठा । करिती वोज नेतां वाटा॥३॥तोंडा पडिली खिळणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥४॥कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥५॥लाज धरीं ह्मणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥६॥
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥१ ॥मधील ते वाव अवघी उपाधि । तुह्मां आह्मांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥घट मठ जाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥२ ॥तुका ह्मणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥३॥
एक आतां तुह्मी करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥जाणत चि दुजें नाहीं । आणिक कांहीं प्रकार ॥२॥तुका ह्मणे शरण आलों । काय बोलों विनवितों॥३॥
लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मावेचा पदर कळों येतो ॥२॥होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें जालों युक्तिकळाहीन ॥३॥तुका ह्मणे तुह्मी समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय ह्मणें धीरें फळ टोंकें ॥१॥कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाटीं ॥२॥तुका ह्मणे हातें लोटिलें न कळे । झांकितसें डोळे पांडुरंगा ॥३॥
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥कां नेणें निष्ठ केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥तुका ह्मणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥३॥
वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥नाहीं सरता जालों पायीं । तुह्मी जइप न पुसा ॥ध्रु.॥कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥२॥तुका ह्मणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥मग तळमळ न करितें मन । जालें तें कारण कळों येतें ॥२॥तुका ह्मणे केला पाहिजे निवाड । वइदासी भीड मरणें रोग्या ॥३॥
ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी ॥१॥तुह्मां तंव होइल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ध्रु.॥कोण जाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥२॥तुका ह्मणे निमित्याचा । आला सुच अनुभव ॥३॥
ब्रह्मज्ञानाची भरोवरी । पुढिला सांगे आपण न करी॥१॥थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥२॥तुका ह्मणे कवित्व करी । मान वस्तु हे आदरी ॥३॥
कधीं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥१॥भेटी लागीं पंढरीनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥ध्रु.॥सिणलें माझें मन । वाट पाहतां लोचन ॥२॥तुका ह्मणे लागली भूक । तुझें पहावया श्रीमुख ॥३॥
उच्चारूं यासाटीं । आह्मी नाम तुझें कंठीं ॥१॥येसी धांवत धांवत । माउलिये कृपावंते ॥ध्रु.॥पाय चित्तीं धरूं । क्रिडा भलते ठायीं करूं ॥२॥तुका ह्मणे माझे गंगे । प्रेमभरित पांडुरंगे ॥३॥
दगडाच्या देवा बगाड नवस । बाईल कथेस जाऊं नेदी ॥१॥वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी॥ध्रु.॥चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥२॥करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥तुका ह्मणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥४॥
करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥१॥होतें तें चि असों द्यावें । रूप सौम्य चि बरवें ॥ध्रु.॥भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या कोपें कोठें जावें ॥२॥तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥३॥
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा ह्मणऊनि ॥२॥बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥३॥तुका ह्मणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥४॥
आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥येर येरा समदृष्टी द्यावें या उत्तरा । यासी काय करा गोही आतां ॥२॥तुका ह्मणे मेलों सांगतसांगतां । तें चि आलें आतां कळों तुह्मां ॥३॥
काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥१॥डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥न कळे उचित न संगतां स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥तुका ह्मणे माझा घात तुह्मां ठावा । तरि कां आधीं देवा वारूं नये ॥३॥
नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥१॥अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥२॥तुका ह्मणे फार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुह्मी ॥३॥
लडिवाळ ह्मणोनी निष्ठ न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठ उत्तरा कोमेजतों ॥२॥तुका ह्मणे तुह्मी कृपावंत हरि । शांतवा उत्तरीं अमृताच्या ॥३॥
आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी माझ्या देइप जीवा ॥ध्रु.॥काय सायुज्यता मुक्ति हे चि गोड । देव भक्त कोड तेथें नाहीं ॥२॥काय तें निर्गुण पाहों कैशा परी । वणूप तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥गोड चरणसेवा देवभक्तपण । मज देवा झणें दुराविसी ॥४॥जाणिवेपासूनि सोडवीं माझ्या जीवा । देई चरणसेवा निरंतर ॥५॥तुका ह्मणे गोडा गोड न लगे प्रीतिकर । प्रीति ते ही सार सेवा हे रे ॥६॥
चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥तुका ह्मणे आहे ठायींचा चि मान । आतां अनुमान कायसा तो ॥३॥
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्याची लागे चिंता ॥२॥जरी तुज कांहीं होईल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥३॥
काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥द्वैताचिया कैसा सांपडलों हातीं । बहुत करती ओढाओढी ॥२॥तुका ह्मणे आतां आपुलिया सवें । न्यावें मज देवें सोडवूनि ॥३॥
नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥। त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥ध्रु.॥घोकुनी अक्षर। वाद छळणा करीत फिरे ॥२॥ह्मणे देवासी पाषाण । तुका ह्मणे भावहीन ॥३॥
हें चि सर्वसुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीथॉ ॥२॥कल्पना हे तिळ देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥३॥तुका ह्मणे नामें देव नेदी भेटी । ह्मणे त्याचे होंटीं कुष्ट होय ॥४॥
माझे विषयीं तुज पडतां विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥तुझा ह्मणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥तुका ह्मणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥३॥
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रें वाडां गाय सांपडली ॥१॥कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वणाची आण तया काई ॥ध्रु.॥केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥२॥तुका ह्मणे खीर केली का†हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥३॥
भागल्यांचा तूं विसांवा । करीं नांवा निंबलोण ॥१॥परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥अनाथांचा अंगीकार। करितां भार न मनिसी ॥२॥तुका ह्मणे इच्छा पुरे । ऐसें धुरेगे विठ्ठल ॥३॥
घालूनियां कास । बळें आलों मागायास ॥१॥प्रेमें देइप पाठवूनि । पांडुरंगा सेवाॠणी ॥ध्रु.॥होइप रे शाहाणा । कळों नेदावें या जना ॥२॥तुका ह्मणे पायीं । जडलों मग उरलें काई॥३॥
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा॥१॥कैं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥तुका ह्मणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥आलों लोटांगणीं। रुळें तुमचे चरणीं ॥२॥तुका ह्मणे कइप । डोई ठेवीन हे पायीं॥३॥
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥धरणें घेतलें घरांत । नको धरून उठवूं हात ॥ध्रु.॥घेतली मुरकुंडी। थोर जालों मी लंडी ॥२॥तुका ह्मणे जगजीवना । िब्रदें पाहें नारायणा॥३॥
पडिलों बाहेरि आपल्या कर्तव्यें । संसाराचा जीवें वीट आला ॥१॥एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निडिळया ॥ध्रु.॥दोनी जालीं नांवें एकाच्या मथनें । भुस सार गुणें वेगळालीं ॥२॥तुका ह्मणे कोठें वसे मुक्ताफळ । सिंपल्याचें स्थळ खंडलिया ॥३॥
पाहातां हें बरवें जालें । कळों आलें यावरी ॥१॥मागिलांचा जाला झाडा । त्या निवाडास्तव ॥ध्रु.॥विसांवलें अंग दिसे । सरिसे अनुभव ॥२॥तुका ह्मणे बरें जालें । देवें नेलें गवसूनि ॥३॥चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥१॥फुटोनियां गेला कुंभ । जालों निष्काम स्वयंभ ॥ध्रु.॥धरित चि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥२॥तुका ह्मणे कौतुक कोडें । आगी काय जाणे मढें ॥३॥
श्रमपरिहारा । मूळ हें जालें दातारा ॥१॥देह निवेदूनि पायीं । जालों रिकामा उतराई ॥ध्रु.॥आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥२॥राहिला निराळा । तुका कटकटे वेगळा॥३॥
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कायाअ देहाकडे नावलोकीं॥१॥ह्मणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा । येतां येत बळाशक्तीपुढें ॥२॥तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥३॥
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम कोरडी वरिवरि ॥ध्रु.॥सत्याविण काय उगी च लांबणी । कारियाची वाणी येर भूस ॥२॥तुका ह्मणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥३॥
नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें हें टोंकविलें नारायणा ॥१॥अंतर तों तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार उचितें चाळवीजे ॥ध्रु.॥मनें कल्पीलें आवरितां पाप । संकल्पीं विकल्प याचि नांवें ॥२॥तुका ह्मणे आह्मां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥
ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे ॥१॥काय तुह्मां वेचे घातलें सांकडें । माहें आलें कोडें आजिवरि ॥ध्रु.॥सेवेंविण आह्मी न लिंपों काया । जाला देवराया निर्धार हा ॥२॥तुका ह्मणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें कारियासी ॥३॥
वृत्तीवरि आह्मां येणें काशासाटीं । एवढी हे आटी सोसावया ॥१॥जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुह्मां कां अळस वोडवला ॥२॥तुका ह्मणे होइप लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥३॥
सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥एका नेमें कोठें दुसरा पालट । पादिर तो धीट ह्मणती त्यासी ॥२॥तुका ह्मणे किती बोलसी उणें । एकाच वचनें खंड करीं ॥३॥
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळातें ॥१॥टाळावी ते पीडा आपुल्यापासून । दिठावेलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥तुम्हांसी कां कोडें कोणे ही विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥२॥तुका ह्मणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईन ॥३॥
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥उपाय हे करीं एका चि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥२॥तुका ह्मणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥३॥
कोठें आतां आह्मी वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥न करावी सांडी आतां टाळाटाळी । देइन ये कळी होइल माजी ॥ध्रु.॥घरोघरीं जाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडवी ॥२॥तुका ह्मणे आह्मां भाकितां करुणा। भलता चि शाहाणा शोध काढी ॥३॥
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥धीरें तूं गंभीर जीवनें जगाचें । जळो विभागाचें आत्रीतत्या ॥ध्रु.॥भेईल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥२॥तुका ह्मणे आवश्यक हें वचन । पाळावें चि वान समयो आहे ॥३॥
आह्मी पाहा कैसीं एकतत्त्व जालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥तुह्मांविण कांहीं नावडावें जीवा । केला तो चि देवा केला पण ॥ध्रु.॥वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलें चि वंदूं आवडीनें ॥२॥तुका ह्मणे कळे नामाचें जीवन । वारता ही भिन्न नेणों आतां ॥३॥
आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥हेंगे ऐसें ह्मणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥घेऊनियां सुखें । नाचेल तुका कवतुकें ॥३॥
द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥ह्मणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥तुका ह्मणे कळे । काय लाभ कोण वेळ ॥३॥
तुह्मी तों सदैव । आधरपणें माझी हांव ॥१॥जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥येथूनि सोडवा । आतां अनुभवेंसी देवा ॥२॥तुका ह्मणे जालें । एक मग हें निमालें॥३॥
कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उसीर तो काय तुह्मांपाशीं ॥१॥आहे तें मागों तों दिसातें जवळी । केल्यामध्यें किळ कोण साध्य ॥ध्रु.॥नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥२॥तुका ह्मणे हात आवरिला गुंती । माझे तंव चित्तीं नाहीं दुजें ॥३॥
हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे॥१॥त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥तुका ह्मणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥३॥
अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ध्रु.॥जीव जाते वेळे । भरे लकडा ताठी डोळे ॥२॥मुसळाचें धनु । तुका ह्मणे नव्हे अनु ॥३॥
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥आतां होतें तें चि जालें । नाम ठायींचें चांगलें ॥ध्रु.॥उतरलें डाइप । उत्तम ते सुलाख ताई ॥२॥हिंडवितां देश । तुका ह्मणे नाहीं नाश ॥३॥
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥तुका ह्मणे आतां निश्चळ चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥
नव्हे मी शाहाणा । तरी ह्मणा नारायणा ॥१॥तुह्मां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥कळोनि आवडी । तुका ह्मणे जाते घडी॥३॥
आह्मी भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥नाहीं ऐसें येथें जालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोसें ॥ध्रु.॥न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥२॥तुका ह्मणे आतां वचनें वचन । वाढले तिक्षीण बुद्धि जाली ॥३॥
कोठें देवा बोलों । तुह्मां भीड घालूं गेलों ॥१॥करावाया सत्त्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥तुका ह्मणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥३॥
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥१॥ठेवियेला पूर्ण करूनि संकेत । तयापाशीं चित्त लागलें से ॥ध्रु.॥जाणसी गे माते लेंकराचें लाड । नये पडों आड निष्ठता ॥२॥तुका ह्मणे आह्मीं करावें वचन । तुह्मांसी जतन करणें तें ॥३॥
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते उजेवन करावया ॥ध्रु.॥लावूनियां दृष्टि घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥तुका ह्मणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥
मागील विसर होईल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । िस्थरावेल बुद्धि पायांपाशीं॥ध्रु.॥अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥तुका ह्मणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहासी ॥३॥
वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥तुका ह्मणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईन ॥३॥
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडता आवडीची ॥ध्रु.॥सिकवूं जाणे तें गोमाटियासाटीं । लोभें नाहीं तुटी निश्चयेंसी ॥२॥अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काळ जाणे ॥३॥न करी वेव्हार नेदी गांजूं कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥४॥तुका ह्मणे करी जिवाची जतन। दचकूनि मन जवळी आणी ॥५॥
संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥लाज तेवढी नारायणीं। वांकडी वाणी पोरांपें ॥२॥तुका ह्मणे बेशरमा । श्रमावरी पडिभरू॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला
ऐसें
— असे
ठायीं
— ठिकाणी
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या
येर
— दुसरा, इतर
काई
— काय
माया
— भासमान करणारी शक्ती
घडे
— घडते, शक्य होते
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
निष्काम
— फळाची अपेक्षा नसलेले
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
तैसें
— तसे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
कीजे
— केले जाते
वरी
— वर; शिवाय
देखोनि
— पाहून

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा