मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ३६११–३७१४

Tukaram Gatha, part 36

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ३६ — अभंग ३६११ ते ३७१४.

मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥तुका ह्मणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥
बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥तुका ह्मणे उभा राहिला न बैसे । आमची माय असे उद्वेग त्या ॥३॥
कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरि ॥१॥नाहीं सोंग अळंकार । दास जाला संवसार ॥ध्रु.॥दुःख आह्मां नाहीं चिंता । हरिचे दास ह्मणवितां ॥२॥तुका ह्मणे देवा । ऐसीं जळो करितां सेवा ॥३॥
आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकिळलों ॥१॥जनाचारामध्यें उडाला पातेरा । जालों निलाजिरा ह्मणऊनि ॥ध्रु.॥कोणाचिया दारा जावेनासें जालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥२॥कां न जाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें जालें ॥३॥तुका ह्मणे तुज भक्त जाले फार । ह्मणोनियां थार नाहीं येथें ॥४॥
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥नव्हे चि तुह्मांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥भोग तंव जाला खरा भोगावया तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका ह्मणे ॥४॥
कां जी आह्मां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥कां जी आह्मांवरि आणिकांची सत्ता । तुह्मांसी असता जविळकें ॥२॥तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥३॥
निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥दुस†याच्या मता । मिळेनासें जालें चित्ता ॥२॥तुका जाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥
माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥तुका ह्मणे सेवा । माझी कृपा तुझी देवा॥३॥
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥तुका ह्मणे जाण । तें च भल्याचें वचन॥३॥
माझिये बुद्धीचा खुंटला उपाव । करिसील काय पाहेन तें ॥१॥सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरि नयों ॥२॥तुका ह्मणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरून॥३॥
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥तुका ह्मणे नयों रूपा । काय बापा करीसी॥३॥
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥माझें परिसावें गा†हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥हा चि आह्मां ठाव। पायीं निरोपाया भाव ॥२॥तुका ह्मणे जार । तुझा तुज देवा भार॥३॥
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥वीट नाहीं पांडुरंगीं । वाढे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥इंिद्रयांची हांव पुरे। परि हें उरे चिंतन ॥२॥तुका ह्मणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥३॥
सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥ध्रु.॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥तुका ह्मणे कृष्णनामें । शीतळ प्रेम सर्वांसी ॥३॥
ब्रीद याचें जगदानी । तो चि मनीं स्मरावा ॥१॥सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥तुका ह्मणे भिक्तकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥अवघियांचा जाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥तुका ह्मणे कानीं आइकली मात । तो चि जाला घात जीवपणा ॥३॥
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग ह्मणे ॥ध्रु.॥एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥तुका ह्मणे याचे भेटी । जाली तुटी आपल्यांसी ॥३॥
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकार ॥ध्रु.॥चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥तुका ह्मणे आवडी धरीं । कृपा करी ह्मणऊनी॥३॥
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥सेवा करी साहे निष्ठ उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥तुका ह्मणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥३॥
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥१॥आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥मागें सारियेली युक्ती । कांहीं होती जवळी ते ॥२॥निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
आतां येथें जाली जीवासवेंसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥२॥आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥३॥आतां लोकलाज नयो येथें आड । बहु जालें गोड ब्रह्मरस ॥४॥तुका ह्मणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ िस्थरावला ॥५॥
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज हि येणें काळें कृपा कीजे ॥१॥अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥अंतरींचें कळों देइप गुहए गुज । अंतरीं तें बीज राखईन ॥२॥समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत॥३॥तेणें या चित्ताची राहेल तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥४॥तुका ह्मणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुह्मां ॥२॥तुका ह्मणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥
नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥१॥आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देइप ॥ध्रु.॥समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥तुका ह्मणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥३॥
जें जें केलें तें तें साहे । कैसें पाहें भाविक ॥१॥ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ध्रु.॥काय होय नव्हें करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥२॥तुका ह्मणे कटीं कर । उभें धीर धरूनि ॥३॥
नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥१॥चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास॥२॥तुका ह्मणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥
तुह्मी माझा देवा करिजे अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥आतां दोहीं पक्षीं लागलें लक्षणें । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥एकांतीं एकलें न राहे निश्चळ । न राहे च पळ मन ठायीं ॥२॥पायीं महत्वाची पडिली शंकळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥३॥शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य नाहीं ॥४॥तुका ह्मणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥कवतुक तुझें नवल यावरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥नाहीं मिळों येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥तुका ह्मणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥दावूनियां आस । दूर पळविता कास ॥२॥तुका ह्मणे धांव । घेतां न पुरे चि हांव ॥३॥
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धि ॥ध्रु.॥सत्य संकल्प च साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥२॥तुका ह्मणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥
कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग॥२॥धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥३॥तुका ह्मणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥४॥
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । जालों मी सेवक दास तुझा ॥१॥कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥दंभ मान माझा करूं पाहे घात । जालिया ही थीत कारणाचा ॥२॥हीन बुद्धि माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥३॥तुका ह्मणे मज विघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥४॥
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देइप प्रेमसुख ॥१॥देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥२॥तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥तुका ह्मणे तुझे जडोनियां पायीं । जालों उतराई पांडुरंगा ॥४॥
काय सांगों या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती॥१॥काय द्यावें त्यांचें व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती॥२॥तुका ह्मणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥
देव जाणता देव जाणता । आपली च सत्ता एकाएकीं॥१॥देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे॥२॥देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळा तुका ह्मणे ॥३॥
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आह्मांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥काय जालें तरी नेघा तुह्मीं भार । आणीक कोणां थोर ह्मणों सांगा ॥ध्रु.॥पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥२॥तुका ह्मणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥३॥
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीन ॥१॥नेघावा जीं तुह्मी वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥वेव्हारें आलें तें समानें चि होतें । बळ नाहीं येथें चालों येत ॥२॥तुका ह्मणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥३॥
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥१॥होइल हो तैसी आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥तुह्मांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥२॥तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड॥३॥
कां हो वाडवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोडएाचें ॥१॥ठेविन पायांवरी डोई । यासी तुमचें वेचे काई । जालों उतराई । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥निवाड आपणियांपाशीं । असोन कां व्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥तुका ह्मणे गोड । होतें जालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥३॥
नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईल करुणा । ते चि पहा तुह्मांसी ॥ध्रु.॥ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां बळें कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका ह्मणे सांभाळा ॥३॥
ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥
माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥काय सांगायास वेचे। रींद आरंभीं ठायींचे ॥२॥तुका ह्मणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥ह्मणविल्यासाटीं कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आह्मीं ॥२॥नाहीं मनोगत तोंवरि हे देवा । तुका ह्मणे सेवा नेघीजे तों ॥३॥
मनाचिये साक्षी जाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥तुह्मां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥तुका ह्मणे आह्मी तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥
घालूनि लोळणी पडिलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरि ॥१॥वोल्हावेल तनु होईल शीतळ । जाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥पावेन या ठाया कइप जालें होतें । आलों अवचितें उष्टएावरि ॥२॥तुका ह्मणे कोणी जाणवा राउळी । येइल जवळी पांडुरंग ॥३॥
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । ह्मणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥उणें पुरें काय माझें। त्याचें ओझें तुह्मांसी ॥ध्रु.॥सांभाळावें तें म्या काई । अवो आई विठ्ठले । मागें जया जाई नें स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका ह्मणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥
उरलें तें भिक्तसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका। साजतें हें थोरपण । नाहीं विण वत्सळा ॥२॥शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका ह्मणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी॥१॥संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥पायांवरि ठेविन भाळ । येणें सकळ पावलें ॥२॥तुका ह्मणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥
तुह्मां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥लावितो आभार । तुका विखरलेती फार ॥३॥
एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति ॥१॥कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥न राहे निश्चळ जागवितां मन । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥२॥तुका ह्मणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥३॥
आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥ऐसें सांगोनिया जालों उतराई । आणीक तें काई माझे हातीं ॥ध्रु.॥केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥तुका ह्मणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥३॥
सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥उतरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥घरामध्ये राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥२॥तुका ह्मणे साचें । रूप तें दर्पणाचें॥३॥
नाहीं खंड जाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥कैसें कैसें हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥२॥तुका ह्मणे मज । न लगे बोलणें सहज॥३॥
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥धीर करावा करावा । तरी तो आहे आह्मां देवा ॥ध्रु.॥रिघावें पोटांत। पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥तुका ह्मणे वरि । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगडें ॥१॥कपाळास लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥एक परि बरें वेडें । तार्किक कुडें जळो तें ॥२॥तुका ह्मणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीस ॥ध्रु.॥एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥जगाऐसी बुद्धि नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा जालों पायीं ॥३॥आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥तुका ह्मणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥
न करीं रे मना कांहीं च कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥१॥येथें सुखाचिया रासी । पुढें ठाव नाहीं कल्पनेसी॥ध्रु.॥सुखाचें ओतिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥२॥तुका ह्मणे येथें होईल विसांवा । तुटतील हांवा पुढिलिया ॥३॥उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥२॥पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका ह्मणे धरी । सेज जमा सेवटीं ॥३॥
जीविता तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा॥१॥जनार्दनीं सरती कर्में । वाते भ्रमे अनेत्र । अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥२॥तुका ह्मणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी॥३॥
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राणें प्रीती ॥१॥ऐसी बिळवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षणें ॥२॥तुका ह्मणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥
केवढा तो अहंकार । माझा तुह्मां नव्हे दूर ॥१॥आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥कां जी कृपेनें कृपण । वेचत असे ऐसें धन ॥२॥तुका ह्मणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥३॥
अपराधी ह्मणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥येइल तारूं तरी तारा जी देवा । नाहीं तरी सेवा घ्या वो भार ॥ध्रु.॥कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जाइप जनें ॥२॥तुका ह्मणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार मी ॥३॥
माझे तों फुकाचे कायेचे चि कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुह्मांऐसा ॥१॥कांहीं च न वंचीं आजिचा प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥द्यावें काहीं तुह्मीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥तुका ह्मणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्म येतें हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥मनें मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥२॥नाहीं पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥वेळोवेळां जागवितों । दुजें येइल ह्मुण भीतों ॥ध्रु.॥नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥तुका जालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड ख†या खोटएां ॥ध्रु.॥उगा च सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥तुका ह्मणे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशातैसें॥३॥
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥दयासिंधु तुह्मां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपापीयूषें ॥२॥तुका ह्मणे अवो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥२॥तुका ह्मणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥३॥
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥लागेल पालटें फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला ये लाग जगनिंदेचा ॥२॥तुका ह्मणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥
नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रह्मांडांत॥१॥कासया जी माझी करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥२॥तुका ह्मणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥३॥
मज कांहीं सीण न व्हावा यासाटीं । कृपा तुह्मां पोटीं उपजलीं ॥१॥होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥आह्मी न मनावी कोणाची आशंका । तुह्मां भय लोकां आहे मनीं ॥२॥तुका ह्मणे आतां संचिताचा ठेवा । वोडवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥पाहातसें वाट येइप गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥बहुतांचे सत्ते जालों कासावीस । जाय रात्री दिस वैरियांचा ॥२॥तुका ह्मणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥३॥
कां जी तुह्मीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायिंच्या ठायीं ॥१॥कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥२॥तुका ह्मणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण ह्मणऊनि ॥३॥
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥जाला तरी वेळ कवतुकासाटीं । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥तुका ह्मणे त्यासी ठाउकें उचित । होईल संकेत नेमियेला ॥३॥
आरुषा वचनीं मातेची आवडी । ह्मणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥काय होइल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठासांडी ॥२॥तुका ह्मणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥
प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्टता ॥१॥जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥तुका ह्मणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥
नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥१॥जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥तुका ह्मणे पाहों । होइल तें निवांत राहों॥३॥
बीजीं फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥हा तों गडसंदीचा ठाव। पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं। दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥तुका ह्मणे दिशाभुली । जाल्या उफराटी चाली । निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुह्मां जगीं सोयइरिका ॥२॥तुका ह्मणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचाठायीं ॥३॥
आवडी धरूनि करूं गेलों लाड । भिक्तप्रेमकोड न पुरे चि ॥१॥ह्मणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहु साल ॥ध्रु.॥वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों॥२॥तुका ह्मणे सरतें नव्हें चि पायांपें । बळ केलें पापें नव्हें चि भेटी ॥३॥
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥
हा गे हा चि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला॥१॥दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥वेगळाल्या कोठें भागें। लाग लागें लावावा ॥२॥तुका ह्मणे केल्या जमा । वृत्तितमा भाजूनि ॥३॥
तुह्मांसी न कळे सांगा काय एक । असया संकल्प वागवूं मी ॥१॥आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥कृपा जाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥तुका ह्मणे मागें बोलिलों तें वाव । आतां हा चि भाव दृढ झाला ॥३॥
वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥आतां कोण याचा करील आदर । जावो किळवर विटंबोनि ॥२॥तुका ह्मणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥
हें ही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं जाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥धीरा शांती ठाव नुरे । हा चि उरे आबाळ्या ॥२॥कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधनि ॥३॥
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥तुका ह्मणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें॥३॥
देवें दिला देह भजना गोमटा । तों या जाला भांटा बाधिकेच्या ॥१॥ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥ध्रु.॥दास ह्मणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥२॥तुका ह्मणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥
काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची॥१॥सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ध्रु.॥काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥२॥आमचे कुळीं नव्हतें ऐसें । हें च पिसें निवडलें ॥३॥लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टांचीं ॥५॥
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोष ॥ध्रु.॥पाहिजे तो कळवळा। मग बळा काय उणे ॥२॥तुका ह्मणे उदारपणें । काय उणें मनाचें॥३॥
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण॥१॥अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥पाहिजे तें आलें रुची।काचाकुची काशाची ॥२॥तुका ह्मणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढें चि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥जागाजालेपणें। काय नासावें स्वप्न । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका ह्मणे फुटे । डोई गुडघे कोंपर ॥३॥
गुणांचा चि सांटा । करूं न वजों आणिका वाटा॥१॥करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥नेमली पंगती। आह्मां संतांची संगती ॥२॥तुका ह्मणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥३॥
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दरपणींचें धन उपर वाया ॥१॥अनुभउ कइं होईन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजकळावर्म तुमचें दान ॥२॥तुका ह्मणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सिद्ध ॥३॥
सिकविला तैसा पढों जाणे पुसा । कैंची साच दशा तैसी अंगीं ।स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥कासया हा केला जिहुवे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये ।आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥कवित्वें रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी ।तुका ह्मणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं ह्मणे परि लाभ नाहीं ॥३॥
अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी ।जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । ह्मणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं ।अंतरीं सबाहएीं कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां॥२॥आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें ।तुका ह्मणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुह्मी कोठें॥३॥
केलें तरी आता साच चि करावें । विचारिलें द्यावें कृपादान ॥१॥संकल्पासी नाहीं बोलिला विकल्प । तुह्मां पुण्यपाप कळे देवा ॥ध्रु.॥उदार शिक्त तंव तुमची भूमंडळीं । ऐसी िब्रदावळी गर्जतसे ॥२॥तुका ह्मणे अहो रकुमादेवीवरा । उपरोध कां धरा माझा आतां ॥३॥
अहो पुरुषोत्तमा । तुह्मां काशाची उपमा ॥१॥सतंत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥जागविलें तरी । तुह्मां वेक्तियेणें हरी ॥२॥तुका ह्मणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा॥३॥
मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥१॥बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥पाक आणि रुचि। जेथें तेथें ते कइंची ॥२॥वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
चिंतनाची जोडी । हा चि लाभ घडोघडी ॥१॥तुह्मी वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥जाय जेथें मन । आड घाला सुदर्शन ॥२॥तुका ह्मणे भोजें । नाचें हो ऐसें न लजें ॥३॥
आवडीची न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥२॥तुका ह्मणे ब्रह्मानंदें । संतवृंदें चरणापें ॥३॥
जडलों तों आतां पायीं । होऊं काई वेगळा ॥१॥तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥२॥वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तैसें
— तसे
तुज
— तुला
काई
— काय
ठायीं
— ठिकाणी
पुढती
— पुन्हा, पुढे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
वरी
— वर; शिवाय
घडे
— घडते, शक्य होते
तैं
— तेव्हा
कीजे
— केले जाते
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
जेवीं
— ज्याप्रमाणे
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
जैसें
— जसे
येर
— दुसरा, इतर
तेवीं
— त्याप्रमाणे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा